Saturday, February 12, 2011

चला बोलू या . . . . ! !

एक खुप जुना मित्र अचानक भेटला. आम्ही दोघही थबकलो. जुन्या आठवणीतुन क्षणात फिरून आलो. उत्साहाने बोलायला सुरुवात केली. ' हाय, कसा आहेस ?'
'मस्त . . . मजेत . . . तू ??'
मी पण . . .' एक शांतता . . . मी 'बाकी?'
तो - 'काही नाही . . . '

पुन्हा शांतता. गप्पांची गाड़ी ब्रेक मारल्यासराखी ठप्प. मग मीच काही बाही इकडच  तिकडच बोलायला सुरुवात केली. त्याचे अधून मधून 'हं, हो का, अरे वा . . . छानच . . . ' अशी तुकड्या तुकड्यातली  उत्तर. पुलंनी म्हटल्यासारख, 'खुप वर्षानी भेटलेला माझा मित्र रेडियो वरच्या बातम्या एकाव्यात, तस माझ बोलण एकत होता तुटक, तुटक.'

आतून मला विचित्र वाटत होत. काय ते मात्र कळत नव्हत. या तुटक तुटक बोलन्याताच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

रात्रि नेहमी प्रमाणे फेसबुक वर ऑनलाइन गेलो, तर हा चाटवर भेटला आणि गम्मत म्हणजे आम्ही खुप 'बोललो'. अगदी भरभरून. सकालच्या भेटिमधे न सापडनारा, हरवलेला 'एलेमेन्ट' परत मिलतोय असा वाटायला लागल. मी हे त्याला म्हटल, (ऑनलाइन!) तर म्हणाला, 'अरे यार, ऑनलाइन मला एकदम सोयीस्कर वाटत. समोर समोर बोलताना विषय सुचत नाहीत. थोड्या वेळेत बोलण थांबत, त्या पेक्षा हे बेस्ट आहे ना ! बघ, आपण सकाली भेटून जेवढ बोललो नाही, तितक आता बोललो की नाही ? ? '

अजुन थोडा वेळ 'ऑनलाइन' बोलूं माझा मित्र ' लोग ऑफ' झाला आणि :) पाठवून मी मात्र तिथेच होतो. . . .

संवादाची माध्यम बदलतायत, आपण नविन काळात आहोत, हे सगळ मला मान्य आहे. मी सुद्धा या बदलल्येला कालाचा एक आनंदी प्रतिनिधि आहे. पण मुळात आपण एकमेकांशी 'बोलतो', ते कशासाठी ? कानावर पडणारा प्रत्येक आवाज आपण साठवून ठेवत असतो. 'आपल्या' माणसंचे आवाज आपल्याला हवे हवेसे वाटतात. ते आपल्याशी बोलण्यासाठी आपण म्हणुनच तल्मलत असतो. 'आवाज' ही त्या आपल्या मानसना जोडणारी महत्वाची खून  असते. आता वाढत्या टेक्नोलोजी पुढे 'असा संवाद साधण्याची काय गरज' वगैरे प्रश्नही पडतील काही जनाना. पण मला हे प्रश्न सारखे भेड़सावत आहेत.  

जवलच्या मित्राला मैत्रिनिशी प्रत्यक्ष बोलताना ओक्वार्ड व्हाव आणि 'ऑनलाइन' भारमभर विषय सुचावेत. ? 'इनहुमन' नाही वाटत हे सर्व. ?

कोल्लेजच्या नाक्यवारून वायाफल वाटनार्या चर्चान्तुनाही व्यक्तिमत्व घडत असत आपल, स्वताची ठाम मत तयार होत असतात. पुढे नोकरी शोधताना आवश्यक असणार्या 'ग्रुप डिस्कशन' चा इतका विनामूल्य 'कोचिंग क्लास' अजुन कुठेच नाहीये हो !  कायम जपून ठेवावेत असे मखमली क्षण, डोळ्यात पाहून न सांगताच एकमेकाना कललेल गुपित, आश्वासक हातांची  घट्ट पकड़, 'विडियो चाट' वरून साधता येइल अस घटता नात ? आहोत त्या पेक्षा आणखी चांगली 'माणस' होण्यासाठी हा संवाद हवाच न ?

चला तर मग, फेसबुक, ओर्कुट, जी-टॉक, मोबाइल या टेक्नोलोजी च्या दुनियेतून बाहेर येऊ थोडा वेळ. बोलू या, एकमेकांशी, प्रत्यक्षात, खरखुर, समोरासमोर 'बोलूया . . . . ' ! !

सौजन्य :- spruhaj@live.in    मग कधी सुरुवात करणार ?

No comments: