Friday, August 05, 2011

गव्हाची ऍलर्जी

उत्तम आरोग्यासाठी भाताऐवजी गव्हाची पोळी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देताना दिसतात. पण जर गव्हाचीच ऍलर्जी असेल तर! वास्तविक आपल्याला गव्हाची ऍलर्जी आहे हे सत्य अनेकांना माहितीच नसतं. उलट पोटात दुखतंय, सततच्या उलट्या होणं आणि पातळ शौचास होणे हा त्रास सहन करीत तात्पुरते वैद्यकीय उपचार घेण्यात धन्यता मानतात.


गव्हाच्या ऍलर्जीमुळे होणार्‍या आजाराला सिलीऍक डिसीज (मत्ग्म् ्र्ग्ेीेा) असं म्हणतात. गहू व गव्हापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये ग्ल्युटीन नावाचा घटक असतो. त्याची ऍलर्जी आतड्याला असते त्यामुळे वर सांगितलेल्या तक्रारी सुरूच असतात. बिस्कीटस्, ब्रेड, पोळी, पाव, पाकिटात मिळणारे कुरकुरीत पदार्थ, नूडल्स, चायनीज फूड, नान, पराठे, पिझ्झा या व अशा सर्वात मैदा किंवा गव्हाचे पीठ असते. हे पदार्थ कटाक्षाने बंद केले की रोग्याच्या तक्रारी मावळतात. ही ऍलर्जी शोधण्यासाठी गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट (उेूदाहूीदत्दुग्ेू) एक कॅप्सूल गिळायला देतात. ती कॅप्सूल लहान आतड्याचा तुकडा (ँग्दज्ेब्) घेऊन बाहेर पडते. हा आतड्याचा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली तपासून व रक्ताच्या चाचण्या करून याचे निदान होते. तज्ज्ञ मग काय, कसे व किती खायचे ते लिहून देतात. रुग्ण मग या शुक्लकाष्ठातून मुक्त होतो.

गव्हाच्या ऍलर्जीने केवळ पचनसंस्थेवर परिणाम होत नाही तर शरीराच्या इतर अवयव व प्रक्रियेवरही होतो.

- लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो.

- सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, हाडांची झीज.

- नैराश्य

- हातपाय दुखणे, सुन्न होणे.

- महिलांना मासिक पाळी अनियमित होणे, गर्भपात, वंध्यत्व

- त्वचेला खाज सुटणे.

याशिवाय मधुमेह, थायरॉईड, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी समस्याही उद्भवू शकतात.

गव्हाची ऍलर्जी आहे म्हणून गव्हापासून बनवलेले पदार्थ टाळून ही समस्या मुळापासून दूर होत नाही. ऍलर्जीची लक्षणं आढळल्यास सर्वप्रथम गॅस्ट्रॉएटरॉलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घ्यायला हवी.

- डॉ. प्रकाश जावडेकर
सौजन्य :- चिरायू, सामना, ०४०८२०११

No comments: