Thursday, March 10, 2011

पालकांची शाळा - घास काऊ चिऊचे...

हा घास चिऊचा...हा घास काऊचा...असं करत जेवणाचे चारदोन घास मुलांच्या पोटात ढकलताना समस्त आईंच्या नाकी नऊ येतात. एकतर स्वत:च्या जेवण्याच्या आधी मुलांना भरवायचे असल्यामुळे आईच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळेला असतो आणि मुलांना मात्र जेवणापेक्षा खेळण्यात रस असतो. आपल्या बाळाने काहीतरी खावं असं तिला सतत वाटत असतं. पण काय भरवायचं असा प्रश्‍न पडत असतो. काही मुलं सतत काहीतरी खातच असतात. अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी सकस आहाराची सवय कशी लावायची असे प्रश्‍न आईला नेहमी पडत असतात.

सकाळी शाळेत जाताना अनेक मुलं नाश्ता करायचे टाळतात त्याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर होतो हा आहार म्हणजे मेमरी ऍक्टिव्हेटर आहे त्यामुळे सकाळचा नाश्ता मस्ट आहे तसेच मुलांना तुम्ही नाश्त्याला काय देता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे बर्‍याचशा महिला आपल्या मुलाला प्रत्येक पदार्थात साखर घालून देतात दुधात साखर, कॉन्फ्लेक्समध्ये साखर, भातात साखर, चपाती रोलमध्ये साखर असा आहार देऊन आई आपल्या मुलाच्या भावी आयुष्यात मधुमेहाचा पाया रचतेय हे तिच्या लक्षातही येत नसेल रेडी टू कुक पॅकच्या जमान्यातील आजकालची मुलं बाहेरचे खाणे, पॅकेट फूड अधिक प्रमाणात खातात घरचे अन्न खाणे टाळतात वेफर्स, समोसा, आइस्क्रीम, चॉकलेट, पॅकेट ड्रिंक, पिझ्झा, पॉपकॉर्न अशा चटपटीत पदार्थांमध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण असते हल्लीची मुलं हे पदार्थ दररोज खात असतात यामुळे अनेक आजारांना ते लहानपणीच आमंत्रण देत असतात


मुलं काही काही पदार्थ अजिबात खात नाहीत उदा कारले, पालेभाज्या.. अशावेळी त्या पदार्थाचे नाव न सांगता तो पदार्थ त्यांच्या समोर ठेवा त्या पदार्थाला जरा फॅन्सी नाव देऊन तो पदार्थ मुलांना खायला द्या मुलं तो आवडीने खातील कारलं हे कारल्यासारखं मुलांच्या समोर आणू नका त्यात थोडा बदल करा पनीर भरलेले कारले किंवा बटाट्याच्या भाजीमध्ये कारल्याचा प्रयोग करून पहा बहुतेक लहान मुलांना व्हॅनीलाचा वास आवडतो अशावेळी व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब त्यांच्या आहारात घाला त्या वासाने मुलं आवडीने तो पदार्थ खातील पदार्थ जास्त आकर्षक दिसावा यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा मुलाच्या जेवणाची प्लेट सजवून ती त्याच्या समोर आणा हो, पण तो पदार्थ करताना त्यात जास्त साखर घालू नका

मुलांच्या वाढीसाठी आहाराबरोबरच पाणीही तितकेच महत्त्वाचे असते पाणी पिण्याकडे अनेक मुलं दुर्लक्ष करतात सहा वर्षांपर्यंतची मुलं क्वचितच संपूर्ण ग्लास पाणी पितात ग्लासातलं एक घोट पाणी पिऊन ते परत पाणी प्यायला येतात अशावेळी मोठ्यांना त्यांचा राग येतो खासकरून आई किंवा शाळेतल्या बाई ‘एकदाच काय ते संपूर्ण ग्लास पाणी पी आणि जा’ असा मुलाला दम भरतात त्याचा परिणाम उलट होतो मुलं पाणी पिणेच सोडून देतात कुठे बाहेर जायचे झाल्यास मुलांना लघवीला होऊ नये याची खबरदारी म्हणून अनेक पालक मुलांना पाणी प्यायलाच देत नाहीत अशा अनेक कारणांमुळे काही मुलं पाणी प्यायचंच सोडून देतात तहान लागल्यावर मुलांना पाणीच प्यायला द्या फळांचा रस, कोला म्हणजे पाणी नव्हे हे लक्षात ठेवा

* आहारात साखरेचे आणि मिठाचे प्रमाण बेताचेच ठेवा

* दररोज संतुलित आहार द्या कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्सचा समावेश आहारात असावा

* फॅट्स, प्रोटीन्सचा समावेश आहारात असावा

* मुलांना सतत पाणी प्यायला द्या पाणी देण्याचा कंटाळा करू नका

* कॉफी आणि कोलापासून त्यांना दूरच ठेवा या पेयांमुळे मुलं आळसावलेली होतात

* त्यांच्या दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करा

* रात्री झोपण्याआधी दूध देणं चांगलं, पण दुधात साखर घालून देऊ नका कारण साखरेने एनर्जी वाढतेेे आणि झोपण्याच्या वेळेस मुलं ऍक्टिव्ह होतात

* जेवणाची वेळ ठरवा त्यांना वेळेवर जेवण द्या जेवणाच्या वेळी स्नॅक खायला देऊ नका

* पॅकेज फूड देणे टाळा घरातला आहार द्या

* तुम्ही बनवलेला पदार्थ दिसायला चांगला आणि चवदार असावा त्यामुळे मुलं तो आवडीने खातील मुलांना सतत पाणी प्यायला द्या पाणी देण्याचा कंटाळा करू नका

सौजन्य - स्वाती पोपट-वत्स (पोदार जम्बो किड्सच्या संचालिका), दै. सामना - ९ मार्च २०११.

No comments: