डिसक्लेमर : मद्यपान आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक असते. या लेखाचा हेतू - ‘कुठली ड्रिंक घेतलेली चांगली’ हे सांगायचा नसून ‘कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलरीज शरीरात वाढतील?’ हे सांगण्याचा आहे.
कुठल्याही पार्टीपूर्वीचा प्रसंग. ‘अरे, आज मस्त बसू या. उद्या काय हापिसात सुट्टी. उगाच लवकर उठायचे टेन्शन नाही!’ आज आम्ही केपीला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफेला. फुल धमाल.’ ‘आम्ही सगळी मित्रमंडळी नेहमीच त्या बीच रिसॉर्टला जातो.’ बहुतेक लोकांनी अशा पार्ट्या केल्या असतील.
तर मुद्दा ड्रिंक्समधल्या कॅलरीजचा आहे. डाएटवर आहात तर कुठली ड्रिंक घेऊ शकता? कुठलीच नाही. डाएटवर एरवी असतो, आज एक दिवस सूट आहे. तेव्हा जरा ‘लो कॅल लो गिल्ट’ अशी ड्रिंक सांगा ना. लो कॅल लो गिल्ट म्हणजे एक स्मॉल पेग रम/ व्हिस्की/ वोडका/ जीन/ ब्रॅण्डी (‘/’ याचा अर्थ अथवा असा असतो, उगीच गैरसमज नको) आणि पाणी! याहून जास्त काही पण घेतलंत तर ते लो कॅल राहणार नाही! गिल्ट हा खूप वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे त्यावर चर्चा इथे नको, काय?
तरी पण जर कुणाला कॅलरी कॉन्शियस होऊन ड्रिंकची निवड करायची असेल तर ही लिस्ट घ्या. याचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा काय आणि किती घ्यायचं ते...
* ब्रॅण्डी (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज
* जीन (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज
* रम (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज
* वोडका (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज
* व्हिस्की (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज
* व्हाईट वाईन, ड्राय १ ग्लास (१२० मि.ली.) ७९ कॅलरीज
* रेड वाईन १ ग्लास (१२० मी ली) ८२ कॅलरीज
* व्हाईट वाईन, स्पार्कलिंग १ ग्लास (१२० मि.ली.) ९१ कॅलरीज
* व्हाईट वाईन, स्वीट १ ग्लास (१२० मि.ली.) ११३ कॅलरीज
* बियर, लागर, माईल्ड ३३० मि.ली. १५० कॅलरीज
* बियर, स्ट्रॉंग ३३० मि.ली. २२२ कॅलरीज
* रोझे वाइन १ ग्लास (१२० मि.ली.) २३४ कॅलरीज
- (लेखिका अमिता केळकर डाएट कन्सल्टंट आहेत)

No comments:
Post a Comment