हरभरे वायुकारक असले तरी ते पित्त, कफनाशक, थंड व रक्तविकार नाहीसे करणारे आहेत. म्हणूनच नेहमीच्या आहारात हरभर्याचा वापर भाजी-आमटीसाठी आवर्जून केला जातो. हरभर्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.
* मोड आलेल्या हरभर्यापासून जीवनसत्त्व ‘ब’ मिळते तर कोवळ्या हरभर्याच्या पानापासून जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘क’ मिळते.
* हरभर्याची पानं चवीला आंबट, तुरट असून या पानांची भाजी खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. पोट कमी होतं. हिरड्यांची सूज नाहीशी होते.
* हरभर्याच्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पित्तज्वर कमी होतो.
* हरभर्यापासून बनवलेले गरम फुटाणे खाल्ल्याने मूळव्याधीपासून स्रवणारं रक्त कमी होतं.
* ओले चणे आणि गूळ खाल्ल्याने आवाज सुरेल होतो.
* रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन वर गरम पाणी प्यायल्याने बसलेला आवाज मोकळा होतो.
* हरभर्याच्या डाळीच्या पिठात थोडं पाणी आणि थोडं तूप घालून शरीराला मालीश केल्याने शरीराचा वर्ण सुधारतो. या पिठाने तोंडावर मालीश केल्याने तोंडाचा फिकटपणा नाहीसा होतो. त्वचा मऊ आणि कोमल बनते.
* कसल्याही गाठीवर बेसनाच्या पिठाचा फायदा होतो. बेसनपिठात थोडं गुग्गळ, हळद घालून ते पाण्यात कालवून गरम करून कसल्याही गाठीवर बांधल्याने गाठ बसते. परत येत नाही.
* गुळाच्या थोड्या गरम पाकात हरभर्याची टरफलं टाकून तो लेप हातापायात भरलेल्या लचकेवर लावल्यास लचक बरी होते.
टीप : मूतखड्याचा त्रास असणार्यांनी चणे वर्ज्य करावेत. अतिसेवनाने मलावरोधाचा त्रास होऊ शकतो. कच्चे हरभरे खाताना सोबत खोबरे-गूळ खावे.

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.
No comments:
Post a Comment