Thursday, February 24, 2011

टिप्स

* टोमॅटो नरम झाले असतील तर त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवावेत ते कडक होतील


* लोखंडी, पितळी भांड्यामधला स्वयंपाक अधिक रुचकर आणि सत्त्वयुक्त होतो शक्य असल्यास ही भांडी वापरावी

* जेवण किंवा दूध फ्रिजमधून काढून लगेच गरम करू नका थोडावेळ रुम टेंपरेचरला आणा आणि मगच गरम करा

* रश्श्याच्या भाजीला कमी तेलात तवंग आणायचा असेल तर भाजीत थोडी साखर घाला भाजीवर छान तवंग येईल

* मटन, चिकनच्या रश्श्यामध्ये थोडेसे बाजरीचे पीठ भाजून घाला हलकासा घट्टपणा येतो

* कोरड्या भाजीला चांगला सुगंध येण्यासाठी दालचिनी आणि वेलची घालावी भाजी घालण्याआधी सुरूवातीलाच तेलात हे पदार्थ घालावेत

* बीर्यानी, पुलाव करताना त्या भांड्याला तूपाचा हात लावा भात भांड्याला चिकटत नाही

सौजन्य  :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: