शरीराचे रक्ताभिसरण हे रक्तवाहिन्यांमधून होत असते. या रक्तवाहिन्यांमधून वाहणार्या रक्ताद्वारे शरीरातील सर्व पौष्टिक घटक आणि प्राणवायूचा पुरवठा होतो. काही कारणाने रक्ताभिसरण मंदावले, अति वाढले किंवा बंद पडले तर गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. एकंदरीत उत्तम आरोग्यासाठी रक्ताभिसरण योग्य सुरू राहणे गरजेचे आहे. यासाठी जीवनसत्त्व ‘के’ मोलाची भूमिका बजावते.
यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सूर्यफुलाचे तेल, अंड्याचा पिवळा बलक यामधून ‘के’ जीवनसत्त्व मिळते.
उपयोग : हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक. रक्ताभिसरण सुधारते, यकृताचे स्वास्थ्य सुधारते. गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त.

सौजन्य :- चिरायू, सामना.
No comments:
Post a Comment