Saturday, October 05, 2013

मालवणी तिखला

    हॉटेल अतिथी बांबूचा (खानावळ) मालवणी माशांचा तिखला

मालवणी भाषेची अविट गोडी आणि जोडीला मालवणी जेवणाचा फक्कड बेत असेल तर खवय्यांना यापेक्षा वेगळा भोजनानंद नाही. कॉन्टीनेंटल, चायनीज, मोगलाई, ईटालीयन अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आज मालवणी जेवणाची आगळीवेगळी ओळख मालवणमधील संजय गावडे यांच्या हॉटेल अतिथी बांबूने (खानावळ) आपली आगळी-वेगळी शैली निर्माण केली आहे. त्यामुळे मालवणास येणारे पर्यटक हॉटेल अतिथी बांबूला (खानावळ) भेट देण्यावाचून जात नाहीत.
मालवण माघी गणेश चौकापासून अवघ्या १०० मीटरवर कचेरी रोडवर हॉटेल अतिथी बांबू खवय्यांचा प्रदीप्त झालेला जठराग्नी थंड करण्यासाठी मालवणी मच्छी जेवण असो वा वडेसागोती, मोरीमटण, विविध चमचमीत खुमासदार पदार्थांचा आस्वाद घेऊन सर्वजण तृप्त होतात. हॉटेल अतिथी बांबूच्या (खानावळ) मालवण बांगड्याच्या तिखल्याची चवच न्यारी, शिवाय पापलेट, सरंगा, सुरमई, कोळंबी, तारले, कर्लीचेही कालवण येणा-यांच्या पसंतीस उतरते. याबरोबर खास नारळाच्या रसात बनविलेली सोलकढीचा फक्कड बेत त्यामुळे मालवणी जेवणाला खुमासदार उपमाही दिलेल्या आहेत.
आचार्य प्र. के. अत्रे यांनी तर गेल्या दहा हजार वर्षात अशी सोलकढी झाली नाही असा शिक्कामोर्तबही केला, याची प्रचिती हॉटेल अतिथी बांबूमध्ये आल्याशिवाय राहत नाही.
याबाबत बोलताना हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे म्हणाले सर्वप्रथम मी हॉटेल चैतन्यमध्ये जवळजवळ १४ वर्षे कुक म्हणून काम केले. यानंतर ग्रीनपार्क मालक बबन तिनईकर यांनी तु स्वत: का करत नाही हा व्यवसाय. यातून मला प्रेरणाही मिळाली आणि हा व्यवसाय सुरु करताना कोकणी माणसाची वृत्तीही आड आली. यातूनही मी मात करीत आज स्वत:च्या जागेत तब्बल २५०० स्क्वे. फूटावर हे हॉटेल उभारले असून जेवणासाठी येणारा प्रत्येक माणूस जाताना समाधानाने जावा हेच मी स्वामी समर्थांच्या कृपेने जपलं आहे. याच माध्यमातून जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा होते. आज मालवणात पर्यटन हंगामात माशांच्या थाळीचे दर गगनाला भिडलेले असताना मात्र अतिथी बांबूमध्ये वर्षाच्या बारामहिने दर सर्वसामान्यालाही परवडतील असे असतात. सुरमई १९० रु., पापलेट २७० रु. बांगडा, मोरीमटण १००-१५०-२०० रु., शाकाहारी ६० रु. असे आहे आणि विशेष म्हणजे संजय गावडे हे सर्व पदार्थ स्वत: बनवितात. तर मग येताय ना, मालवणला मालवणी तिखल्याची चव पाहायला !

Thanks :- - संदीप गोलतकर, fulora, saamana, 051013 

No comments: