Thursday, October 06, 2011

बार बार टूल बार

इंटरनेट वापरताना आपल्याला अनेक संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतात. मग प्रत्येक वेळेस ब्राऊझरमध्ये ठरावीक संकेतस्थळांचे नाव टाईप करणे व मग आपल्याला हवे ते संकेतस्थळ उघडून बघणे हे खूप कंटाळवाणे होऊन जाते. यावर आता एक बिनतोड उपाय आला आहे व तो म्हणजे ब्राऊझरमध्ये आपल्या आवडीचे व गरजेचे टूल बार इन्स्टॉल करून घेणे. एकदा का गरजेचा टूल बार इन्स्टॉल केला की फक्त टूल बारमधील हव्या त्या सेवेवर क्लिक केले की, गरजेचे संकेतस्थळ आपल्यासमोर हजर.

टूल बारची वैशिष्ट्ये


- पॉपअप ब्लॉकर : इंटरनेटचा वापर करताना आपण असंख्य संकेतस्थळांना भेटी देतो. या संकेतस्थळांवर असंख्य बिनकामाचे पॉपअप (जाहिरातीसाठी वापरले जाणारे थोटे संकेतस्थळ) आपणासमोर प्रकट होतात. ही पॉपअप कधी कधी डोक्याला त्रास देतात. टूल बार इन्स्टॉल केल्यामुळे गरज नसलेल्या पॉपअपची कटकट कायमची दूर होते व त्याचबरोबर आपण सर्व पॉपअपची हिस्ट्री टूल बारमधून बघू शकतो.


- ऑटो फॉर्म फिलर : बहुतांशी टूल बारमधील हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपण इंटरनेटचा वापर अनेक इ-सेवांसाठी करतो. तेव्हा आपणास आपली वैयक्तिक माहिती प्रत्येक वेळेस भरावी लागते. ऑटो फॉर्म फिलरचा वापर करून आपण आपली साधारण माहिती थेट सेव्ह करू शकतो. एकदा का ही माहिती सेव्ह झाली की, त्यानंतर कधीही तुम्ही कोणतीही इ-सेवा वापरली की, ऑटो फिलरमधील माहितीचा थेट वापर त्या संकेतस्थळावर करू शकता.

- हाय ऍलर्ट सर्च टेक्स्ट : जेव्हा आपण कोणत्याही सर्च इंजिनमध्ये एखाद्या की-वर्डचा सर्च करीत असतो. तेव्हा आपल्यासमोर असंख्य संकेतस्थळांची माहिती दाखविली जाते, पण त्यातून आपल्या गरजेच्या की-वर्डची माहिती कोणती हे शोधणे जिकिरीचे होते. टूल बारमधील हायलाईट सर्च टेक्स्टमुळे सर्व की-वर्ड संकेतस्थळावर बोल्ड स्वरूपात आपल्यासमोर दिसतात.

- झूम इन झूम आऊट : एखाद्या संकेतस्थळावरील विशिष्ट भाग जर आपणास मोठा किंवा छोटा करायचा असेल तर टूल बारमधील झूम इन झूम आऊट हे आपल्याला उपयोगी पडू शकते.

- सर्च मेजर सर्च इंजिन : आपण एखादा की-वर्ड इंटरनेटवर ब्राऊझरमधून फक्त एका वेळेस एकाच सर्च इंजिनमधून सर्व करू शकता, परंतु टूल बारमुळे एक की वर्ड एकाच वेळेस जर आपणास गरज असेल तर अनेक सर्च इंजिनमधून सर्च करता येतो. उदा. गुगल, याहू, एमएसएन इ.

- पॉप्युलॅरिटी इंडेक्स (PI) : एखादे संकेतस्थळ इंटरनेटवर किती लोकप्रिय आहे हे आपणास टूल बारमधील PI इंडेक्समुळे सहज शक्य होते. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या बनावट संकेतस्थळावर भेट दिली तर तुम्हाला त्याच्या PI इंडेक्समुळे हे सहज समजू शकते.

- क्लीप बोर्ड मॅनेजर : आपण संगणकावर काम करताना अनेक गोष्टी अनेकदा कट, कॉपी, पेस्ट करतो, क्लिप बोर्ड मॅनेजरचा वापर करून आपण कट सेव्ह करू शकतो. त्यामुळे हवा तेव्हा हवा तो कट केलेला भाग पुन्हा वापरता येतो.

- RSS फिल्डस् : RSS फिल्डस्चा वापर करून आपण आपल्या नेहमी भेट देणार्‍या संकेतस्थळावर जर कोणतीही नवी माहिती अपलोड झाली असेल तर ती पटकन बघू शकतो. किंबहुना RSS फिडस् आपणास आपल्या आवडत्या संकेतस्थळावर वरील सर्व नवीन माहिती सादर करीत राहील.

- इतर वैशिष्ट्ये : डिक्शनरी, सर्च बुक मार्क सेव्ह करणे, हवामानाची अद्ययावत माहिती बघणे, ब्लॉगची माहिती शोधणे, ई-मेल ऍलर्ट, ऍण्टी स्पाय, लेटेस्ट बातम्या बघणे इ. सर्व माहिती आपणास टूल बारमुळे रिअल टाइम बघता येते.

टूल बार वापरताना

- आपणास आवडणारा कोणताही टूल बार ठरवा व गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनमधून सर्च करा. त्यानंतर टूल बारच्या संकेतस्थळावरून तो डाऊनलोड करून आपल्या संगणकावर इन्स्टॉल करा.

- टूल बार इन्स्टॉल झाल्यावर तो तुमच्या ब्राऊझरमध्ये वरच्या बाजूस आपणास दिसेल व त्याचा थेट वापर जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही करू शकता.

इंटरनेटवरील ‘सुपरहिट’ टूल बार

- गुगल टूल बार - रेटिंग्ज (*****)

- याहू टूल बार - रेटिंग्ज (****)

- विंडोज लाईव्ह टूल बार - रेटिंग्ज (****)

- फेसबुक टूल बार - रेटिंग्ज (****)

- डिग टूल बार - रेटिंग्ज (*****)

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना.

No comments: