Monday, July 23, 2012

बेस्ट इंटरनेट ब्राऊजर

इंटरनेट हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द झाला आहे, आपण इंटरनेट संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर वापरतो. इंटरनेट वापरताना इंटरनेट जोडणी, चागले हार्डवेअर/सॉफ्टवेअर याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते व ती म्हणजे चांगले इंटरनेट ब्राऊजर. चांगल्या इंटरनेट ब्राऊजरमुळे आपण सहजपणे इंटरनेट वापरू शकतो व त्याचबरोबर ब्राऊजरमधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपली इंटरनेटवरील अनेक कामे झटपटदेखील करतात.
गुगल क्रोम
सध्या इंटरनेट ब्राऊजर विश्‍वात गुगल क्रोमने जोरदार आघाडी घेतली आहे व नेटिझनमधले सर्वात फेव्हरेट ब्राऊजर म्हणजे गुगल क्रोम.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर गुगल क्रोम चालते.
- याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे याचा वेग, गुगल क्रोमवर कोणतेही संकेतस्थळ अतिशय पटकन लोड होते.
- गुगल क्रोमचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हे ब्राऊजर वापरायला अतिशय सोपे आहे, टॅब हिस्टरी, गुगल सर्चसारखे अनेक शॉर्टकट आपली इंटरनेटवरची अनेक कामे पटपट करतात.
- जर तुम्ही यू — ट्युब किंवा पिकासासारखे गुगलचे इतर सॉफ्टवेअर वापरत असाल तर गुगल तुम्हाला थेट ब्राऊजरमध्येच याचे प्लेग इन देते त्यामुळे तुम्हाला ही सॉफ्टवेअर वापरताना प्रत्येक वेळेस त्याच्या संकेतस्थळावर जावे लागत नाही.
- गुगल क्रोममध्ये सुरक्षिततेच्या साठीदेखील अनेक उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे तुम्ही बिनधास्त कोणतीही ई-सेवा इंटरनेटवर वापरू शकता.

गुगल क्रोमनंतर सर्वाधिक लोकप्रिय असणारे ब्राऊजर म्हणजे मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर ९. संगणक, लॅपटॉप वर इंटरनेट एक्सप्लोरर अजूनही आपले स्थान टिकवून आहे व त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विंडोज संगणकप्रणालीबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर इंस्टाल होऊनच येते त्यामुळे वेगळे ब्राऊजर टाकायची गरज नसते.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल ज्यावर विंडोज प्रणाली आहे अशा उपकरणावर इंटरनेट एक्सप्लोरर चालते. - मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर गुगल क्रोमला वेगाच्या बाबतीत आता बर्‍यापैकी टक्कर देत आहे. - सुरक्षिततेच्या इंटरनेट एक्सप्लोररमध्येदेखील अनेक उपाययोजना केल्या आहेत. - वापरायला सोपे. - बिंग सर्चचा पर्याय देण्यात आला आहे.
मोझिला फायरफॉक्
खरंतर तांत्रिकदृष्ट्या इंटरनेटमधील बेस्ट ब्राऊजर हे मोझिला फायरफॉक्सच आहे परंतु अजून सर्वसामन्य लोकांना याची माहिती नसल्यामुळे अजून याची लोकप्रियता गुगल क्रोम व इंटरनेट एक्सप्लोरर एवढी नाही.
- संगणक, लॅपटॉप, टॅबलेट अगदी मोबाईल अशा सर्वच डिजिटल उपकरणावर चालते.
- वेगाच्या बाबतीत गुगल क्रोम व इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा जास्त वेगात चालते.
- पासवर्ड स्टोर करण्याकरिता पासवर्ड मनेजर, फास्ट कीवर्ड सर्च, डाऊनलोड मनेजर, सेशन रिस्टोरसारखे इनोवेटिव्ह वैशिष्ट्ये.
- अतिशय सुरक्षित.
- ३ सपोर्ट करणारे पहिलेच ब्राऊजर.
- टेक जगातील सर्वात लोकप्रिय ब्राऊजर.

सौजन्य :- अमित घोडेकर, सामना  220712

No comments: