चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला जीवसत्त्वांचा ‘डोस’ मिळणे गरजेचे आहे. औषधं, इंजेक्शनमधून अनेकजण ही व्हिटॅमिन्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण रोजच्या आहारातही आपण पुरेसी जीवनसत्त्वे मिळवू शकतो. एकंदरीतच कुठल्या अन्नपदार्थातून कुठले जीवनसत्त्व मिळू शकते, प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य, अभावाने उद्भवणारे आजार याची माहिती देणारे हे ‘जीवनसत्त्वाची बाराखडी’ हे नवीन सदर...
लहानपणी अभ्यासाचा श्रीगणेशा करताना पाठीवर पहिलं अक्षर गिरवले जाते ते ‘अ’ त्याप्रमाणे जीवनसत्त्वांच्या बाबतीत विचार करताना नेहमीच ‘अ’ जीवनसत्त्वापासूनच सुरुवात केली जाते. शरीरातील चयापचय प्रक्रियेसाठी ‘अ’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते.
कशातून मिळेल?
शुद्ध रूपात प्राण्यांपासून मिळते. तर कॅरोटिनच्या रूपात अनेक भाज्यांमधून मिळते. उदाहरणार्थ पालक, गाजर, रताळे, कोबी याशिवाय अंड्याचे बलक, दूध, दही, लोणी.
उपयोग
रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्वचा, दातांचे आरोग्य सुधारते, हाडे बळकट होतात.
कमतरतेमुळे होणारे आजार
झिरोप्थेलमिया, दातांचे आजार, एनिमिया, किडनी स्टोन.
लक्षणे
त्वचा कोरडी होणे, रातांधळेपणा, वजन कमी होणे, सूज चढणे.

सौजन्य:- सर्वांसाठी सर्वकाही असणारे एक मराठी वृत्तपत्र.
No comments:
Post a Comment