हल्ली बाजारात सगळीकडे ‘हेल्थ फूडस्’ची धूम आहे. जिथे बघावं तिथे ‘कोलेस्टेरोल फ्री’ , ‘फायबर रिच’, ‘शुगर फ्री’, ‘लो कॅल.’ इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ दुकानाच्या किंवा मॉलच्या प्रत्येक शेल्फमधून आपल्याला खुणावत असतात. यातील बहुतांश पदार्थ एका चमचमीत किंवा एरवी ’ल्हपत्ूप्ब्’ समजल्या जाणार्या पदार्थाचा ‘देवकृपेने’ जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उदा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ. पण जर हे सगळे ‘हेल्थ फूडस्’ खरंच एवढे हेल्दी असते, तर मग जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्यांच्याच आहारात अमुक अमुक टक्के या फूडस्चा समावेश असलाच पाहिजे असेच फर्मान नसते का काढले? ठीक आहे. अगदी एवढ्या टोकाला पण नको जाऊया. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये अशा लाखो ‘हेल्थ फूड’ कंपन्यांनी गेल्या २० वर्षात खूप प्रगती केली आहे (शेअर मार्केटमधे), पण तरी त्या देशातल्या लठ्ठ लोकांची संख्या कमी झालेली नसून वाढलीच आहे. आणि आता हेच आपल्याही देशात घडतंय. कारण मानसशास्त्रासंबंधीच आहे. अमेरिकेतच झालेल्या एका अध्ययनाप्रमाणे, ‘हेल्दी’ लेबल असलेले पदार्थ इतर पदार्थांच्या प्रमाणात जास्त खाल्ले जातात आणि म्हणून त्या हेल्थ फूडमधून मिळणार्या कॅलरीजचं प्रमाण बरंच वाढून लोकं उलट अधिक लठ्ठ होतात.
एक साधं उदाहरण घेऊया. एका डाएट जागरूक व्यक्तीसमोर फ्रेंच फ्राईस किंवा बटाट्याची भजी आणि बेक्ड हेल्थ ठेवलं तर ते हेल्थ स्नॅक्स घेतील. ठीक आहे. आता जर फक्त पहिले दोन विकल्प असते तर त्यांनी काय केलं असतं? जर खरंच हेल्थ कॉन्शियस असतील तर बहुदा पाच फ्रेंच फ्राईस किंवा २-३ भजी खाल्ली असतील. पण याच व्यक्तीने त्या हेल्थ स्नॅक्सचा अर्धा पुडा फस्त केला असता. असे का? कारण त्याला कुणीतरी कुठलं तरी हेल्थ लेबल लावलेलं होतं. याचा अर्थ हा नाही की ते तुम्हाला फसवतायेत. पण आपणच त्या हेल्थी नूडल्सच्या पाकिटावर ’makes two servings’ हे छापलेलं न वाचता ते माणसी एक पाकीट असं खातो आणि अशा वेळी तो ‘हेल्थी’ लेबल असलेला पदार्थ आपल्या आरोग्याला हानिकारक ठरतो.
- सौजन्य:- अमिता गद्रे-केळकर Diet कॉन्सुल्तांत (दै. सामना ५ मार्च २०११.)
No comments:
Post a Comment