Friday, February 11, 2011

मध्य रेल्वेची अजब टिकेट.

कृपया खालील छायाचित्र पहा, नीट पहा, निरिक्षण करा. काय लक्षात येते.



पाहिलात ? काय दिसले ? थांबा. सांगू नका. पुढे काही मुद्द्यांवर चर्चा करू.

१. आपल्यातल्या किती लोकाना लोकलच्या भाड्याची माहिती आहे. अर्थात मी हे फ़क्त आपल्या पीढ़ी बद्दल बोलतोय. कारण आपल्या वडिलांच्या पिढीत त्याना लोकल भाड्याची माहिती असायची. हे मी  यासाठी सांगतो की, जरी तेव्हा PHYSICAL लोकल टिकेट मिळत होती तरी त्या पिढीत AWARENESS  होता.

२. बर टिकेट घेतल्यावर आपल्यातले किती जन त्या टिकेट कडे बघतात. टिकेट घेउन पळत असतात.

३. आता तुम्ही म्हणाल, या चर्चेचा उपयोग काय आता तर स्मार्ट कार्ड आलेत. तर मी म्हणेन माझ्या अंदाजानुसार एकुण रेलवे प्रवाश्यांच्या १०% लोकच स्मार्ट कार्ड वापरत असतील. कारण मी आताही कोणत्याही स्टेशन ला बघितल की लक्षात येते, कितीतरी तरुण - तरुणी रांगेत उभी असतात. तर तुम्ही सांगाल आम्ही रोज थोडाच टिकेट काढून प्रवास करतो, पण माझे म्हणाल तर मी सांगेन स्मार्ट कार्ड रिचार्ज ६ महीने चालते, आणि आपण मुंबई मधे राहून सहा महिन्यात दोनदा तरी टिकेट काढून प्रवास करणार नाही का ?  बघा विचार करूँ.

शेवटी मी फ़क्त एवढेच म्हणेन, आपण पण रेलवे चे ग्राहक आहोत. आता तरी "जागो रे."

No comments: