Wednesday, February 16, 2011

ओठांची मोहोळ खोल ना!

एक सुंदरसं हसू तुमचा दिवस आनंदी बनवत असतं हे हसू चेहर्‍यावर पसरवतात ते ओठ! आकर्षक ओठ आणि प्रसन्न हसू सगळ्यांनाच मिळत नाही, ती दैवी देणगी आहे. पण वैद्यक शास्त्राने इतकी कमाल केली आहे की शस्त्रक्रिया करून (पाऊट सर्जरी) ओठांचा आकारही आजकाल बदलता येतो. शस्त्रक्रिया न करताही फिलर्स वापरून ओठ भरीव करण्याचीही आधुनिक पद्धत आजकाल वापरली जाते. सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ओठांची शस्त्रक्रिया करण्याचा ट्रेण्ड आहे. बारीक ओठांना भरीव करून ओठांची मोहोळ प्रत्यक्षात खोलणार्‍या या शस्त्रक्रियांविषयी माहिती देत आहेत इवॉल्व मेड स्पाचे कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट डॉ अभिजित देसाई


पाऊट सर्जरी म्हणजे काय?

ओठांचा आकार बदलण्यासाठी केली जाणारी ही एक उपचार पद्धती आहे स्त्रियांच्या सौदर्यामध्ये ओठांना खूप महत्त्व आहे. ओठ उठावदार दिसण्यासाठीच स्त्रिया लिपस्टिक लावतात. परंतु, हा झाला वरवरचा उपाय. परंतु ओठांचा आकार कायमचा रुंद करण्यासाठी ओठ किंचित बाहेर काढण्यासाठी एक कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करता येते. तिलाच पाऊट सर्जरी म्हणतात.

ही शस्त्रक्रिया कशी करतात?

जसे वय वाढते तसे आपले ओठ बारीक होत जातात शिवाय काहींचे ओठ जन्मत: पातळ असतात. अशावेळी काही महिला ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात या सर्जरीसाठी किमान दीड तास लागतो सर्जरी झाल्यावर रूग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो शस्त्रक्रिया केल्यानंतर ओठांना थोडी सूज येते पण ही सूज काही दिवसांत निघून जाते

शस्त्रक्रियेव्यतिरिक्त दुसरी एखादी पद्धत आहे का?

ओठांवरील दुसरी उपचार पद्धती म्हणजे डर्मल फिलर्स ही एक विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे यात ओठांच्या बॉर्डरवर इंजेक्शनने एक द्रव्य सोडले जाते या उपचार पद्धतीने ओठांना सूज येत नाही केवळ दहा मिनीटात हा उपचार होतो तसेच फिलर्स भरल्यानंतर वेदनादेखिल अत्यंत कमी होतात

कोणत्या वयोगटातील महिला या उपचार पद्धती करू शकतात?

साधारण २५ ते ४५ या वयोगटातील महिला असा उपचार करून घेऊ शकतात.

कोणत्या उपचार पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जाते?

फिलर्स उपचार करून घेण्याकडे महिलांचा कल अधिक असतो डर्मल फिलर्सच्या सहाय्याने त्या आपले ओठ जाडजूड करून घेतात कारण याद्वारे लवकर अपेक्षित रिझल्ट मिळतो पाऊट शस्त्रक्रियेपेक्षा फिलर्स वापरणे अधिक सोयीस्कर आहे.

या पद्धतीने ओठांचा आकार बदल्यानंतर तो तसाच राहतो का?

पाऊट सर्जरीने ओठांचा आकार तसाच राहतो याने ओठ कायम भरलेले दिसतात तर फिलर्सचा परिणाम जवळजवळ वर्षभर राहतो आणि वर्षभरानंतर पुन्हा एकदा ओठांचा आकार हवा तसा करून घेता येतो

यासाठी किती खर्च येतो?

फीलर्ससाठी सुमारे तीस हजार रुपये खर्च येतो तर पाऊट सर्जरीसाठी सुमारे ७० हजार रूपये खर्च होऊ शकतो
सौजन्य  :- bandra@evolvemedspa.org

No comments: