सगळेच मद्य मुळात ‘फॅटफ्री’ असते. अगदी खरंच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईनसारख्या काही ड्रिंक्समध्ये नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी ‘आहे काय न् नाही काय’ असे. मग तरी, सर्वसामान्य समजाप्रमाणे (हा समज 100% बरोबर नाहीये) ज्या व्यक्ती मद्यपान करतात त्या जाड का असतात?
कुठल्याही मद्यात इथेनॉल असते जो एक अल्कोहोल (केमिकल नाव)चा प्रकार आहे. एरवी आपण काही पण खाल्लं की आपलं शरीर लगेच त्याचे पचन सुरू करते आणि अन्नातल्या ग्लुकोज/शर्करा, फॅट (चरबी), प्रोटिन शोषून घेतले जाते आणि जर यापैकी कुठलाही पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असेल (खाल्लं असेल) तर त्याचे ‘फॅट’ किंवा चरबीमध्ये रूपांतर होऊन त्याचे थर आपल्या शरीरावर जमा होत राहतात. माणसाचं वजन वाढणे ही पण एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. असे एका रात्रीत कोणी 10 किलो वजन वाढवू शकत नाही. जेव्हा आपण महिनोन् महिने अशाप्रकारे गरजेपेक्षा जास्त खात राहतो तेव्हा आपण जाड होतो.
तर मग, अल्कोहोलच्या बाबतीत काय घडतं? समजा तुम्ही बीयर पिताय (फक्त समजा!!) आणि त्याबरोबर फ्रेंच फ्राइज किंवा काजू खाताय (कुठलाही चखणा) अशा वेळी त्या चखणाच्या कॅलरी शोेषून घ्यायच्या आधी अल्कोहोलच्या कॅलरीज ऍब्सोर्ब होऊन वापरल्या जातात. म्हणजे, तुम्ही जो चखणा खाल्लात त्या सगळ्या एक्स्ट्रा कॅलरीज होतात. आणि शिवाय, एका माईल्ड बीयर पॉईंटमध्ये साधारण 150 कॅलरीज असतात. तुम्हीच सांगा फक्त एक पॉईंट बीयर कोण पितंय? जरी व्हिस्की, व्होडका पीत असलात तरी त्यात मिक्स करता त्या जूस, कोला इ.मधे पण भरपूर कॅलरीज असतात. ड्रिंक्स घेताना कॅलरीजचा हिशेब ठेवणं खूप अवघड होतं आणि म्हणून ‘अल्कोहोल कॅलरीज’ खूप जास्त प्रमाणात शरीरात वाढतात. तर एकूण तुमच्या पेयाचा उष्मांक बराच वाढल्यामुळे तुमचे वजन वाढते.
पण मग त्या ‘बीयर बेली’चं काय? 25+ वर्षाच्या पुरुष किंवा स्त्री दोघांच्या शरीरात एक्सेस चरबी जमा होण्याचे ठिकाण म्हणजे ‘पोट’. स्त्रियांच्या शरीरात हिप्सवर पण पुष्कळ प्रमाणात चरबी जमा होण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा अल्कोहोलमधून मिळणार्या कॅलरीज वाढतात तेव्हा त्या सर्व चरबी बनून जाडी वाढवतात. बहुतेक चखणा पदार्थ कॅलरी रिच असतात.
तात्पर्य अल्कोहोलने वजन वाढतं, पण त्याच्यात फॅट किंवा साखर असते म्हणून नाही तर त्याच्यातून मिळणार्या अल्कोहोलिक कॅलरीज खूप असतात आणि जोडीला असलेला चखणा पण त्या आगीत तेल-तुपाचं काम करतं म्हणून.
(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)

No comments:
Post a Comment