Friday, February 04, 2011

आजारातला रस


आजारी व्यक्तीला डॉक्टर नेहमी फळांचा रस पिण्याचा सल्ला देतात. आपणही कुणा आजारी माणसाला भेटायला जाताना फळे किंवा फळांचा रस आवर्जून घेऊन जातो. कारण फळे आरोग्यासाठी जितकी लाभदायक आहेत तितकाच त्याचा रसही, पण कुठल्या आजारात नेमका कुठला रस प्यावा किंवा द्यावा हे अनेकांना माहीत नसते. संत्री, मोसंबी, नारळपाण्यापलीकडे इतर फळांच्या रसांचाही उपयोग आजारपणात येणारा अशक्तपणा घालवण्यास लाभदायक ठरू शकतो.


* सर्दी, पडसेचा त्रास असेल तर अननस, गाजर, संत्री, लिंबू, पालक, कांदा यांचा रस लाभदायक आहे.

* कावीळ झालेल्या रुग्णाला उसाचा रस दिला जातो. उसाच्या रसाने खूप लाभ पोहोचतो, पण त्या जोडीला गाजर, पालक, लिंबू, द्राक्षे व नाशपतीचा रसही द्यावा. कावीळ लवकर आटोक्यात येईल.

* मधुमेहींना फळांचा रस घेताना अनेक पथ्यांचे पालन करावे लागते. बर्‍याचशा फळांमध्ये मूलत: साखर असल्यामुळे अशी फळे व त्यांचा रस प्राशन न करणेच योग्य; पण पालक, गाजर, सलाड व सायट्रस फळांच्या रसाने आराम मिळेल.

* वारंवार डोकेदुखीचा त्रास होणे हादेखील एक प्रकारचा आजारच आहे. पेनकीलर खाऊन किंवा बाम चोळूनही अनेकदा डोकेदुखी थांबत नाही. अशावेळी गाजर, लिंबू, द्राक्षे आणि पालकचा रस प्यायल्याने आराम मिळेल.

* दम्याचा त्रास असणार्‍यांनी अननस, टोमॅटो, लिंबू, कांदा, गाजरचा रस लाभदायक आहे.

* हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी काकडी, लिंबू, द्राक्षे आणि गाजराच्या रसाचे नियमित सेवन करावे.

* लठ्ठ व्यक्तींनी टोमॅटो, पालक, अननस, गाजर, पपई, संत्री व लिंबाच्या रसाचे नियमितपणे सेवन करावे.



(सौजन्य :- एक मराठी दैनिक वृत्तपत्र. हा लेख मला 'उपयुक्त' वाटतो.)






No comments: