आपला महाराष्ट्र देश हा अनेक गडकिल्ले आणि असंख्य गिरीशिल्पांनी नटलेला भूप्रदेश आहे. ह्या भूप्रदेशात अनेक गिरीशिल्पे खोदली गेली. अशाच एका अनवट डोंगरामध्ये काही गिरीशिल्पे पूर्वीच्या राजमार्गावर म्हणजेच पैठण ते नाणेघाट या मार्गावर टाकळी या गावी खोदली गेली. तीच लेणी आज ‘टाकळी-ढोकेश्वर’ या नावाने आजूबाजूच्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत.
आळेफाटा येथून नगर रस्त्यावर जाऊ लागले की तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही सुंदर लेणी खोदली गेली आहेत. जमिनीच्या सपाटीपासून अवघ्या २०० मीटर उंचीवर कोरलेली ही सुंदर गिरीशिल्पे आजही भटक्यांना खुणावत आहेत. पुण्यापासून अवघ्या ११० कि.मी. अंतरावर आणि मुंबईपासून २०४ कि.मी. अंतरावर ही सुंदर लेणी आहेत.
डोंगरपायथ्यापासून सुमारे ३०० पायर्या चढल्यानंतर आपल्या स्वागताला या लेण्या उभ्या असतात. यामध्ये आपल्याला एक मुख्य लेणे देखील पाहायला मिळते ते लेणे ‘ढोकेश्वराचे’ लेणे म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. ढोकेश्वराचे लेणे हे पूर्वाभिमुख असून आतील गर्भगृहाला पूर्वेकडून व उत्तरेकडून दोन सुंदर दरवाजे खोदलेले आपल्याला पाहवयास मिळतात. हे लेणे म्हणजे चार खांबांचे खोदीव दालनच आहे. या मुख्य लेण्यांमध्ये पूर्वेच्या आणि उत्तरेच्या दोन्ही दारांमध्ये नंदी बघायला मिळतात. गाभार्याच्या बाहेर भव्य अशा गंगायमुनेच्या देखील मूर्ती बघायला मिळतात. तसेच या मूर्तींच्या जवळ एक सूर्यदेवतेची मूर्तीदेखील बघायला मिळते.
या मुख्य लेण्याच्या गाभार्याच्या उजव्या कोपर्यात तांडवनृत्य करणारी शिवाची मूर्ती तसेच अष्टमातृकादेखील सुंदर रीतीने कोरलेल्या बघायला मिळतात. तसेच लेणीच्या मुख्य दारात जय-विजय द्वारपाल आणि बाजूला असणारे इतर देवी-देवता यादेखील आपले लक्ष वेधून घेतात. या मुख्य लेण्याच्या माथ्यावर डाव्या बाजूस सुमारे ७ ते १० मीटर उंचीवर चार दालनांची सुंदर गुहा आहे त्याला आजूबाजूचे लोक न्हावीघर असे संबोधतात.
या गुहेमध्ये १र्६े१६ मीटरचे कातळात खोदलेले एक सुंदर टाके आपले लक्ष वेधून घेते. तसेच एक शिलालेखदेखील आपल्याला पायर्यांच्या जवळ पाहवयास मिळतो. अपरिचित असणारे हे सुंदर लेणे आवर्जून भेट देण्याजोगे आहे.
- अनुराग वैद्य
सौजन्य :- फुलोरा, सामना ०४०११४

No comments:
Post a Comment