Thursday, February 24, 2011

पालकांची शाळा - संवाद साधा


लहान मुलांशी नक्की कसं वागायचं तेच पालकांना कधीकधी कळत नाही. काही पालक शिस्तीच्या नावाखाली मुलांना अक्षरश: बदडतात. तर काही पालक मुलांना मारत नाहीत, पण बोलूनबोलून मुलांच्या भावना दुखावतात. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत कसं वागायचं हे सांगणारं सदर.


मनात वाईट इच्छा नसली तरी पालक आपल्या लहान मुलांचे शालेय जीवन खडतर बनवतात ‘राहुल आणि लीना जर चांगले मार्क मिळवतात तर तू का नाही चांगले मार्क्स मिळवत?’ असे बोलून मुलांचा स्वाभिमान दुखावतात


भावनिक, मानसिक व नैतिकदृष्ट्या कमजोर झालेल्या बालमनाचे पुढे कसे होत असेल? काही मुले आत्महत्येचा विचार करतात, काही हिंसक वर्तन करतात, काही मुले व्यसनाधीन बनतात तर काही मुले नैराश्याच्या गर्तेत सापडतात उशीर होण्याआधीच पालक व गुरूजनांनी योग्य पावले उचलायला हवीत काही मार्गदर्शक सूचना पुढे दिल्या आहेत बालमानसशास्त्र व स्वपरीक्षण यावर आधारित मुलांच्या मानसिक व भावनिक जडणघडणीस हातभार लावणार्‍या या सूचना आहेत

* मुलांचा कधीही अपमान करू नये लहान मुलांनी जरी काही चुकीची गोष्ट केली असेल तरी त्यांच्याशी बोलताना काळजीपूर्वक शब्द वापरा ‘तू वाईट मुलगा आहेस, कारण तू फुलदाणी तोडलीस’ असे म्हणू नका त्याऐवजी ‘वस्तू तोडणे चुकीचे आहे’ असे म्हणा समस्येवर जोर द्या

* परीक्षा, शिक्षण व खेळ यामधील मुलांची गुणवत्ता यांची तुलना वर्गमित्रांशी, भाऊबहिणांशी किंवा स्वतः पालकांच्या गुणवत्तेशी करू नका त्याने मुलांचा आत्माभिमान दुखावेल त्याऐवजी त्याची गुणवत्ता त्याच्या स्वतःच्याच पूर्वीच्या गुणवत्तेशी करा

* ‘हल्ल्यास प्रतिहल्ला’ हा विचार मुलांना कधीही शिकवू नका त्याऐवजी समस्या, वादविवाद सोडवण्याचा प्रयत्न करा एखाद्या मुलाने तुला मारलं तर तू पण त्याला मार, असं शिकवू नका.

* ‘प्रयत्न केले नाही म्हणून अपयश आले’ असे म्हणू नका तुम्ही किती वेळा अपयशी झालात हे विशेष नसून तुम्ही किती वेळा अपयशातून यशाची पायरी आत्मविश्‍वासपूर्वक चढलात हे महत्त्वाचे आहे

* समाजात मानप्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुलांनी मिळवलेली पदके, पारितोषिके यांचा वापर करू नका

* भीती, शिक्षा, स्पर्धात्मक वातावरण यामुळे मुलांचे भावनिक स्थैर्य डगमगेल म्हणून काळजीपूर्वक राहा त्यांना कशाचीही भीती घालू नका, अद्दल घडवण्यासाठी शिक्षा करू नका किंवा सतत कोणाशी तरी तुलना करू नका.

* मी तुझ्या सोबत आहे, धीर धर असे म्हणून त्याचा आत्मविश्‍वास वाढवा

* तुमचे दैनंदिन संभाषण केवळ शाळा, गुण व परीक्षा इथपर्यंतच मर्यादित ठेवू नका मुलांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबद्दल विचारा. त्यांचं जास्तीत जास्त ऐकून घ्या. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचे भावविश्‍व खूप मोठं आहे. ते समजून घ्या.

* आजकाल पालक आपल्या मुलांना मागतील ती वस्तू विकत घेऊन देतात. लॅपटॉपही देतात. पण मांडीवर प्रेमाने बसवायला त्यांना वेळ नसतो. हा विरोधाभास दूर करा.

पोदार जम्बो किड्सच्या संचालिका

No comments: