या आर्थिक वर्षात आणखी एक सवय प्रत्येक नवीन गुंतवणूकदाराने स्वत:ला लावून घ्यायची
आहे ती म्हणजे प्रश्न विचारून उत्तर शोधण्याची आणि त्याची नोंद ठेवण्याची. या
नोंदवहीत काय लिहायचे त्याचे काही नमुने तुमच्यासमोर ठेवतो आहे.
दिनांक २८ मार्च-टीव्हीवर सिएट टायर कंपनीच्या दोन जाहिराती. माझ्या नोंदवहीतील प्रश्न क्रमांक १: नेहमी मोठ्या टायरची जाहिरात करणारी कंपनी अचानक मोटारसायकलच्या टायरच्या जाहिरातीवर प्राईम टाईमला (या वेळेत जाहिरातीचा खर्च जास्तीत जास्त असतो). काही कोटी रुपये का खर्च करते आहे?
दिनांक १ एप्रिल : एनडीटीव्हीवर दुचाकी वाहनांच्या विक्रीचे आकडे दाखवत आहेत. बजाज ऑटो -हीरो होंडा-टीव्हीएस या तिन्ही कंपन्यांनी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त दुचाकी वाहने विकली. आता सोबतचा तक्ता बघा. म्हणजेच यासोबत दुचाकी
टायरची विक्री पण वाढणार. नोंदवहीतील दुसरा प्रश्न : दुचाकी वाहनांची किंमत दरवर्षी वाढत असताना त्यांची विक्री का वाढत जाते आहे? नोंदवहीत लिहिलेले उत्तर : पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे. दुचाकी वाहनाच्या विक्रीला शहर आणि ग्रामीण असा फरक नसल्यामुळे. चार लाखांत चारचाकी वाहन घेऊन वाढणारी सामाजिक प्रतिष्ठा एक लाखापेक्षा कमी किमतीत घेता येते म्हणून. रोजगारासाठी घरापासून दूर राहण्यापेक्षा दुचाकीवरून प्रवास करून घरी राहणे जास्त श्रेयस्कर आहे म्हणून. तरी पण माझ्या नोंदवहीतला पहिला प्रश्न अनुत्तरित आहे. त्या प्रश्नाला आणखी काही उपप्रश्नांची जोड मिळाली आहे. उपप्रश्न क्रमांक १ : या दुचाकी वाहनांना कोणती कंपनी ओईएम टायर देत असेल?ओईएम म्हणजे शोरूममधून ग्राहकाच्या हातात वाहन येते तेव्हा वापरले जाणारे टायर. मग टायर कंपन्या फक्त ओईएमवर अवलंबून असतात का? याचे उत्तर ताबडतोब मिळाले. ओईएमखेरीज दुसरे मार्केट आहे रिप्लेसमेंटचे. या मार्केटची विक्री कोणत्या कंपनीची हातात आहे? प्रश्नाचे उत्तर एका तक्त्यात मिळाले.
किती कंपन्या दुचाकी वाहनांचे टायर बनवतात?
दिनांक ४ एप्रिल : एका वाहिनीवर राजीव बजाज यांची मुलाखत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बजाज ऑटोचे मोटारसायकल नव्या वर्षातील उद्दिष्ट बेचाळीस लाख मोटारसायकल विकण्याचे आहे. जर हे उद्दिष्ट एका कंपनीचे असेल तर इतर कंपन्याही त्यांचे उद्दिष्ट वाढवणार असतील.
कदाचित माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले आहे. ट्रक टायरचे महागडे मार्केट सध्याच्या मंदीमुळे सुस्त आहे.अशा वेळी दुचाकी वाहनाच्या कित्येक पटीने वाढणार्या बाजारात आपले महत्त्व वाढवण्यासाठी सिएट टायरने जाहिरातीची मोहीम सुरू केली आहे. पुन्हा एकदा एक नवीन प्रश्न उपप्रश्न : ही मोहीम आताच का? थोड्या विचारांती योग्य उत्तरही मिळाले. मान्सूनच्या आसपास टायर बदलण्याचे मनसुबे पार पाडले जातात. थोडक्यात ओईएम आणि रिप्लेसमेंट या दोन्ही बाजारात विक्री वाढवण्याचा सिएटचा प्रयत्न आहे. आता मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, परंतु नवा प्रश्न उभा राहिला आहे.मी सिएटचे समभाग घेऊ की इतर कंपन्यांचे?
टायर कंपनीचे समभाग घेऊ की दुचाकी वाहन बनवणार्या कंपनीचे?
उत्तर या भागात मी लिहीत नाही. याचे कारण असे की, या अंकाचा हेतू नोंदवही कशी बनवावी याचा नमुना देण्याचे आहे. एका जाहिरातीने मला बरेच प्रश्न विचारले. मी उत्तरे शोधली. मी निर्णय घेतला.त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. प्रत्येक गुंतवणूकदाराने ही प्रश्नोत्तरी बनवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यात येणार्या अडचणींचे निराकरण विरोपाद्वारे करून घ्यावे.

shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना
No comments:
Post a Comment