Saturday, February 12, 2011

फास्ट कॉम्प्युटरसाठी

संगणकामुळे आपली बरीचशी कामे जलद होत आहेत. पण ही गती आणखीन जलद करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर अनेक कामे एकाच वेळेस संगणकावर करता येऊ शकतात. त्यासाठी काही उपयोगी टिप्स, ट्रिक्स आणि शॉर्टकटस्...




शॉर्टकट्स

* मायक्रोसॉफ्ट ऑफिस‘वर्ड’मध्ये जर आपल्याला शब्दांचा फॉण्ट मोठा किंवा छोटा करायचा असेल तर CNTRL + A दाबून शब्द सिलेक्ट करावा व त्यानंतर की बोर्डवरील अथवा - ची की दाबून शब्दाचा फॉण्ट पटकन छोटा किंवा मोठा करता येतो व त्यासाठी टूलबारमधील फॉण्ट साइजच्या बटनावर क्लिक करायची गरज नाही.

* मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये शब्दाखाली अंडरलाइन हवी असेल तर CNTRL + U दाबा. शब्द इटालिक हवा असेल तर CNTRL + I व शब्द बोल्ड हवा असेल तर फक्त CNTRL + B दाबावे. 

* मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला फॉण्ट बदलायचा असेल तर CNTRL + SHIFT + इ एकाच वेळेस दाबल्यास फॉण्ट बदलता येतो.

* परिच्छेदाची अलाइनमेंट बदलायची असल्यास CNTRL + L (लेफ्ट अलाइनमेंट) CNTRL + R (राईट अलाइनमेंट), CNTRL + E (मिडल अलाइनमेंट) तसेच CNTRL + T दाबल्यास जस्टीफाइड अलाइनमेंट करता येते.

* CNTRL + ए दाबून आपण हवे ते डॉक्युमेंट सेव्ह करू शकतो.

* CNTRL + इ दाबून वर्ड डॉक्युमेंटमधील हवे ते वाक्य शोधू शकतो.

* CNTRL + C कॉपी, CNTRL + X कट व CNTRL + V दाबून आपण हवे ते शब्द पेस्ट करू शकतो.

ट्रिक्स

जर आपणास असे वाटत असेल की आपला संगणक प्रमाणापेक्षा जास्त स्लो चालत आहे व संगणकाच्या कॅबिनेटवरील पिवळ्या रंगाची लाईट सतत चालू राहत असेल तर एक सहजपणे करण्याजोगी ट्रिक म्हणजे प्रथम माय कॉम्प्युटरवर क्लिक करा. त्यानंतर हार्ड डिस्क ड्राइव्हमधील हार्ड डिस्कच्या सर्व व्हॉल्युमवर (C:/ D:/ इतर) राईट क्लिक करून प्रॉपर्टीजवर क्लिक करा. त्यानंतर टूल्सवर क्लिक करून ‘एरर चेकिंग’ व ‘डिफ्रॅगमेंट’वर क्लिक करा व स्कॅन व डिफ्रॅगमेंटवर क्लिक करा व सर्व ड्राइव्हवर हीच क्रिया रीपिट करा. शक्यतो आपणास संगणकावर कोणतेही काम करायचे नसताना ट्रिक वापरावी. यामुळे संगणकाच्या हार्ड डिस्कमधील स्टोर केलेली माहिती व्यवस्थितपणे अलाइन केली जाते व जर एखाद्या फाईल किंवा फोल्डरमध्ये काहीही दोष आढळला तर तो तत्काळ दुरुस्त केला जातो. यामुळे आपल्या संगणकाची प्रोसेसिंंग पॉवर तर वाढतेच, पण त्याचबरोबर आपल्या संगणकातील महत्त्वपूर्ण माहितीदेखील सुरक्षित राहते. वर्षभरात किमान २ ते ३ वेळेस डिफ्रॅगमेंटेशन व इतर चेकिंग जरूर करावे.

संगणक, मोबाईल व अनेक डिजिटल उपकरणामध्ये सहजपणे वापरता येईल अशा अनेक टिप्स, ट्रिक्स आणि शॉर्टकट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. जर तुम्हाला कोणत्याही ई- उपकरणातील टिप्स/ट्रिक्स आणि शॉर्टकटस् माहिती करून घ्यायच्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

टिप्स

जर आपणास संगणकाचा वापर करून कोणतेही ऑनलाइन शॉपिंग करायचे असेल तर सर्वात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजी ती वेबसाईट https:// आहे की नाही हे पाहावे. कोणतीही वेबसाईट जी ऑनलाइन शॉपिंगसारख्या सेवा पुरवते व त्यामध्ये आपण आपला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा नंबर वापरणार असाल तर फक्त https:// असणार्‍या वेबसाईटवरूनच असे व्यवहार करावेत. अन्यथा तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.

ब्राऊजरच्या टास्क बारवरदेखील पॅडल लॉकचे चिन्ह आहे की नाही हेदेखील बघणे गरजेचे असते. असे चिन्ह असणार्‍या सर्व वेबसाईटस् या आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी सुरक्षित असतात.

सौजन्य :- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक. माझ्या मते हा लेख "उपयुक्त" आहे.

No comments: