लोडशेडिंगने
नागरिक हैराण झाले असताना भारनियमन शुल्कही बिलातून माथी मारणार्या वीज
मंडळ अधिकार्यांना आज शिवसेनेने जोरदार झटका दिला. वीजपुरवठा खंडित करता
मग शुल्क कसले आकारता, असा जाब शिवसैनिकांनी विचारताच ताळ्यावर आलेल्या
अधिकार्यांनी बिलातून भारनियमन शुल्क वगळण्याचे लेखी आश्वासन दिले.
नवी मुुंबईला भारनियमनमुक्त करण्यासाठी शहरातील वीजग्राहकांकडून ३७.४० पैसे भारनियमन शुल्क म्हणून जास्त घेतले जातात. असे असूनही सध्या नवी मुंबईत विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, विजय माने, विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, भाविसेचे जिल्हासंघटक सोमनाथ वास्कर, नगरसेवक विजयानंद माने, दिलीप घोडेकर, सतीश रामाणे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, परशुराम ठाकूर, विभागप्रमुख श्रीकांत हिंदळकर, ज्योतिराम भालेकर, दर्शन भणगे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज वाशी येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर धास्तावलेल्या वीज मंडळ प्रशासनाने जुलै २०११ पासून ग्राहकांच्या बिलात भारनियमन शुल्क बंद केले जाईल असे लेखी आश्वासन दिले.
... तर तीव्र आंदोलन छेडू
सध्या ऑक्टोबर महिना असल्याने तापमान वाढले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील लोडशेडिंग लवकरात लवकर बंद करण्यात यावे, अन्यथा जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरप्रमुख विजय माने यांनी यावेळी दिला.

सौजन्य :- सामना १३१०२०११.
No comments:
Post a Comment