Saturday, August 20, 2011

दही खा

अनेकांच्या आहारात दही हा पदार्थ असतो अनेकांना तर दही खाल्याशिवाय जमतच नाही फारसे आंबट नसलेले, मधुर आणि चांगले लागलेले दही उत्तम प्रकारचे मानले जाते दही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे


- चांगले लागलेले दही वायुनाशक, मधुर, रक्तपित्तहारक, मेद आणि कफकारक असते

- दही स्वादीष्ट, आंबट, उष्ण, पौष्टिक, स्निग्ध, बलवर्धक, तृप्तीदायक असते

- दह्यात साखर घालून खाल्ल्यास रक्त-पित्त दोष, दाह कमी होतात

- साखर घातलेले दही तृषाशामक, पित्तनाशक, पाचनशक्ती वाढवणारे आहे

- मुरडा झाल्यास दह्यात शंखजिर्‍याची पूड घालून ते खावे

- दह्याची निवळी गोड, हलकी, भूक वाढवणारी, बलदायक, तृप्तीदायक असते

- सूर्योदयापूर्वी दही-भात आठवडाभर खाल्ल्यास अर्धशिशीवर फायदा मिळतो

- दही आणि गूळ खाल्ल्यास कफाचा जोर कमी होतो

दही कधी खाऊ नये

- रात्री दही खाणे टाळावे

- सर्दी, कफविकाराचा त्रास असणार्‍यांनी दह्याचे सेवन टाळावे सर्दी झाली असता दही खाण्याची इच्छा होत असल्यास ताज्या दह्यात मिरपूड आणि गूळ घालून ते खावे

- शरद, ग्रीष्म आणि वसंत ऋतूंमध्ये दह्याचे सेवन टाळावे

- अति आंबट, ज्याच्या सेवनाने दात आंबट होतात, अंगावर शहारे येतात असे दही उपयोगी न पडणारे, त्रिदोष उत्पन्न करणारे असे असते

- आंबट दही रक्त दूषित करणारे असते

सौजन्य:- सामना.

No comments: