Saturday, February 19, 2011

संगणकाची काळजी कशी घ्यावी ?

* मॉनिटर बंद करणे :


जेव्हा संगणक वापरात नसेल तेव्हा त्याचा मॉनिटर बंद करा. हे थ्ण् मॉनिटरसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. कारण ते खूप वापरल्यानंतर जळू शकतात किंवा त्यावरचे काही भाग खराब होऊ शकतात.

* संगणक नेहमीच चालू ठेवा :

बर्‍याच लोकांना हे माहीत नसतं की, सारखा सारखा कमी वेळेपुरता संगणक चालू करणं आणि बंद करणं हे धोकादायक आहे. म्हणूनच संगणक शक्यतो जास्तीत जास्त वेळ चालू ठेवा.

* स्वच्छता महत्त्वाची :

तुमचा संगणक कधी कधी ध्नफू - म्हणजेच खूप गरम - होऊ शकतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धूळ आणि कचरा. म्हणूनच तुम्ही नेहमी तुमचा संगणक आतून तसंच बाहेरून स्वच्छ ठेवायला हवा. एका स्वच्छ फडक्याने कमीत कमी आठवड्यातून एकदा संगणक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला संगणकाच्या आतील भागांसंबंधी योग्य माहिती असेल, तर तुम्ही केसिंग उघडून त्याच्या आतील भागसुद्धा ६ महिन्यांतून एकदा स्वच्छ करू शकता. हे सर्व करण्यापूर्वी संगणक बंद करायला विसरू नका.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र  

No comments: