Sunday, October 06, 2013

सणासुदीला घ्यावयाचे उखाणे



कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित 

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा. 

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा. 

नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी

वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते. 

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार. 

धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते 

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.
  


*****चैत्रागौरी*****


१) गौरीपुढे लावली  समईची जोडी
    .......च्या नावाची मला आहे गोडी!!!!!
२) गौरीपुढे वाजते सनई
     ....चे नाव घ्यायला मला वाटते नवलाई!!!!!
३) गौरीपुढे मांडली कुलस्वामिनीची तसबीर
     ....चे नाव घ्यायला मी नेहमी अधीर!!!!
४) गौरीची आरास सर्वांना पसंत
     ....चे नाव घेते ऋतू आहे वसंत!!!!!
५) गौरीच्या पुढे केसर-अत्तराचे सडे
     ...चे नाव घ्यायला मी सर्वांच्या पुढे!!!!!
६) गौरीच्या पुढे तबकात ठेवले केसरी पेढे
    ....चे नाव घ्यायला मी नाही घेत आढेवेढे!!!!!
७) गौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी
     ....चे नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी!!!!!
८) गौरीला लावते वाळ्याचे अत्तर
    ....चे नाव घ्यायला मी सदैव तत्पर!!!!!
९) गौरीच्या डोला-याला सोन्याचा कळस
    ....चे नाव घ्यायला मला नाही आळस!!!!!
१०)गौरीच्या पुढं मांडलं फराळाचं ताटं
     ....राव माझी बघतात वाट!!!!!

No comments: