आयुष्यातील आर्थिक उद्दिष्ट्ये गाठायची असतील तर योग्य वेळी आणि योग्य त्या प्रमाणात गुंतवणुकीस सुरुवात करणे आणि त्यातून योग्य तो समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी गुंतवणूक करताना काही मूलतत्त्वे प्रत्येकाने ध्यानात ठेवायलाच हवी. सांगताहेत गुंतवणूक तज्ज्ञ विक्रम कोटक.
* नियमितपणे गुंतवणूक करा : कितीही छोटी असली तरी नियमितपणे गुंतवणूक केल्यास ती येणार्या वर्षांमध्ये संपत्तीचा एक मोठा एकत्रित वाटा तुम्हाला मिळवून देते. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधी असेल तर तुम्हाला त्यातून चक्रवाढ परिणाम मिळू शकतो. * उद्दिष्ट स्पष्ट ठेवा : तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. गुंतवणूक आणि ऍसेट अलोकेशन यांच्या स्वरूपावर हे अवलंबून असेल. तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे लिक्विडिटी आहे, भांडवल संरक्षण आहे, स्थिर परतावा आहे की भांडवली वाढ आहे हे तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे असते.
* तुमची जोखीम क्षमता समजून घ्या आणि तिचे विश्लेषण करा : विविध ऍसेट श्रेणींमध्ये वैविध्यपूर्ण जोखीम आणि संबंधित परतावा पध्दती सामावलेली असते. इक्विटी या मुदत ठेव योजनांपेक्षा अधिक परतावा मिळवून देण्याच्या क्षमता ठेवून असतात, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मुदत ठेवीच्या तुलनेत जोखीमही मोठी असते. तुम्ही अशा ऍसेट वर्गांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की, ठरलेल्या जोखीम पातळीवर तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला पुरेसा परतावा मिळवून देतील.
* दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करा : अल्पकालीन कालावधीत बाजारपेठ ही अगदी दोलायमान असू शकते आणि बाजारपेठेतील ही अनिश्चितता ही तुम्हाला अस्वस्थ करणारा अनुभव ठरू शकते. गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून केली पाहिजे. कारण दीर्घकालीन मार्केट दोलायमानता ही कमी परिणामकारक असते.
* मार्केटला वेळेचे बंधन घालू नका : संशोधनातून असे दिसून आले आहे की जर दीर्घकालीन गुंतवणूक दृष्टिकोन ठेवला आणि अनिश्चिततेच्या काळातही गुंतवणूक कायम ठेवली तर गुंतवणूकदाराला कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची योग्य ती फळे चाखता येतात.
* दर्जावर भर द्या, ट्रेन्डच्या मागे लागू नका : नेहमीच चांगल्या मूलतत्त्वांसाठी ओळखल्या जाणार्या चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच हिताचे असते. निरंतर आणि उच्च प्रतीचे बिझनेस मॉडेल, दूरदृष्टी असलेले व्यवस्थापन आणि उत्तम पूर्वेतिहास तसेच चांगले भवितव्य असलेल्या कंपन्यांची निवड करणे गरजेचे असते.
* घाबरून जाऊ नका : शेअर मार्केटमध्ये घाबरून जाऊ नका किंवा गुंतवणूक काढून टाकायची घाई करू नका, संयम बाळगा. बाजारपेठेत येणार्या स्थित्यंतरांकडे तुमचे दुश्मन म्हणून न पाहता तुमचे मित्र म्हणून पहा. या स्थित्यंतरांमध्ये सहभागी होण्यापेक्षा त्यापासून फायदा कसा होईल याकडे लक्ष द्या.
* तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करा : तुम्ही जीवनाच्या एका टप्प्यावरून दुसर्या टप्प्याकडे जात असताना तुमच्या गुंतवणुकीची ध्येयेही बदलू शकतात. तुमच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन तुम्ही तुमच्या आर्थिक गुंतवणुकीचे मोजमाप करणे गरजेचे असते.
* तुमचा गृहपाठ पक्का करा : गुंतवणूक करताना कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचे सखोल विश्लेषण करणे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम-परतावा या गोष्टी समजून घेणे फार गरजेचे असते. जर तुमच्याकडे आवश्यक स्रोत किंवा कौशल्य नसेल तर मग ही कामगिरी व्यावसायिक तज्ज्ञांवर सोपवा.
(लेखक बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत)
सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.
No comments:
Post a Comment