Tuesday, August 16, 2011

श्री. व सौ. आयकर

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं सहजीवन नसतं. सहचारिणी बनताना स्त्री आपलं स्वत:चं म्हणून एक आर्थिक आस्तत्व घेऊन येत असते. लग्नानंतर आपल्या जोडिदाराने आपल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी नीट माहिती देणं जरुरीचं आहे. लग्न दोन व्यक्तींचं होत असलं,तरी आजच्या आर्थिक समानतेच्या काळात पती-पत्नी दोघे आपले आर्थिक भूतकाळ एक सामायिक करत असतात. दोघांकडे असणारे असेट्स आणि लायबिलिटिज यांची पूर्ण कल्पना दोघांनाही असलेली उत्तम. गुंतवणुका, घेतलेली कर्जे, काढलेल्या पॉलिसिज, इन्श्युरन्स,मेडिक्लेम यांची माहिती विश्‍वासाने दिलेली नेहमीच चांगली. आयकर कायद्याच्या दृष्टीने पतीचे उत्पन्न पत्नी स्वत:च्या रिटर्नमध्ये दाखवू शकते. परंतु त्याकरिता तिचा उत्पन्नाशी असणारा थेट संबंध स्पष्ट दाखवता आला पाहिजे. पतीचे उत्पन्न जर तिने स्वत:च्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय तिला मिळाले असेल, तर आयकर अधिनियम ६० ते ६४ अन्वये ते उत्पन्न पतीचे म्हणून गणले जाते आणि अर्थातच पतीला त्यावर टॅक्स भरावा लागतो. यालाच क्लबिंग ऑफ इन्कम असे म्हटले जाते. कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या पतीची पत्नी त्याचकंपनीकडून भरघोस वेतन घेत असेल तर तेही त्या पतीचे उत्पन्न समजले जाते. हे ही क्लबिंग होय. एखाद्या असेटमधून कमावलेले उत्पन्न जर पतीने पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले आणि त्यासाठी पत्नीकडून पुरेसा मोबदला घेतला नाही तर अशी ट्रान्सफरही पतीचेच उत्पन्न ठरू शकते. अर्थात लग्नाआधी केलेली ट्रान्सफ़र किंवा घटस्फोटानंतर केलेली ट्रान्सफर मात्र यात मोडत नाही. स्त्रियांना जास्त डिडक्शन असल्याने बर्‍याचदा पती लग्नानंतर पत्नीचे स्वतंत्र रिटर्न भरू लागतात. उदा. स्वत:च्या मालकीचे घर भाड्याने दिले असेल आणि ते भाडे स्वत:चे उत्पन्न म्हणून दाखवत असाल, तर ते घर आपल्या पत्नीला गिफ्ट द्या. आता त्याचे भाडे हे तिचे उत्पन्न असेल आणि अर्थात त्यावर कमी कर भरावा लागेल. (गिफ्ट पती पत्नीला किंवा पत्नी पतीला देऊ शकते. परंतु त्याकरता प्रसंग आयकर खाते फार महत्त्वाचे मानते. उदा. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इत्यादी. इतर वेळी अकाली दिलेली गिफ्ट आयकर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते) गिफ्ट संबंधात जर अडचण येत असेल तर पती पत्नीला कर्ज देऊ शकतो. ते करताना बाजारभावाच्या जवळपास व्याज आकारायला मात्र विसरू नका. गिफ़्ट संबंधात सासू, सासरे व पती सोडून इतर व्यक्तींनी लग्नात दिलेली गिफ्ट आयकर खात्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत नाही.

- कनका घोसाळकर phoenixsoar@rediffmail.com


सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: