दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.
म्हणजे बघा पूर्वीपासूनच एका पट्टमैत्रिणीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्यावेळी पित्याने ठरवलेल्या श्रीमंत वराला नाकारून आपल्या पसंतीच्या गरीबाशी (लौकिकार्थाने विष्णूपेक्षा शंकर साधेच!) लग्न करून त्याच्या बरोबर 'लंकेची पार्वती' बनून राहण्याचे धैर्य दाघवणारी उमा ही आजच्या समस्त स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य ह्या विचारांची उद्गातीच ठरते.
आजच्या काळातही जिथे अजूनही मुलीने पित्याच्या बोट दाखवलेल्या वराशी विवाह करण्याचाच आग्रह धरणार्या घरातून प्रेमविवाह म्हणजे 'अब्रह्मण्यम' तेव्हा ही या हिमगौरीने 'जब प्यार किया तो डरना क्या' ह्या ध्येयाने तिने शंकराला मिळवले.
आजच्या जमान्यातही आपल्या मनपसंत जोडीदाराला लग्नासाठी 'प्रपोज' करण्याचं धाडस किती जणीत असतं? उगीच पोकळ उसासे टाकत मनात झुरत सोन्याच्या पिंजर्यातील बंद मैना होण्यापेक्षा मोकळ्या रानातील राघूबरोबर त्याच्या हृदयाची स्वामिनी बनून राहण्यासाठी भरारी होण्याचे सामर्थ्य किती जणीत असते?
उमेने शंकराचे महत्त्व जाणले होते त्याच्या विरक्त वृत्तीवरच ती भाळली अन शेवटपर्यंत त्याच्या बरोबर कैलासावरच राहिली. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठात रुसवे फुगवे केले नाहीत की आपल्या श्रीमंत माहेराचे गोडवे गायले नाहीत, बापाच्या घरून संपत्ती आणली नाही.
वास्तविक विष्णू त्यांच्या जातीचा (जात म्हणजे तरी काय एकाचप्रकारचे संस्कार, सांपत्तिक स्थिती याने निर्माण होणारे 'स्टेटस') त्याच्याशी लग्न करून ती सुखाने वैभवात लोळू शकली असती. मात्र, तिने स्वबळावर आणि आपल्या पतीच्या सामर्थ्यावर कैलासावर राज्य केले अन ती आदिमाता म्हणून गौरवली गेली. शंकराच्या तेजाने ती झाकोळली तर नाहीच पण उलट 'उमा-महेश्वरा'चा जोडा तर 'अर्धनारी नटेश्वर' म्हणून शोभला.
आजच्या काळातल्या मुलीच नव्हे तर स्त्रियाही हरतालिकेचे व्रत करतात अगदी निरंकार, रात्रभर जागरण करून व्रत करण्याची प्रथा उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण ते जागरण आपण योग्य गोष्टी करून, सत्कार्य करून किंवा किमान इतरांची कुचेष्टा न करता करतो का? उपवासाचा देवाच्या जवळ वास, त्याची आराधना हा उद्देश थोडाफार तरी साध्य होतो का? घरातील राजकारण त्या एका दिवशीही आपण थांबवतो का? हा विचार प्रत्येकीने करायला हवा.
सुरवातीला ज्या गुणावर भाळून आपण 'त्या'च्याशी लग्न केले नंतर तोच भांडणाचा मुद्दा का होतो? नवर्याची निस्पृहवृत्ती पाहून लग्न करणारी, नंतर तीच त्यालाच लाच घेण्यास प्रवृत्त करते असं का? आजच्या काळात जर स्त्रीने ठरवले तर भ्रष्टाचार बंद होईल. फक्त त्याची सुरवात प्रत्येकीने घरापासून करावी.
माझा तुझा नातेवाईक, मित्र-मैत्रीण असा भेद न करता जर योग्य व गरजू माणसाला मदत करण्याचा गुण मनाचा कोतेपणा कमी करून थोडासा वैचारिक, सामाजिक विचार प्रत्येकीने केला तर समाजात शांतता, प्रस्थापित होईल. उन्नती व विकास होईल. टाळी एका हाताने वाजत नाही पार्वतीला 'शिव' मिळाला तसाच प्रत्येकीला योग्य जोडीदार व महेश्वराला 'उमा' मिळाली तशी प्रत्येकाला सुज्ञ व धोरणी पत्नी मिळाली तरच जोडा शोभून दिसतो.
चांगलं माणूस मिळत नसतं ते व्हावं लागतं. अनुभवाने, सहवासाने, चांगल्या वाचनाने, चांगल्या आचरणाने मनातली किल्मिष काढून सहजीवन जगल्यास प्रत्येक जोडी आदर्श होऊ शकते. दोघांनी वादात एकेक पाऊल मागे जावे, सामंजस्य, योग्य सुधारणांत वाईट प्रथा सोडण्यात एकेक पाऊल पुढेच राहिले तर आपल्याबरोबर समाजही सुधारेल.
हे सणवार व्रत वैकल्य जोखड, जबाबदारी किंवा बोजा न वाटता त्यातून आत्मशुद्धी, आत्मिक उन्नती साधली तरच त्याचा खरा उद्देश्य साध्य होईल.

सौजन्य:-
आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.
नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.
‘इंटरनेट’ संपर्कासाठी वापरण्यात येणार्या माध्यमांपैकी एक प्रमुख माध्यम. इंटरनेटने जग जवळ आले. केवळ एका क्लिकवर घरबसल्या जगाच्या कानाकोपर्यातील कशाचीही माहिती मिळवता येते. जगात कुठेही आपल्या संदेश ई-मेलद्वारे क्षणार्धात पाठविता येतो. कोणतीही खासगी संस्था, सरकारी आस्थापना, कॉर्पोरेट कंपन्या यांची माहिती हवी तेव्हा त्यांच्या वेबसाईटवरून घेता येते. जग जोडणार्या या माध्यमाचे फायदे अनेक आहेत, पण त्यापेक्षा या माध्यमाचा गैरवापर करणार्यांची संख्या अधिक आहे. ज्याप्रमाणे एका क्लिकवर जगाची माहिती मिळवता येते त्याचप्रमाणे ‘हॅकर्स’ एका क्लिकवर तुमचा ई-मेल आयडी किंवा वेबसाईट हॅक करतात. ‘हॅकर्स’ हे संगणक क्षेत्रात उच्चशिक्षित असतात. केंद्र सरकारची े.ुदन्.ग्ह ही वेबसाईट नुकतीच हॅक करण्यात आली. यावर पाकिस्तानी चिथावणीखोर संदेश टाकण्यात आले. ही वेबसाईट कुणी आणि कशी हॅक केली याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयची वेबसाईटदेखील हॅक करण्यात आली होती. जवळपास महिनाभरानंतर ती पुन्हा सुरू झाली. वेबसाईट हॅक करण्याच्या घटना काही नवीन नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशभरात तब्बल ३६७ वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणार्या बंगळुरूमध्ये दरवर्षी हॅकिंगचे सर्वाधिक गुन्हे नोंद होतात. हॅकर्स एखादे सॉफ्टवेअर अथवा व्हायरसचा वापर करून वेबसाईट हॅक करतात. वेबसाईटवर संबंधित संस्था किंवा तिच्या पदाधिकार्यांची वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर हॅकर्सद्वारे केला जाऊ शकतो. संस्थेच्या सर्व डेटा नष्ट करून तिचे नुकसान व्हावे या उद्देशानेदेखील वेबसाईट हॅक केल्या जातात. त्यामुळे वेबसाईटवर स्वत:ची किंवा संस्थेची इत्थंभूत माहिती देताना काळजी घेण्याची गरज आहे. वेबसाईटबरोबरच ई-मेल आयडीदेखील हॅक करण्यात हे हॅकर्स माहीर असतात. अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. अंबानी यांच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांनी ई-मेलवरून पाठविलेली माहिती हे सर्व चोरी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले. याआधीदेखील अनेक कंपन्या आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे ई-मेल हॅक करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. एखादा नातेवाईक, मित्र किंवा कंपनीतील सहकारी अशा ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर हॅकर्स ई-मेल आयडी उघडतात आणि त्याद्वारे ई-मेल पाठविला जातो. ओळखीचे नाव दिसल्याने आपणही कोणताही विचार न करता मेल उघडतो. या मेलमध्ये माहितीऐवजी एखाद्या हॅक करणारा सॉफ्टवेअर किंवा व्हायरस असतो. संगणक अचानक हँग झाल्यानंतर आपल्या लक्षात येते. हॅकर्सची आणखी एक मोडस् ऑपरेंडी आहे. ‘तत्काळ मदतीची गरज’ तुमजा मित्र परदेशात अडचणीत आहे. त्याचे पाकीट व इतर सामान चोरीला गेले असून घरी परतण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला मदत करण्यासाठी काही रक्कम दिलेल्या बँक खात्यात जमा करा’ असा ई-मेल वाचून आपण संभ्रमात पडतो. नेमका त्याच वेळी मित्राशी संपर्क न झाल्यास आपणही त्यावर सहज विश्वास ठेवतो आणि मित्रासाठी काही रक्कम मेलमध्ये उल्लेख केलेल्या बँक खात्यात जमा करतो, पण प्रत्यक्षात मित्र हा परदेशात गेलेलाच नसतो त्यावेळी फसवणूक झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा ई-मेल देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आला होता. त्यामुळे ई-मेल हाताळताना जरा जपून. खासगी माहिती ई-मेलवर अथवा वेबसाईटवर ठेवू नका. तुमची एक चूक भविष्यात धोकादायक ठरू शकते. हॅकर्समुळे गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानला सुमारे एक हजार कोटींचा फटका बसला आहे. आर्थिक नुकसानीची ही रक्कम आपण काळजी न घेतल्यास वाढू शकते. इतकेच नाही तर देशातील सरकारी संस्थांची माहिती मिळवून समाजकंटक या माहितीचा गैरवापर करू शकतात.

रात्री बारा वाजतात आणि घराघरात, मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष सुरू होतो. कृष्णभक्तांचा गोकुळाष्टमीचा उपवास, श्रीमद्भगवद्गीतेचं पठण पूर्ण होतं आणि सगळेच कृष्णाच्या नामस्मरणात दंग होतात. उत्सवाचं खास आकर्षण असतं ते यावेळी तयार होणारा सात्त्विक आहार. कृष्णाच्या आवडीचे पदार्थ हे गोकुळाष्टमी आणि त्यानंतरच्या दहीहंडीच्या दिवशीचा खास मेन्यू असतो.
न्यूझीलंडमध्ये ‘हरे कृष्ण’चा गजर, कॅनडामध्ये बाळकृष्णाचा पाळणा, पॅरिसमध्ये गंगाजल घालून दूध-मधाचा प्रसाद.... आश्चर्यकारक आणि तितकंच अद्भुत... हिंदुस्थानात मनोभावे साजरा होणारा कृष्णजन्माचा सोहळा इतरही अनेक देशांत उत्साहाने साजरा केला जातो. आज आपण कृष्णभक्तीने रंगलेल्या अशाच काही देशांची सफर करणार आहोत. 
अनेकांच्या आहारात दही हा पदार्थ असतो अनेकांना तर दही खाल्याशिवाय जमतच नाही फारसे आंबट नसलेले, मधुर आणि चांगले लागलेले दही उत्तम प्रकारचे मानले जाते दही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे
- गोड पदार्थ पाहिला की तो खाण्याची इच्छा अनावर होते. अशावेळी त्या गोड पदार्थाचा लहानसा तुकडा उचला. म्हणजे कमीतकमी गोड तुमच्या पोटात जाईल. शिवाय दुसर्यांदा गोड मागून खाताना तुम्ही लाजेखातर मागणार नाही. 

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं सहजीवन नसतं. सहचारिणी बनताना स्त्री आपलं स्वत:चं म्हणून एक आर्थिक आस्तत्व घेऊन येत असते. लग्नानंतर आपल्या जोडिदाराने आपल्या आर्थिक व्यवहारांसंबंधी नीट माहिती देणं जरुरीचं आहे. लग्न दोन व्यक्तींचं होत असलं,तरी आजच्या आर्थिक समानतेच्या काळात पती-पत्नी दोघे आपले आर्थिक भूतकाळ एक सामायिक करत असतात. दोघांकडे असणारे असेट्स आणि लायबिलिटिज यांची पूर्ण कल्पना दोघांनाही असलेली उत्तम. गुंतवणुका, घेतलेली कर्जे, काढलेल्या पॉलिसिज, इन्श्युरन्स,मेडिक्लेम यांची माहिती विश्वासाने दिलेली नेहमीच चांगली. आयकर कायद्याच्या दृष्टीने पतीचे उत्पन्न पत्नी स्वत:च्या रिटर्नमध्ये दाखवू शकते. परंतु त्याकरिता तिचा उत्पन्नाशी असणारा थेट संबंध स्पष्ट दाखवता आला पाहिजे. पतीचे उत्पन्न जर तिने स्वत:च्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय तिला मिळाले असेल, तर आयकर अधिनियम ६० ते ६४ अन्वये ते उत्पन्न पतीचे म्हणून गणले जाते आणि अर्थातच पतीला त्यावर टॅक्स भरावा लागतो. यालाच क्लबिंग ऑफ इन्कम असे म्हटले जाते. कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या पतीची पत्नी त्याचकंपनीकडून भरघोस वेतन घेत असेल तर तेही त्या पतीचे उत्पन्न समजले जाते. हे ही क्लबिंग होय. एखाद्या असेटमधून कमावलेले उत्पन्न जर पतीने पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले आणि त्यासाठी पत्नीकडून पुरेसा मोबदला घेतला नाही तर अशी ट्रान्सफरही पतीचेच उत्पन्न ठरू शकते. अर्थात लग्नाआधी केलेली ट्रान्सफ़र किंवा घटस्फोटानंतर केलेली ट्रान्सफर मात्र यात मोडत नाही. स्त्रियांना जास्त डिडक्शन असल्याने बर्याचदा पती लग्नानंतर पत्नीचे स्वतंत्र रिटर्न भरू लागतात. उदा. स्वत:च्या मालकीचे घर भाड्याने दिले असेल आणि ते भाडे स्वत:चे उत्पन्न म्हणून दाखवत असाल, तर ते घर आपल्या पत्नीला गिफ्ट द्या. आता त्याचे भाडे हे तिचे उत्पन्न असेल आणि अर्थात त्यावर कमी कर भरावा लागेल. (गिफ्ट पती पत्नीला किंवा पत्नी पतीला देऊ शकते. परंतु त्याकरता प्रसंग आयकर खाते फार महत्त्वाचे मानते. उदा. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इत्यादी. इतर वेळी अकाली दिलेली गिफ्ट आयकर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते) गिफ्ट संबंधात जर अडचण येत असेल तर पती पत्नीला कर्ज देऊ शकतो. ते करताना बाजारभावाच्या जवळपास व्याज आकारायला मात्र विसरू नका. गिफ़्ट संबंधात सासू, सासरे व पती सोडून इतर व्यक्तींनी लग्नात दिलेली गिफ्ट आयकर खात्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरत नाही.
हे एवढे मोठे अवाढव्य जग चालते तरी कसे? काय खरं आणि काय खोटं? काय चांगले आणि काय वाईट? हे जग हवापाण्यावर तर चालतेच, पण त्याहून जास्त ते चालते आपल्या मानण्यावर. दगडाचा देव बनवणारे आपण तसेच देवाचा दगडही आपणच करतो. तासन्तास पूजा-अर्चना करून पाणावलेल्या डोळ्यांनी नवस मागतो आणि मग छिन्नी-हातोड्याने त्या नवसाच्या धन्याला मोडून काढतो. जगात तसे पाहिले तर बरेच काही आपणच ठरवतो आणि नशिबावर ओझे लादत राहतो. एका गावातला पुजारी देवळातली पूजा आटोपून घरच्या दिशेने निघाला, घाईत हाताला लागलेला शेंदूर पुसायचा राहून गेला. वाटेत एका दगडाला त्याने हात पुसले आणि पुढे निघून गेला. त्याच वाटेवरून प्रवास करणार्या काहींनी तो दगड पाहिला. शेंदूर लागलेल्या त्या दगडात त्यांना स्वयंभू देवाचे तेज वाटले. त्यांनी त्या दगडाला नमस्कार केला, फुले वाहिली. येणार्या-जाणार्या सर्वांनी तेच केले आणि हात पुसलेल्या दगडाचा देव झाला. देव सगळीकडेच असतो. त्या दगडातही असणारच. असे अनेक हात पुसलेले दगड आयुष्यात आढळतात. त्यांना नमस्कार करणे काही वाईट नाही. ऑफिस, घर... सारीकडे हे असेच होते. मनाचा खेळ संपतच नाही. आपण ‘टाईम प्लीज’ म्हणून काही काळ थांबतही नाही. हे असेच, तो तसाच... हा हट्ट आपणच आपल्याशी करीत राहतो. नकारार्थी विचार, गैरसमज व त्रागा यात सत्य कुठेतरी राहूनच जाते. आपण विसरतो की, प्रसंगाहून महत्त्वाची ‘माणसं’ असतात. आपण ठरवले तर आनंद, आपण ठरवले तर दु:ख. आपण ठरवले तर जग आपले आणि आपण ठरवले तर आपणही जगाचे नाही. सगळीच माणसं चांगली नसतात. म्हणून प्रत्येकाची परीक्षा घेऊ नका. सगळेच दगड देव नसतील म्हणून सगळ्या दगडांना लाथ मारून पाहू नका. त्यापेक्षा सर्व दगडांना नमस्कार केलेला परवडला. चांगले माना, आनंद माना, सुख माना, प्रेम माना, आपलेपणा माना, शांतता माना, सत्य माना. कारण मानण्यावरच सारे काही निर्भर आहे. तुम्ही मानाल तसे तुमचे आयुष्य. मानले तर जग, नाही तर बंदिशाळा, मानले तर प्रवास, नाहीतर फरफट आणि मानला तर देव, नाहीतर फक्त दगड!
आपण शेअर बाजारात आलो आहोत नफा कमवायला. चर्चा करून वाद जिंकू, पण नफा मिळणार नाही. यावर उपाय म्हणजे रेटिंग एजन्सीनी आयपीओला कोणता दर्जा बहाल केला आहे ते बघायचे आणि अर्ज करायचा.
आता डीमॅट अकाऊंट उघडायचे कसे? हा प्रश्न आलाच. डीमॅट म्हणजे डिमटेरीअलाइज्ड खाते. कागदी शेअर हातात ठेवण्याऐवजी शेअर या खात्यात जमा करता येतात .जवळजवळ सगळेच दलाल ट्रेडिंग अकाऊंट उघडताना डीमॅट अकाऊंट उघडून देतात. असे खाते उघडण्यात आपली आणि दलालाची सोय असते. याखेरीज बर्याचशा सरकारी आणि सहकारी बँका पण डीमॅट खाते उघडून देतात. हे खाते उघडल्यावर शेअरची खरेदी विक्री सुरू करण्यासाठी तुम्ही सज्ज झालात असे समजा... 
सीताफळ हे झाड मूळात वेस्ट इंडिजचे सीताफळात व्हीटॅमिन सी, फायबर, कर्बोदके आणि खनिजे याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतेे सीताफळाच्या झाडांना सहसा कीड लागत नाही सीताफळाचा औषधी उपयोगही करण्यात येतो
उत्तम आरोग्यासाठी भाताऐवजी गव्हाची पोळी खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देताना दिसतात. पण जर गव्हाचीच ऍलर्जी असेल तर! वास्तविक आपल्याला गव्हाची ऍलर्जी आहे हे सत्य अनेकांना माहितीच नसतं. उलट पोटात दुखतंय, सततच्या उलट्या होणं आणि पातळ शौचास होणे हा त्रास सहन करीत तात्पुरते वैद्यकीय उपचार घेण्यात धन्यता मानतात.
पावसाने कमालच केली आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवलाच आहे. त्यातून तप्त मनांना वेगळ्या वातावरणाच्या गुंगीने चिंब भिजवले आहे. हवामानाचा आपल्यावर खूप परिणाम होतो. पावसाळ्यात सकाळी उठावेच वाटत नाही, काम होत नाही. सारीकडे ‘मळभ’ असेच वाटते. काहींना ताजेतवाने वाटते, खूप छान वाटते. कुणाला पांघरुणात घुसून अंधारात पडणे मानवते तर कुणाला बाहेर पडून भिजायला. खरं तर आपल्याला काय वाटते हे बाहेरच्या हवामानावर ठरत नाही. ते ठरते आपल्या मानसिक हवामानावर. मानसिक हवामान म्हणजे आपला ‘मूड’. ते बिघडले की हिरवागार निसर्गदेखील वणव्यासारखा जाणवतो. मूड चांगला असेल तर वाईट काळही उत्सव वाटू शकतो. हा ‘मूडच’ आपल्या आयुष्यात फार मोठा खेळ खेळत असतो. भले भले मूडच्या आहारी जाऊन जीवनाचे मातेरे करतात. निसर्गातील हवामान आपल्या हातात नसते. ऊन-पावसाला अजून तरी स्वत:चे स्वातंत्र्य आहे. पण आपल्या मानसिक हवामानाला मात्र आपण हवे तसे बदलू शकतो. हवे तेव्हा बदलू शकतो. हे हवामान कोणतीही वेधशाळा सांगू शकणार नाही. पण आपल्या वागण्यात आपल्या मनातील पाऊस-उन्हाचा पत्ता सर्वांना लागतच असतो. मूडमुळे काम चुकवू नका, माणसांना दुखवू नका, विचारांमध्ये हरवू नका, नकारार्थी दिशा धरू नका, वादळ, वारा, ऊन, पाऊस जेवढे निसर्गात अनिवार्य आहे तेवढेच मानसिक पातळीवरही. मनातील हवामानही बदलत राहाते. कधी चांगले तर कधी कटू वाटते. जसे असेल तसे स्वीकारा. त्याचा आनंद घ्या. वादळात अडकण्याची मजा घ्या, माणसांच्या स्वभावांची मजा घ्या. उन्हाची ऊब अंगावर ओढा, काळजी करणार्यांची ऊब जाणवेल, त्रास जाणवणार नाही. पावसात भिजा, तुफान प्रसंगांचे थेंब झेला, नाचा त्या पावसात. तुमच्या मनाचे हवामान तुम्हीच ठरवणार. ते तुम्हीच ठरवा. पण नियमित पणे स्वत:ला सांगत राहा-