Sunday, October 16, 2011

वरळीत फुलले ‘सुंदर’ उद्यान





वरळीत फुलले ‘सुंदर’ उद्यान

शिवसेनेच्या विकासकामांचा धडाका सुरू असून वरळी पोलीस कॅम्प येथे अडीच एकर भूखंडावर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे ‘सुंदर’ उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाला आद्य शंकराचार्यांचे नाव देण्यात आले असून रविवारी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्यानाचे लोकार्पण होणार आहे. (छाया : सचिन वैद्य)


सौजन्य:- सामना १६१०२०११.

वरळी येथे पोलीस कॅम्पच्या अडीच एकर जमिनीवर पालिकेने अत्याधुनिक आद्य शंकराचार्य उद्यानाची निर्मिती केली आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या रविवारी या उद्यानाचे उद्घाटन होणार आहे.
शिवसेनेचे नगरसेवक मधुकर दळवी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारले आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, कार्यक्रमासाठी ऍम्पी थिएटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन गझिगो, मेडिटेशन सेंटर आणि सुगंधी फुलांची झाडे लावण्यात आली आहेत.
रविवार, १६ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता आद्य शंकराचार्य उद्यान, पोलीस कॅम्प, वरळी येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महापौर श्रद्धा जाधव, माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता, पालिका सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, बेस्ट समिती अध्यक्ष सुनील शिंदे, बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष, विष्णू कोरगावकर, आमदार नीलम गोर्‍हे, प्रभाग समिती अध्यक्ष जगदीश सावंत, विभागप्रमुख अजय चौधरी आणि महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख जीवबा केसरकर यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नगरसेवक मधुकर दळवी यांनी दिली.
 


सौजन्य:- सामना १४१०२०११.

No comments: