मधुमेहाच्या रुग्णांमध्ये येणार्या अंधत्वाचे मुख्य कारण आहे डायबेटिक रेटिनोपॅथी. म्हणजेच मधुमेहाचा नेत्रपटल विकार कित्येकदा रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित ठेवण्याच्या प्रयत्नांत उणावत चाललेली दृष्टी लक्षात येत नाही. हे जर लवकर लक्षात आले आणि त्याचे अचूक निदान केले तर डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे येणारे अंधत्व आपण टाळू शकतो. याविषयी डॉ. अनघा हेरूर यांच्याशी केलेली ही चर्चा.
मधुमेहाचे नेत्रपटल विकार कोणते आहेत?
बॅकग्राऊंड रेटिनोपॅथी - हा सुरुवातीला होणार्या नेत्रपटलावरचा बदल आहे. त्यात रक्ताचे लहान लहान ठिपके व फॅट डिपॉझिट नेत्रपटलावर दिसू लागतात व हा परिणाम वाढू लागतो. कित्येकदा हळूहळू मंदावत जाणारी दृष्टी लक्षात येत नाही. कधी कधी नेत्रपटलावरील मॅकुला या काजावर रक्तवाहिनीतून रक्त पाझरू लागल्यानंतर मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होतो व अंधत्वाची जाणीव होते.
प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी - ही अवस्था मधुमेहामुळे होणार्या अंधत्वाचे मुख्य कारण आहे. जेव्हा या प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथीमध्ये रक्तस्राव होतो तेव्हा रुग्णाला धुरकट दिसू लागते. इथे दुखण्याची जाणीव नसली तरी या अधिक वाढलेल्या पटल विकारामध्ये ताबडतोब उपचार करण्याची आवश्यकता असते.
रक्तवाहिन्यांना होणार्या अपुर्या रक्तपुरवठ्यामुळे काय परिणाम होतात?
रक्तवाहिन्यांना होणार्या अपुर्या रक्तपुरवठ्यामुळे डोळ्यांवर तीन प्रकारे परिणाम होतात १) नव्या व कमजोर रक्तवाहिन्या तयार होतात. यामुळे कमजोर रक्तवाहिन्या फुटतात आणि व्हिट्रियसमुळे होणार्या रक्तपातामुळे पूर्ण अंधत्व येते. (धुरकुट दृष्टी) २) घ्घ्ए वर नवनव्या रक्तवाहिन्या येतात यामुळे काचबिंदू तयार होतो आणि दृष्टी अंधत्वाकडे झुकू लागते. ३) तंतुमय टिश्यू तयार होतात यामुळे व्रण तयार होतो व नेत्रपटलाला ओढ बसते आणि नेत्रपटल सरकते.
इ.इ.. ही निदान परीक्षा का करावी लागते?
१. या कार्यपद्धतीमुळे रक्तवाहिन्यातील गळती किंवा अपुरे रक्ताभिसरण दाखवले जाते.
२) लेझर ट्रीटमेंटसाठी पटलांवरील क्षेत्र अचूक ठरवले जाते.
३) पूर्वी केलेल्या लेझरचे विश्लेषण केले जाते व जरूर असेल तर पुन्हा लागणार्या ट्रीटमेंटची गरज व क्षेत्र ठरवले जाते.
उपचार पद्धती काय आहे?
डायबेटिक रेटिनोपॅथीचे जर लवकर निदान केले तर लेझरने केलेल्या फोटोकोऑग्युलेशनपुढे चालू राहणारे परिणाम थांबवू शकतो. फार वाढलेल्या रेटिनोपॅथीमध्येसुद्धा रुग्णाला येणार्या अंधत्वाची शक्यता उणावू शकते. लेझर ट्रीटमेंट या कार्यप्रणालीमध्ये अतिशय शक्तिशाली लेझरचे किरण पटलांवर केंद्रित करतात. त्यातून जी लेझर एनर्जी येते ती रक्तवाहिन्यांना सील करून गळती थांबवते आणि तेथे लहान लहान व्रण तयार करते. हे व्रण नवनव्या दुष्परिणामी रक्तवाहिन्यांची वाढ थांबवितात आणि ज्या खराब रक्तवाहिन्या आहेत त्यांना आकसवून बंद करतात. जास्त खराब झालेल्या आणि व्हिक्ट्रियसमध्ये रक्तस्राव झालेल्या रुग्णांना व्हिट्रियक्टोमी व त्याचबरोबर इतर आधुनिक शल्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो.
(सौजन्य:- एक मराठी वृत्तपत्र. मला हा लेख 'उपयुक्त' वाटतो.)
No comments:
Post a Comment