तर भ्रष्टाचार म्हणजे काय ? कुणी सांगू शकेल याचा अर्थ ! सध्या आपण २जी स्पेक्ट्रम, आदर्श सोसायटी, राष्ट्रकुल स्पर्धा अश्या घोटाळ्यांच्या बद्दल भरपूर एकतोय. तर घोटाळे म्हणजे तरी काय. तर घोटाळे हे सुद्धा भ्रष्टाचाराचेच रूप आहे. काय तुम्ही नाही सांगू शकत "भ्रष्टाचार" म्हणजे काय ते. चला आपण भ्रष्टाचारावर चर्चा करू. माझ्या मते भ्रष्टाचार हा दोन प्रकारांचा असतो.
१. भ्रष्ट + आचार
२. भ्रष्टांचा + आचार
पूर्वी भ्रष्टाचार हा शब्द स्पृश्य लोक अस्पृश्यांचा भेदभाव करताना वापरत असत. पण आता याच शब्दाला आर्थिक रूप मिळाले आहे.
तर वरील १ प्रमाणे भ्रष्ट + आचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेला चुकीचा आर्थिक आचार (वर्तणूक). आता एखाद्या व्यक्तीने भ्रष्ट + आचार करण्यासाठी वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे कि, व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, अतिरिक्त आर्थिक गरज, आर्थिक उधळणीची सवय वगैरे.
उदा : २ जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धा.
तर वरील २ प्रमाणे भ्रष्टांचा + आचार म्हणजे अश्या भ्रष्ट व्यक्तींनी एकत्र येऊन केलेले चुकीचे आर्थिक आचार (वर्तणूक). याचे मात्र एकाच कारण असू शकते. जर सर्व खात आहेत तर आपण तरी मागे का राहावे.
उदा : आदर्श सोसायटी.
तर अश्या या भ्रष्टाचाराचा अनुभव आपण पदोपदी घेत असतो. आता आपण पण या भ्रष्टाचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आहोत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मला एक छोटेसे उदाहरण द्यावेसे वाटते.
आपण काम करत असलेल्या संस्थेसाठी आपल्याला कधी ना कधी तरी संस्थेच्या कामा निमित्त प्रवास करावा लागतो. समजा, आपण बसने प्रवास केला असेल तर आपण बस भाडे जास्त लावतो, किंवा रिक्षा भाडे लावतो. म्हणजे समजा बस भाडे रु. ६ असेल आणि आपण रु. ८ लावत असू तर? अर्थात काही जण चालत जातात (मुंबई सारख्या ठिकाणी) व बस भाडे लावतात, तर मी म्हणेन चालत जाऊन योग्य बस भाडे रु. ६ लावणे हा भ्रष्टाचार नसून, चालत किंवा बसने जाऊन रु. ८ भाडे लावणे हा भ्रष्टाचार आहे.
कामाच्या रगाड्यातून वेळ मिळेल तेव्हा विचार करून पहा, आपण १ किंवा २ यापैकी कोणत्या कक्षेत बसतो, कि दोन्ही कक्षांमध्ये बसतो.

No comments:
Post a Comment