ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 27 फेबु्रवारी रोजी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने केलेले हे एक मुक्तचिंतन...
चामुंडाराये करविले ते ‘मी जरा टेक्स्ंिटग करतोय. मी तुला नंतर पिंगवतो’... 2600 हून जास्त वर्षांचा इतिहास असणारी, काळाप्रमाणे बदललेली ही माझी मराठी भाषा... मराठी बांधवांप्रमाणेच तीही प्रेमळ ...जगभर फिरताना तिने सगळ्यातले सगळे चांगले आपल्यात सामावून घेतले... म्हणूनच आज मराठीत असंख्य संस्कृत, फारशी, उर्दू इतकेच काय इंग्रजी शब्ददेखील आहेत ... याउलट, जगभरात जवळपास 10 कोटी लोक मराठी बोलतात. जगाच्या प्रत्येक प्रदेशात निदान एक तरी मराठी माणूस भेटेलच भेटेल. नव्या जगांचा संयोग करणारी ही भाषा आहे...
* - * - *
ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि खेबुडकरांनी सोळावं वरीस धोक्याचं ठरवलं... विरोधाभासच ना! पण हीच खरी गंमत आहे... ताडपत्री आणि बोरू ते आता मी टाईप करतोय तसं युनिकोड... मराठी भाषा काळाप्रमाणे बदलत राहिली आणि म्हणूनच टिकून राहिली... समृद्ध झाली... ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांनी मराठीतून कसे जगावे ते जगाला सांगितले... चिपळूकरांनी समाजशास्त्र सांगितले... तर गडकरी, अत्रेंनी चार घटका करमणूक दिली... आयुष्याचे सर्व रंग सर्व अनुभव या मराठीने मुक्तपणे उधळले... तीन ज्ञानपीठ पुरस्कारांबरोबरच विविध भाषांत होणारे मराठीचे भाषांतर ही त्याचीच प्रचीती आहे... मग, नुकतंच गुलजारसारख्या ग्रेट कवीला सौमित्रच्या मराठी कवितांची भुरळ पडते यात नवल ते काय!
* - * - *
‘धरून सोडला’,‘डोक्याला शॉट लावू नको’,‘पायात चप्पल घाल’ अशी एक ना अनेक वाक्ये .. ही खरी मराठीची गंमत आहे . मराठी भाषा दर कोसाला बदलते असे म्हणतात ... अर्थात त्यात मग एखादी कोल्हापुरातली पुल्लिंगी वस्तू नाशकात स्त्रीलिंगी होते ही मजा... शिव्यांचेदेखील एवढे भांडार इतर कोणत्या भाषेत असेल असे वाटत नाही... मराठी माणूसच तसा आहे रांगडा ..मर्दाचा पोवाडा , नजाकतदार लावणी... गगनभेदी आरोळी .... हीच ती खरीखुरी मराठी... इतर भाषेतली नाटके मराठीत आणताना त्या भाषेच्या तोडीस तोड ‘कोणी घर देता का घर’ असे संवाद हा मराठीचा इतिहास आहे... आणि म्हणूनच, 24 तास इतर कोणतीही भाषा बोलायला लागली तरी मनातले मराठीपण तसेच अभेद्य आहे, सह्याद्रीसारखे....
* - * - *
मराठी भाषा दिन... वरचे सारे आजच आठवायला हवे असे काही नाही... सचिनने मराठीत भाषण दिले, लताबाईंचा आवाज जगभर गेला की ते आठवते... पण ते तेव्हाच आठवावे असे नाही... मराठीची ज्योत कायम मनात तेवत हवी... एखादा छानसा लेख वाचला, एखादी झणझणीत शिवी ऐकली की क्षणभर वाटून गेले पाहिजे... की येस, मला अभिमान आहे की माझ्याकडे ही भाषा आहे, बोलण्यासारखे खूप आहे, पण गंमत अशी आहे की या भाषेची महती सांगायला शब्दच बापडे अपुरे पडतात... असो असे असायलाही भाग्य लागते... शेवटी इतकेच की या भाग्याचा आनंद घ्या, मराठीचा झेंडा खांद्यावर घ्या आणि जग जिंका... बॅकग्राऊंडला गाणे वाजत असेलच...
‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...’’

सौजन्य :- vinayakpachalag@gmail.comमी मराठी
No comments:
Post a Comment