वैविधतेने नटलेल्या हिंदुस्थानची खाद्यसंस्कृतीही तितकीच निराळी. डाळ-भात, छोले, दाल मखनी, रोटी इत्यादी पदार्थांवर इथला सामान्य माणूस ताव मारून खातो यात विशेष नाही. पण आता याच डाल-रोटी किंवा हिंदुस्थानी खाद्यपदार्थांची भुरळ अख्ख्या जगाला पडली आहे. म्हणूनच जगभरातल्या आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये हिंदुस्थानने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
हॉटेल्स डॉट कॉम (http://www.hotels.com/) संकेतस्थळाकडून अलीकडेच संपूर्ण जगातील हॉटेल तज्ज्ञांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या आहारशास्त्र सर्वेक्षणातून विविध देशांतील लोकांच्या आहाराबाबतच्या फार उत्सुकतावर्धक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हिंदुस्थानी अन्नपदार्थ जगातील सर्व पर्यटकांना आवडतात. सर्वाधिक आवडीत हिंदुस्थानचे जगात पाचवे स्थान आहे. तर इटलीच्या अन्नपदार्थांनी जगाचे सर्वाधिक आवडते अन्न म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे.
वरील सर्वेक्षण निष्कर्ष जगातील तब्बल ४००० पर्यटकांचे सर्वेक्षण केल्यानंतर काढण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या हिंदुस्थानी खाद्यपदार्थांबाबत काही उत्कंठावर्धक सत्य उघडकीस आले आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा तेथील स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखण्याची वेळ येते तेव्हा हिंदुस्थानी लोक जगातील १८ देशांच्या मागे पडतात. ते नवे पदार्थ चाखून पाहण्याबाबत खूपच नाखूश असतात. कोरियन लोक मात्र प्रवासाचे ठिकाण निवडताना अन्नपदार्थांना सर्वाधिक महत्त्व देत असतात. ४१.६७ टक्के कोरियन अन्नपदार्थ पाहून प्रवास करतात तर ९८.१९ टक्के कोरियन नव्या ठिकाणचे अन्नपदार्थ चाखून पाहतात.
तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचे पर्यटक जगात जातील त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ चाखण्यात उत्सुकता दाखवतात. जपानी मात्र अन्नपदार्थांबाबत खूपच चोखंदळ असल्याचे आढळले आहे. सुमारे ५० टक्के जपानी पर्यटक अन्नपदार्थ आणि पेये पाहून पर्यटनस्थळाची निवड करीत असतात.
हिंदुस्थानी अन्न आवडीचे असलेले जपानी पर्यटक प्रवासात न्याहारी सोबत घेऊनच प्रवास करतात. तर ब्रिटिश लोक चहा सोबत असल्याविना प्रवास करीत नाहीत. ऑस्ट्रेलियातील लोक याचप्रमाणे व्हेजेमाईट घेऊन प्रवास करीत असतात. तर फ्रेंच लोक कॉफी आणि चॉकलेट आपल्या प्रवासाच्या यादीत आवर्जून जोडत असतात. तर प्रवासात पराठा आणि मसालेदार पदार्थ नसल्याबद्दल खंत करणार्या हिंदुस्थानींची संख्या या सर्वेक्षणात ४३ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे.
कुणाला काय आवडतं?
* ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, डच आणि न्यूझीलंडच्या लोकांना हिंदुस्थानी अन्नपदार्थ आवडतात.
* इटलीचा पिझ्झा आणि पास्ता संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.
* फ्रेंच लोक इटालियननंतर हिंदुस्थानी जेवणाला सर्वाधिक पसंती देतात
* आशियातील चिनी, थाय, हिंदुस्थानी जेवणांपैकी आंतरराष्ट्रीय पर्यटक थाय जेवणाची सर्वाधिक मागणी करतात.
* इंग्लंडमध्ये हिंदुस्थानचा चिकन टिक्का लोकप्रिय आहे.
* हिंदुस्थानात मात्र चायनीज जेवण सर्वाधिक लोकप्रिय आहे.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.
1 comment:
Its so surprising that even Indian food is at no. 5 in world, we still run behind Chinese food. When we will stop imitating others & start using proudly our things.
Post a Comment