Sunday, October 16, 2011

नफ्याचं गणित - १३



पिणार्‍याला पिण्याचे कारण हवे असते तसेच सट्टा करणार्‍यांना सट्ट्याचे कारण हवे असते.


कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचे गणित पहिल्या-दुसर्‍या-तिसर्‍या तिमाही ताळेबंदावरून बांधून बाजारात समभागाची खरेदी-विक्री केली जाते. हे ताळेबंद जाहिरातीतून पेपरात येत असल्यामुळे त्याची बातमी बनते. बाजारात अपेक्षेचे रूपांतर बातमीत झाले की समभागाचे भाव कमी होतात. अपेक्षेने वाढणारे भाव अपेक्षापूर्तीनंतर कमी होतात. थोडक्यात बातमीपेक्षा अपेक्षा बाजाराला हलवते.
अशीच अपेक्षा निर्माण करणारी आकडेवारी असते ऍडव्हान्स टॅक्सची. कंपन्या दर तिमाहीला उत्पन्नाचा अंदाज बांधून आगाऊ आयकर भरतात. या आर्थिक वर्षाच्या शेवटी नफा किती झाला हे मे महिन्यात जाहीर होणार्‍या ताळेबंदावरून कळेल, पण ऍडव्हान्स टॅक्सच्या आकड्यावरून वर्ष संपण्याच्या अगोदर त्याचा अंदाज येतो. जास्त कर म्हणजे जास्त नफा असा साधा अंदाज बांधून काही दिवस काही लोकप्रिय समभागात सट्टा होतो. काही गुंतवणूकदारांना विक्री करून नफा जमा करता येतो इतकेच या आकडेवारीचे महत्त्व. प्रत्यक्षात नफा नुकसान किती हे नंतरच कळते, परंतु पिणार्‍याला पिण्याचे कारण हवे असते तसेच सट्टा करणार्‍यांना सट्ट्याचे कारण हवे असते.

Saujanya:- Fulora, Samana.

No comments: