Saturday, December 24, 2011

हायफाय टेक्नॉलॉजी

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वायरलेस जोडणारी सिस्टीम म्हणजे वायफाय. रेडिओ वेव्हज्वरून वायफाय ऑपरेट करता येते. यामुळे हाय स्पीड इंटरनेट सर्विसेस वापरता येत असून आजकालच्या नवीन रेंजच्या फोनमध्ये याचा जास्त वापर केला जातो. वाय फाय सिस्टिम १९९७ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंंग (IEEE)द्वारा विकसित करण्यात आला.


वाय फाय सिस्टीम घेणे हल्ली अतिशय कमी खर्चाचे झाले आहे. यामुळे मॅक डी, कॉफी शॉप्स किंवा अनेक हॉटेल्समध्ये नेटवर्क उपलब्ध होते. ८०२.११ स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीमध्ये वायफाय चालविले जाते. हे वापरण्याची योग्य रीत लक्षात घेतली तर याचे फायदेच असल्याचे लक्षात येईल. हे एक सेफ्टी टेक्नॉलॉजी असून हे वापरताना आपला डेटा हॅक होण्याची चिंता नसते.

- वायरलेस कनेक्शन सिस्टीम वायफायमध्ये असल्यामुळे माहिती घेणे आणि पाठविणे अगदी सोपे झाले आहे.

- वायफाय वायरलेस असल्याने केव्हाही कुठेही इंटरनेट नेटवर्क उपलब्ध होऊ शकतं. यामुळे नेटवरून कामे करताना कोणतीही अडचण येत नाही.

- वायफाय चालविण्यासाठी 2.4 GHZ& 802.11B स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. आधुनिक तंत्रज्ञानानुसार रेडिओ वेव्हज् टेक्नॉलॉजी समोर आल्याने याचाही वापर होतो.

- पर्सनल कंम्प्युटर, व्हिडीओ गेम कन्सोल, स्मार्टफोन, आयफोन, डिजीटल ऑडीओ प्लेअर यांना वायरलेस इंटरनेटने जोडता येते. त्यामुळे कुठेही जाताना ट्रान्सफॉर्मरची गरज भासत नाही.

- वाय फाय ही डिवाइस टु डिवाइस कनेक्टिव्हिटी असूनPAN (personal area network) LAN (local area network) WAN (wide area network) या नेटवर्कमध्ये थेट कनेक्ट होते.

- वाय फायमध्ये वायरलेस राऊटर वापरला जातो. त्यामुळे त्या नेटवर्क क्षेत्रातले नेटवर्क स्थिर राहते.

- 802.11B, 802.11G या रेंजमधले राऊटर जास्त वापरले जातात.

- या राऊटरची रेंज ३२ मी (१२० फूट) इनडोअर आणि ९५ मी (३०० फुट) आऊटडोअर इतकी आहे.

- सध्या त्रिकोणा या वाय फाय कंपनीची वाय फाय सिस्टीम सर्वात जास्त वापरली जाते.

- एका वाय फाय नेटवर्क अंतर्गत हजारो कंप्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईल कार्यरत असले तरीही यामुळे आपल्या मोबाईलमधला डेटा हॅक होण्याची शक्यता नसते.

- ब्लूटुथप्रमाणे कार्यरत असणार्‍या वाय फाय टेक्नॉलॉजीमध्ये कोणतेही डिवाइस कनेक्ट होताना त्याची रिक्वेस्ट पाठविली जाते. ती एक्सेप्ट केल्यावरच दुसरे डिवाईस कनेक्ट होते. म्हणून वाय फाय वापरताना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

- राजन सावंत.
सौजन्य:- फुलोरा, सामना १७१२२०११

Saturday, December 17, 2011

पैसा पैसा

पैसा पैसा पैसा वेडी झाली माणसं


पैसा पैसा पैसा वेडी झाली माणसं


पैसा पैसा पैसा जीव झाला स्वस्त

पैसा पैसा पैसा नात्यांना नसतो अर्थ


पैसा पैसा पैसा विसरले सगळे उपकार

पैसा पैसा पैसा हि माणसच आहेत बेकार


पैसा पैसा पैसा भांडणाला नसतो तोटा

पैसा पैसा पैसा जो - तो मोजतो फक्त नोटा


पैसा पैसा पैसा नाती गेले विसरून

पैसा पैसा पैसा अग्रीमेंट टाका पुसून


पैसा पैसा पैसा नको आम्हाला पैसा

प्रेम - जिव्हाळा - नाती मनी भाव आमच्या ऐसा

- पूजा पाठारे
सौजन्य:- http://marathikavita.co.in

वरळीपासून सांताक्रुझपर्यंत धो धो पाणी

मरोळ ते रूपारेल कॉलेज जलबोगद्याची उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी


मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यानच्या भूमिगत जलबोगद्याचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीगळती, पाणीचोरी आणि अनधिकृत नळजोडणीला आळा बसणार असून वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, परळ, दादर, चिंचपोकळी, माटुंगा, धारावी, माहीम, खार, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात धो धो पाणीपुरवठा होणार आहे.

मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यान भूमिगत जलबोगद्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हा १२ किलोमीटरचा जलबोगदा असून त्याचे १० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. केवळ दोन किलोमीटरचेच काम बाकी असून सप्टेंबर २०१३ ला हा जलबोगदा तयार होणार आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माहीम येथे जाऊन या जलबोगद्याच्या माहीम ते रूपारेल कॉलेज यापुढील टप्प्याच्या भूमिगत जलबोगद्याची पाहणी केली. जलबोगद्यात ६० फूट खोल जाऊन उद्धव ठाकरे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जलबोगद्याची निर्मिती करणार्‍या अभियंत्यांकडून कामाची माहिती घेतली. यावेळी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव विनायक राऊत, पालिका सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मिलिंद वैद्य उपस्थित होते.

कामांचा पाठपुरावा करावा लागतो

पालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे श्रेय शिवसेना घेत असल्याचा आरोप विरोधक करीत असल्याचा प्रश्‍न प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर खड्डे पडले तर आम्ही आणि उड्डाणपूल झाले तर तुम्ही अशी मार्मिक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोणतेही काम असेच होत नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. ते काम करून घ्यावे लागते. उगाच काम होत नाही. पाठपुराव्याविना कामे झाली असती तर नालेसफाईची पाहणी करावी लागली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शताब्दी’तील बाह्यरुग्ण कक्षाचे आज उद्घाटन

शिवसेना-भाजप युतीच्या प्रयत्नाने साकारलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्षाचे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्या शनिवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शताब्दी रुग्णालय, एस. व्ही. रोड, कांदिवली (प.) येथे हा कार्यक्रम होत आहे.

वैशिष्ट्ये

- जलबोगद्याचे अंतर १२ किलोमीटर.

- किंमत ४१५ कोटी १० लाख ६२५रुपये.

- कामाचा कालावधी ५६ महिने.

- कामाची सुरुवात १५ सप्टेंबर २००७.

- ३६०० मि.मी. व्यासाचा बोगदा. लांबी १२,२८५ मी.

- जलबोगद्यामुळे पाणीगळती, चोरी आणि अनधिकृत जलजोडणीला लगाम.

- वरळीपासून सांताक्रुझपर्यंत पाण्याचा दाब वाढणार.

- बॉम्ब टाकला तरी जलबोगद्याला धोका नाही.

सौजन्य:- सामना १७१२२०११.

Thursday, December 15, 2011

कॉर्पोरेट मंत्र - बुट्टी म्हणा

प्रत्येकात एक लहान पोर जगत असते. त्या पोराला फक्त प्रेम, आनंद, खेळ, विश्‍वास, राग आल्यावर केलेली कट्टी आणि दुसर्‍या क्षणात घेतलेली बट्टी कळते. कट्टीनंतर बट्टी घेण्यास छोटी मुलं वेळ नाही घालवत. कारण त्यांच्या खेळांचा वेळ वाया न जावा म्हणून ते राग-रुसवे सोडायला तयार होतात, पण आपण मोठे झालो असे समजून आपण त्या आपल्यातल्या पोराला सतत चापट मारून गप्प बसवत असतो. हल्ली मित्र आठवत नाहीत, लोकांचे फोन नंबर आठवत नाहीत, कामं लक्षात राहात नाहीत. सण, वार, तिथीही लक्षात राहात नाही. पण राग, अपमान, रुसवे मात्र जिभेच्या टोकावर रचून ठेवलेले असतात. एका लग्नात दोन मित्रांचा आमना सामना होतो. काही वर्षांपूर्वीचा मतभेद अगदी काल झाल्यासारखाच त्यांना लक्षात असतो. एकमेकांच्या नजरेला नजर मिळू नये अशी प्रार्थना दोघेही मनात पुटपुटत असतात. अजिबात त्याच्या बायकोकडे पाहायचेही नाही, असे आपापल्या बायकोला दोघांनी धमकावले असते. बाजूबाजूला बसूनही दोन कुटुंबे परक्यासारखे इथे तिथे पाहत असतात. दोघांची पोरं मात्र एक कोपरा पकडून आपला खेळ सुरू करतात. ही दोघं अस्वस्थ होऊन पोरांचा खेळ पाहत असतात. ‘या वेड्याच्या पोराशी का खेळतोय माझा मुलगा!’ असे हावभाव दोघांच्याही चेहर्‍यावर ठळक दिसत होते. खेळ पाहता पाहता दृश्य बदलले. पोरांचे अचानक भांडण सुरू झाले. दोघांचा बाप मनात म्हणाला, ‘‘बापावर गेलाय पोरगा, भांडखोर!’’ काहीच क्षणात परत एक बदल. त्या छोट्यांनी गळ्यात गळे घातले. दोन जुन्या मित्रांना आपल्या पोरांना पाहून त्यांचे मैत्रीचे दिवस आठवले. एका बापाने आपल्या पोराला जवळ बोलावून विचारले, ‘‘काय रे, लगेच भांडण मिटले कसे?’’ तर तो चिमुरडा म्हणाला, ‘‘बाबा, आपण इथे थोड्या वेळासाठीच आहोत ना. आपण निघाल्यावर हा मला परत कधी भेटणार? मग आम्ही परत कधी खेळणार? आता आहे तो वेळ का घालवू खेळायचा. खेळायला किती मजा येते. कट्टी होणारच, खेळ आहे; पण बट्टी नाही झाली तर खेळ कसला!’’ दोन्ही बाप एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी कडकडून मिठी मारून म्हटले, ‘‘बट्टी.’’


ही बट्टी फार महत्त्वाची. आयुष्य फार छोटे असते, अनिश्‍चित असते. ते घालवू नये. कट्टी केल्यावर बट्टी लगेच झालीच पाहिजे. आज जेवढ्यांशी कट्टी असेल त्यांना बट्टी म्हणा. कट्टी करणे सोडू नका, पण वेळ न घालवता बट्टी म्हणायला विसरू नका. नक्की ‘‘बट्टी म्हणा.’’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- सामना, १०१२२०११

अस्सल कोकणी मेजवानी

महाराष्ट्राला सुमारे ७२० कि.मी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं लेवून ही किनारपट्टी आपल्याला साद घालते आहे. या भूमीशी भगवान परशुरामांचं नातं जोडलं आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर करत अस्सल कोकणी स्वादामध्ये आणि मोकळ्या मनाच्या कोकणी सौंदर्यामध्ये तुम्ही नक्कीच हरवून जाल.कोकणातील सुग्रास जेवण मनात दडून बसलेल्या खवय्यांना जागे करा आणि अस्सल कोकणी लज्जतदार, चटकदार, चमचमीत मेजवानी घ्या.


प्रदूषणमुक्त शांत समुद्रकिनारी कौलारू घरात नारळ, सुपारीच्या बागेत प्रेमळ अगत्य ही येथे खवय्यांसाठी तर खासीयत आहे. कांदापोहे, रव्याचे लाडू, उपमा, गोड शिरा, करंजी, कोकणी खाजा, शंकरपाळी, बटाटावडा, तरी मारलेली मिसळ, अळूवडी, थालीपीठ, कोथिंबीरवडी, नारळीपाक, पुरीभाजी, उकडीचे मोदक, पोहे चिवडा, शेवचिवडा, बेसनवड्या, राजगिरा लाडू इ. सकाळच्या न्याहरीमध्येही इथं मांसाहारी टच दिसून येतो. अंडापोळी, भाकरी, तळलेली सुकट व भाकरी, नाचणीची भाकरी असा न्याहरीचा बेत इथं असतो. वरणभात, घावणे, तिळाचा (तिळकूट) लावलेली गवारीची भाजी, तिळकूट लावलेल्या शेवग्याच्या शेंगा, वांगेभरीत, माठाची भाजी, वालाच्या दाण्याची भाजी, मटकीची उसळ, चवळीची उसळ, पुरणपोळी, आमरस, दही, ताक असा शाकाहारी आहार असतो.

पर्यटक पाहुण्यांसाठी खास मांसाहारी कोकणी पाहुणचार केला जातो. यात कोंबडी (सागुती) वडे, आंबोळी, तांदळाची भाकरी, सुके मटण, कोलंबी फ्राय, तळलेली सुरमईची तुकडी, कडक तळलेले बोंबील, तळलेले पापलेट, हलवा फ्राय, सुकी कोलंबी, कोलंबी रस्सा, तिसर्‍या रस्सा, चिंबोरी, खेकड्याचा रस्सा, झिंगा फ्राय, मटणाचा झणझणीत रस्सा, सोलकढी, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बांगडा रस्सा, तळलेले कालव्याचे गर, शिवल्या भरीत अशी आकर्षक मेजवानी असते. नारळ, रोठा सुपारी, खारा तांदूळ, पोहे, वाल, चवळी, फणस, आंबे, करवंद, कोकम सरबत, आवळा सरबत, आंबा पोळी, फणसपोळी, पोहेपापड, नाचणी पापड, बटाटापापड, पोहे, मिरगुंडा मिरचीचे लोणचे तसेच आंब्याचे लोणचे, सांडगे, मिरची, आवळा कॅण्डी, मँगोपल्प, कोकम आगळ, आमसूल, आंबावडी, मोरावळा, काळीमिरी, दालचिनी, जाम, सुकी मासळी कोकणमेव्याची रससंपदा आपल्या आनंदात भर घालते.

- मंगेश निंबरे

पर्यटनासाठी कोकणात जायचे म्हटले की, सर्वांच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद फुलून येतो. शांत, सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, गडकिल्ले, शिल्पकलेचा अप्रतिम ठेवा असलेली मंदिरे, पुरातन वास्तू, स्मारके आदी अनेक गोष्टी कोकणात पाहण्यासारख्या आहेत. कोकणात येणारे पर्यटक येथील सह्याद्रीचे कडे, सुंदर निसर्ग संपदा याच्या सान्निध्यात चार दिवस भटकंती करण्यासाठी खास करून येत असतात. याचबरोबर कोकणातून परत जाताना इथला खास कोकणी मेवा विकत घेऊन जातात.


संगमेश्वरची मोहनपुरी

ज्याप्रमाणे सिंधुदुर्गात मालवणी खाजाचे नाव आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरची मोहनपुरी प्रसिध्द आहे. मालवणी खाजा आणि संगमेश्वरच्या मोहनपुरीत बराच फरक आहे. मैदा, खाद्यरंग, शुद्ध शेंगदाणा तेल आणि साखरेच्या पाकापासून बनविली जाणारी ही मोहनपुरी पीठ मळण्यापासून ते साचेबद्ध पध्दतीत तयार करताना ती हातानेच तयार केली जाते हे विशेष. एकदा का साखरेच्या पाकातून ही मोहनपुरी बाहेर काढली की तिला पाहिल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच.

रत्नागिरीच्या चिंगळांची न्यारी लज्जत

रत्नागिरीच्या समुद्रात मुबलक प्रमाणात मिळणारी चिंगळ ही केवळ मुंबईच्या मासळी बाजारापुरती मर्यादित राहिली नसून ती थेट परदेशातही निर्यात केली जातात. त्यामुळे रत्नागिरीत येणारे पर्यटक येथील चिंगळांची चव घेतल्याशिवाय पुढील प्रवासाला फिरत नाहीत. ही मासळी तयार करण्याची पध्दत वेगवेगळी असून यासाठी वापरण्यात येणारा खास कोकणी गरम मसाला यामुळे याला येणारा आगळा स्वाद सर्वांच्या जिभेवर कायम तरळत राहतो.

सिंधुदुर्गातील मालवणी खाजा व सोलकढी

सिंधुदुर्गात गेल्यावर येथील मालवणी खाजाची चव चाखली नाही तर सिंधुदुर्गाची सफर झाली असे वाटत नाही. गूळ, चण्याचे पीठ, आले असे पदार्थ वापरून तयार होणारा हा मालवणी खाजा केवळ कोकणात नव्हे तर संपूर्ण राज्यांत प्रसिध्द पावला आहे. याचबरोबर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मिळणारे गुळाच्या चिकीत बनवलेले शेंगदाण्याचे लाडूही सर्वांचे आवडते खाद्य बनले आहे. या पदार्थांप्रमाणेच सिंधुदुर्गात मिळणारी झणझणीत सोलकढी हेसुध्दा येथील खाद्यपदार्थांचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी जेवणानंतर मात्र सोलकढी हवीच असे येथील समीकरण आहे. सिंधुदुर्गातील मालवणी मसाला हा या सर्व शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांमध्ये आगळी लज्जत आणतो.

पुळ्यातील उकडीचे मोदक

गणपती आणि मोदकाचा अनोखा नातेसंबंध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे हा मोदकांचा बेत वर्षभर ठरलेलाच असतो. सुंदर समुद्रकिनारा आणि स्वयंभू देवस्थान यामुळे देशाविदेशातील पर्यटक कोकणात आल्यावर गणपतीपुळे येथे जातात. गणपतीला नैवेद्यासाठी नियमित मोदकांचा बेत असतो. गणपतीपुळे परिसरात मिळणारे उकडीचे मोदक हे केवळ हिंदुस्थानीच नाही तर परदेशी पर्यटकांचाही आवडता खाद्यपदार्थ म्हणून नावारूपास आला आहे.

संगमेश्वरचे खोबरे मोदक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच संगमेश्वरमध्ये गेल्या काही वर्षांत ताज्या नारळाच्या खोबर्‍यापासून बनविल्ेले मोदक प्रसिद्ध झाले आहेत. नारळाच्या खोबर्‍यापासून बनविलेल्या या मोदकातही आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट अशा वेगवेगळ्या चवी असून यामध्ये आंबा मोदकालाच मोठी मागणी आहे. गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावरील नारळाची चवही आगळीवेगळी असल्याने या मोदकांना खरी लज्जत चढते.
- जे. डी. पराडकर
सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

Wednesday, December 14, 2011

एक थोर अनुभव

किल्ले पुरंदर


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १५०० मीटर/४६०० फूट


- भौगोलिक स्थान : तालुका पुरंदर, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : पायथ्याच्या नारायणपूर या गावातून दोन मार्गांनी पुरंदर. माचीवर जाता येते. एक वाट आहे डोंगरभटक्यांसाठी व दुसरी सर्वसामान्य जनतेसाठी जी पूर्वी लष्करी वाहनांसाठी बनवली होती

- गडावर पाहावयाची स्थळे : १) बिनी दरवाजा, २) पुरंदरेश्‍वर मंदिर, ३) रामेश्‍वर मंदिर, ४) कंदकडा, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) माची, ७) भैरवखिंड, ८) वज्रगड, ९) वीररत्न मुरारबाजी पुतळा, १०) पद्मावती तळे, ११) शेंदरी बुरुज, १२) राजगादी, १३) पेशव्यांचा वाडा, १४) गडावरची सुमारे ५० पाण्याची टाकी.

किल्ले रायगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : ८५५ मीटर/२८५१ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका महाड, जिल्हा रायगड

उत्तर अक्षांश : १८० १४ मिनिट पूर्व रेखांश : ७३० २० मिनिट

- गडावर जायचे मार्ग : १) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड या गावापासून पायथ्याची रायगडवाडी सुमारे २६ कि.मी. आहे. चित् दरवाज्यापासून सुमारे १५०० पायर्‍या चढून गडावर जाता येते.

२) रायगडवाडीपासून नाना दरवाजातून जाणार्‍या शिवकालीन वाटेने गडावर जाता येते.

३) हिरकणीवाडीतील रोपवेने केवळ ४ मिनिटांतही गडावर जाता येते.

- रायगडाची प्राचीन नावे : रायरी, राजगिरी, तणस, रासिवटा, जंबुद्वीप, नंदादीप.

- गडावरचे पाहावयाची स्थळे : १) खुबलढा बुरुज, २) नाना दरवाजा, ३) महादरवाजा, ४) गंगासागर, ५) स्तंभ/मनोरे, ६) बालेकिल्ला, ७) बाजारपेठ, ८) होळीचा माळ - शिवपुतळा, ९) टकमक टोक, १०) दारूकोठारे, ११) जगदीश्‍वर मंदिर, १२) शिवसमाधी, १३) भवानी टोक, १४) बाराटाकी, १५) वाघदरवाजा, १६) हिरकणी बुरूज, १७) शिरकाई मंदिर.

विजयी विजयदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : मिश्रदुर्ग (जलदुर्ग व भुईकोट यांचा सुंदर मिलाप)

- भौगोलिक स्थान : तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग

- गडावर जायचे मार्ग : डांबरी सडकेने हा किल्ला सहजसाध्य आहे.

जलमार्गानेही किल्ल्यावर जाता येते.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) तीन प्रवेशद्वारे २) तळघर ३) चिरेबंदी जलाशय ४) अनोखे बुरूज व तिहेरी तटबंदी ५) साहेबाचे ओटे ६) जाखिणीची तोफ ७) दारूकोठार.

किल्ले प्रतापगड


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला),

उंची : १०८० मीटर/३५४३ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जावळी, जिल्हा सातारा

- गडावर जायचे मार्ग : पोलादपूर - महाबळेश्‍वर रस्त्यावरील वाडा या पायथ्याच्या गावातून डांबरी सडकेने थेट गडापर्यंत पोहोचता येते. (४ कि.मी.)

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा, २) भवानी मंदिर, ३) टेहळणी बुरूज, ४) हनुमान मंदिर, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) सदर, ७) शिवपुतळा,

८) राजपहार्‍याची दिंडी व त्यावरील घोरपडीचे शिल्प, ९) यशवंत बुरूज, १०) चिलखती बांधणीची तटबंदी

किल्ले राजगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १३९४ मीटर/४६०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका वेल्हा, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : १) पायथ्याच्या वाजेघर गावातून, बाबुदाच्या झापापासून डोंगरधारेने चोरदरवाजा व मग पद्मावती माचीवर, २) पाली खुर्द गावातून पायर्‍यांच्या वाटेने पालीदरवाजातून पद्मावती माची, ३) पायथ्याच्या गुंजवणे गावातून अवघड वाटेने गुंजवणे दरवाजातून गडावर, ४) भुतोंडे गावातून अळुदरवाज्याने संजीवनी माची. शिवधर घळीतूनही गोप्याघाटाने अळू दरवाजातून गडावर येण्याचा मार्ग आहे, ५) तोरणा-राजगड डोंगरधारेने खडतर वाट चालून संजीवनी माचीवर येता येते.

गडावर पाहावयाची स्थळे : १) पद्मावती माची, २) पद्मावती मंदिर, ३) पद्मावती तळे, ४) रामेश्‍वर मंदिर, ५) राजवाडा, ६) सदर, ७) अंबरखाना, ८) गुंजवणे, पाली दरवाजा, ९) बालेकिल्ला, १०) सुवेळा माची, ११) संजीवनी माची, १२) काळेश्‍वरी बुरूज व परिसर, १३) अळू दरवाजा इत्यादी.

किल्ले शिवनेरी


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला)

- उंची : ११०० मीटर/ ३५०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

- गडावर जाण्याचे मार्ग : पायथ्याच्या जुन्नर गावातून गडावर जायला दोन मार्ग आहेत.

१. सात दरवाज्यांच्या मालिकेतून पायर्‍यांच्या वाटेने, मार्गातील सात दरवाजे : महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकार दरवाजा.

२. शिवनेरीच्या दक्षिण कड्यात कोरलेल्या गुहा व लेण्यांना कवेत घेऊन वर चढणारी साखळीची अवघड वाट.

किल्ले सिंधुदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग (पाण्यातला किल्ला)

- भौगोलिक स्थान : तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.

- गडावर जायचा मार्ग : मालवण हे गाव मुंबई - गोवा हमरस्त्यापासून अगदी जवळ आहे. मालवणमधून छोट्या नावांमधून किल्ल्यावर जाण्याची सोय आहे.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा २) दोन फांद्यांचे नारळाचे झाड ३) शिवराजेश्‍वर मंदिर ४) शिवरायांची हस्तपद चिन्हे ५) दूधबाव, दहीबाव व साखरबाव ६) राणीचा वेळा ७) दर्याबुरूज.

- गडावर पाहावयाची काही प्रमुख स्थळं : १. सात दरवाजे, २. शिवजन्मस्थान आणि शिवाई मंदिर, ३. शिवकुंज, ४. गंगा जमुना टाके, ५. अंबरखाना, ६. कोळी चौथरा, ७. बदामी तळ, ८. कडेलोट टोक. अष्टविनायकातील लेण्याद्री, नाणेघाट, जीवधन-हडसर-चावड-निमगिरी आदी गिरिदुर्ग, कुकडी नदीचा उगम आणि पूर गावचे कुकडेश्‍वराचे प्राचीन व कलासंपन्न शिवमंदिर, शिवनेरीच्या पोटातील आणि भीमाशंकर, तुळजा, अंब-अंबिका गटात मोडणारी असंख्य कोरीव लेणी, वडज-पिंपळगाव-येडगाव-माणिकडोह आणि डिंभे धरणाचे जलाशय, खादेड येथील जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिण.

- पराग लिमये

सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

Sunday, December 04, 2011

कॉर्पोरेट मंत्र - ‘‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’’

‘देव अक्कल वाटत होता तेव्हा चाळणी घेऊन गेलेलास का,’ हे अनेकदा तुमच्या ऐकण्यात आले असेल. पण मुळात पंगत बसवून देवाने अक्कल वाटली असेल असे मला वाटत नाही. देवाचे प्रेम समान सर्वांसाठीच. कुणाला चाळणीत आणि कुणाला पातेल्यात असे काही झाले नसावे. सर्व आपल्या परीने, आपल्या मर्यादा टिकवून वागत असतात. खरं तर प्रत्येक जण शूर आणि हुशार असतो व त्याच्या जीवनात येणार्‍या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असतो. पण कधी कधी पाय लटपटतात, गोंधळल्यासारखे वाटते. अशा क्षणीही आपण निर्णय ठामपणेच घेत असतो. फक्त आपला निर्णय बरोबर असल्याचा शिक्का आपल्याला कुणाकडून तरी हवा असतो. प्रत्येक जण जीवनात बर्‍याचदा अर्जुन होतो. कसे ते सांगते. अभिमन्यूच्या मृत्यूची खबर येताच अर्जुन पुत्रशोकाने व्याकूळ झाला व संतापला. जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने प्रतिज्ञा केली ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन’. कौरवांनी जयद्रथाला वाचवण्यासाठी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळली. अर्जुन जयद्रथाला शोधूच शकला नाही. अर्जुनाचा त्रास श्रीकृष्णाला पाहावेना. त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या सहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले सूर्य मावळला. अर्जुनाने अग्नीभक्षणाची तयारी केली. लाकडे जमवली, चिता पेटवली. कौरव अर्जुनाची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुन चितेत उडी टाकणार तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. सगळे भांबावून गेले. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना पाहतोस काय? लाव बाण धनुष्याला. हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ.’’ कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला. आयुष्यात निर्णय घेण्यास घाबरू नका. प्रत्येक अर्जुनाला सूर्य दाखवण्यासाठी एक कृष्ण जन्माला येतो. तो कृष्ण कोण ते ओळखा. एकदा निर्णय घेतला की जे होईल त्याचा हसत स्वीकार करा. जयद्रथासारखा घृणास्पद व कठीण संकटांचा खात्मा करण्यासाठी तुमचा कृष्ण तुमची साथ देईल. तुम्हाला कुणाच्या आयुष्यात कृष्ण होण्याची संधी मिळाली तर तीही सोडू नका. अर्जुनासारखे वाटले तर कृष्ण शोधा आणि एखादा अर्जुन सापडला तर कृष्ण व्हा. ‘‘सूर्य पहा, सूर्य दाखवा.’’


‘‘जय श्रीकृष्ण’’
- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- ०३१२२०११ फुलोरा, सामना

Sunday, November 27, 2011

नोटबुक न्न् लॅपटॉप

कॉम्प्युटरच्या तुलनेत बर्‍याच अंशी पोर्टेबल आणि कुठेही हाताळता येणारी टेक्नॉलॉजी लॅपटॉपच्या माध्यमातून आली. त्याला आता जोड मिळतेय ती नोटपॅडची. पण लॅपटॉप आणि नोटपॅडचा फरक लक्षात घेतला तर आपल्या कामकाजासाठी योग्य गॅजेट घेण्यास आपल्याला मदत होईल.


नोटबुक


- हा लाईटवेट कॉम्प्युटर म्हणून ओळखला जातो. याचे वजन ६ पाउण्ड म्हणजेच ३०० ग्रॅम इतके आहे.


- नोटबुकला फ्लॅट स्क्रीन असून याच्या सीपीयूची क्षमता लॅपटॉप पेक्षा खूप कमी असते.

- यामध्ये डीव्हीडी ड्राइव्हचा ऑप्शन नाही. पण त्याऐवजी यूएसबी वापरून डेटा ट्रान्सफर करता येईल.

- नोटबुकची स्क्रीन १२-१४ टीएफटी एवढ्या साइजमध्ये उपलब्ध असून याची बॅटरी लाइफ केवळ चार ते पाच तासांची आहे.

- नोटबुकचा की बोर्ड हा अगदी लहान असतो. त्यामुळे टाइप करण्यासाठी पुरेसा स्पेस मिळत नाही.

- काही ठरावीक सॉफ्टवेअर नोटबुकमध्ये चालू शकतात. मात्र आधी रन केलेल्या सॉफ्टवेअरला अपग्रेडेशन देता येत नाही.

- नोटबुकमध्ये व्हिजीए रिझॉल्यूशन अत्यंत चांगल्या प्रकारचे आहे. यामुळे फोटोज् अधिक स्वच्छ दिसतात.


- नोटबुकला इंटरनेट सिक्यूरिटी देता येत नाही. त्यामुळे वायरस येण्याची जास्त शक्यता असते.

- १९८९ साली नॅक या कंपनीने पाच पाउण्ड वजनाचा पहिला अल्ट्रा लाइट नोटबुक हिंदुस्थानात आणला.

- नोटबुक बनविण्यात कॉम्प्युटर क्षेत्रातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत.

- नोटबुक प्रामुख्याने एज्यूकेशनल परपजने वापरला जातो.

लॅपटॉप


- हा पोर्टेबल कंम्प्युटर म्हणून ओळखला जातो. याचे वजन १० ते १७ पाउण्ड आहे.


- लॅपटॉपला फ्लॅट स्क्रीन असून याच्या सीपीयूची क्षमता डेस्कटॉप पीसीपेक्षा कमी आणि नोटपॅडपेक्षा जास्त असते.

- लॅपटॉपमध्ये डीव्हीडी ड्राइव्ह, युएसबी, मॉडेम, नेटवर्क, ब्लुटुथ, वायफाय इनबिल्ट असते.

- लॅपटॉपची स्क्रीन १०-१८ टीएफटी एवढ्या साइजमध्ये उपलब्ध असून याची बॅटरी लाइफ केवळ तीन तासांची आहे.

- लॅपटॉपचा कि बोर्ड हा फुल फिचर असतो.

- सर्व सॉफ्टवेअर लॅपटॉपमध्ये चालू शकतात. त्याला अपग्रेडेशन देता येते.

- लॅपटॉपमध्ये व्हिजीए रिझॉल्यूशन चांगले आहे पण नोटबुकच्या तुलनेत नाही.

- लॅपटॉपला इंटरनेट सिक्यूरिटी देता येते. त्यामुळे वायरस येण्याची शक्यता नाही.

- १९८८ साली कॉम्पॅक्ट या कंपनीने १४ पाउण्ड वजनाचा एसआयटी २८६ हा लॅपटॉप आणला.

- लॅपटॉप बनविण्यात कंम्प्यूटर क्षेत्रातल्या सर्वाधिक कंपन्या आहेत. मात्र त्यापैकी डेल आणि लीनोवा या कंपनीच्या लॅपटॉपला मागणी आहे.

- लॅपटॉप हा प्रोफेश्‍नल कामासाठी वापरला जातो.

- राजन सावंत
सौजन्य :- saamana.phulora@gmail.com


26112011

Sunday, November 06, 2011

तुलसी ‘विवाह’ पर्व

समाजाचे चक्र विवाह संस्थेच्या केंद्रीभूत प्रथांनी गतिमान होते. त्याचे गुपित तुळशी विवाहातून स्पष्ट होते. म्हणून हा समारंभ दीपावली खालोखाल धूमधडाक्यात साजरा होतो.

दिवाळी झाली. फटाके फोडले. खमंग लाडू-चिवड्यांवर ताव मारला. मामाच्या घरी भाचेमंडळी गेली. बहीणही माहेरी आली. दिवाळीचा सण असा आनंदात साजरा झाला. दिवाळीत फोडता-फोडता उरलेल्या टिकल्या, फटाक्यांची थोडीबहुत आतषबाजी बच्चेकंपनी अजूनही करीत असले तरी, दिवाळीचा सण महिनाभर म्हणजे देवदिवाळीपर्यंत राहतो असे मानले जाते. पाच दिवसांची दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाह समारंभ असतो. या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून सुरू होणार्‍या तुळशी विवाह पर्वाची सांगता वैकुंठ चतुर्दशीला होते.


याच पर्वामध्ये चातुर्मासाची समाप्ती होऊन कार्तिक मासाचा आरंभ होतो. कार्तिक मासामध्ये आवळा, ऊस, कौट, चिंच, हरभरा, बोर ही फळे आलेली असतात. त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी पोषक असते. तुळशी विवाह सोहळ्यात ऊस, आवळा आदी अर्पण करूनच सेवन करण्याची प्रथा आहे. त्यातही आवळ्यांचा मान मोठा असतो.

मुख्यत: दिवाळीच्या पाठोपाठ हिवाळ्याची चाहूल लागते. दिवसागणिक थंडीचे प्रमाण वाढत जाते. या ऋतूमध्ये आहार-विहारामध्ये बदल होत असल्याने सकाळी पडणार्‍या कोवळ्या उन्हाची किरणे सेवन करणे, बलवृद्धीसाठी व्यायाम, चालणे योगासन-प्राणायाम असा उपक्रम प्रत्येक जण आखतो. दिवाळीचा फराळ-चिवडा एव्हाना संपलेला असतो. मग शुद्ध तुपात बनविलेले पौष्टिक लाडू. संधीवातावर गुणकारी मेथीचे लाडू, खारीक-खोबरे, उडीद इत्यादी पदार्थ बनविले जातात. तर दुसरीकडे पहाटेच स्नान करून देवळात काकड आरती होते. त्यामुळे परंपरेप्रमाणे कार्तिक स्नान अन देवदर्शनासाठी प्रथा पाळली जाते.

असा हा कार्तिक महिन्याचा महिमा असून, शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतीक असलेल्या ‘तुळस’ या छोट्याशा डेरेदार रोपट्याला अतिव महत्त्व असते. म्हणून कृष्णभार्या रुख्मिणीचे प्रतीक असलेल्या तुळशीचे दिवाळीनंतर येणार्‍या पर्वामध्ये विवाह लावण्याची प्रथा हिंदू धर्मात आजही अखंडपणे सुरू आहे. तुळशीची कुंडी अथवा वृंदावन सजवून त्यावर स्वस्तिक किंवा श्रीकृष्ण-राधाचे चित्र रेखाटन करायचे. मग ऊस, कौट, चिंच, बोर, आवळा, हरभर्‍याचे रोपटे इत्यादी वाहून तुळशीसमोर छोट्या मुलास उभे करायचे किंवा समोर रंगनाथाची मूर्ती मांडून मंगलाष्टक होतात आणि हा असा विवाह समारंभ पार पडतो.

ग्रामीण भागात हा उत्सव उत्साहात साजरा होतो. या पूजेमुळे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर होतात असा गोड समज पसरलेला असल्याने या उत्सवाला महत्त्व आहे. अर्थात तुळशी विवाह उत्सवानंतर जवळपास एप्रिल-मेमध्ये लग्नसराईचा मोसम असतो.

जीवनातील महत्त्वाचा समारंभ हा ‘विवाह’ असतो. विवाहातूनच संसाराचा रथ पुढे सरकतो. दोन जीवांना एकत्र आणणारा आणि समाजाला हातभार लावणारा हा सामाजिक सोहळा आहे. दोनाचे चार हात झाले म्हणजे जुनी पिढी आत्मनिर्भर होते. सांसारिक जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवून जुनी मंडळी मोक्षप्राप्तीकडे वळतात. संसाराचा रथ पती-पत्नी चालवत असताना या रथामध्ये नवीन पाहुणा येतो..

थोडक्यात समाजाचे चक्र विवाह संस्थेच्या केंद्रीभूत प्रथांनी गतिमान होते. त्याचे गुपित तुळशी विवाहातून स्पष्ट होते. म्हणून हा समारंभ दीपावली खालोखाल धूमधडाक्यात साजरा होतो. पाच दिवस ही पर्वणी अनुभवायला मिळत आहेच आहे.

- श्रीराम सोनार
सौजन्य:- उत्सव, सामना ०६११२०११.

लाईफ इजी

आधुनिक तंत्रज्ञानाचा शब्दकोष दिवसेंदिवस मोठा होत चाललाय. या गदारोळात सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात असंख्य प्रश्‍न उपस्थित होतात. मात्र सोप्या भाषेत त्यांचाी उत्तरं मिळत नाहीत. फुलोरा टीम आता तुमची मदत करणार आहे. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गोष्टी साध्या शब्दांत आणि तुम्हाला उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने मांडणारं हे नवं सदर. आज जाणून घेऊया थ्रीजी सुविधेविषयी...


थ्रीजी - म्हणजे थर्ड जनरेशन. अर्थात मोबाइल इंटरनेटची तिसरी पिढी, थ्रीजी हे काही रॉकेट सायन्स् नाही, पण त्याचा वेग आणि वैशिष्ट्यामुळे इंटरनेटचा नेहमी वापर करणार्‍यांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो.

थ्रीजी स्पीड - इंटरनेटवरून डाऊनलोड करताना तब्बल २.१ एमबीपीएस आणि अपलोड करताना ५.७ एमबीपीएस एवढा चांगला वेग मिळू शकतो.

व्हिडीओ कॉल - व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची मजा लुटायची असेल, तर थ्रीजीचा वापर करून व्हिडीओ कॉल करू शकता. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमच्याकडे फ्रन्ट कॅमेरा असणारा मोबाईल असणं गरजेचं आहे.


लाइव्ह टीव्ही - थ्रीजीमुळे तुम्ही लाइव्ह टीव्ही बघू शकता. यासाठी तुमच्या मोबाईल ऑपरेटरकडून दिलं जाणारं सॉफ्टवेअर मोबाईलवर इन्स्टॉल करावं लागेल. ठराविक ऊन्न् चॅनल्स् तुमच्या मोबाईलवर बघू शकाल.


थ्रीजी ऑन पीसी - थ्रीजी सेवा तुम्ही पीसी/लॅपटॉप/ टॅबलेट किंवा इतर कोणत्याही डिजिटल उपकरणावर वापरू शकता. फक्त त्यासाठी ते उपकरण थ्रीजी एनेबल्ड असणं गरजेचं आहे.

थ्रीजी स्टीक्स - कव्हरेज एरियामधील थ्रीजी उपलब्धतेनुसार युएसबी थ्रीजी स्टीक घेऊ शकता. यासाठी मोबाईल फोन असण्याची गरज नाही. या स्टीक्स तुम्ही युएसबीचा वापर करून कुठेही जोडू शकता

थ्रीजी वायफाय हब - हेदेखील एक चमत्कारी गॅझेट आहे. पाच जणं एकाच वेळी थ्रीजी सेवा एकाच हबचा वापर करून वापरू शकतात. वायफाय हब हे वायरलेस गॅजेट असून ते ब्लुटूथ वायफाय व इतर कोणत्याही तंत्रज्ञानावर चालतं. सध्या टाटा फोटॉनचे वायफाय हब बाजारात उपलब्ध आहे.

थ्रीजी हॅण्डसेट - जर तुम्ही ३उ सेवा वापरू इच्छित असाल तर त्यासाठी तुमच्याकडे चांगला थ्रीजी मोबाईल असणं गरजेचं आहे. अनेक मोबाईल थ्रीजी एनेबल्ड असतात. पण त्यामध्ये थ्रीजीची सर्व वैशिष्ट नसतात.

थ्रीजी ऍक्टिव्हेशन - .यासाठी तुम्हाला तुमचा नंबर किंवा सिमकार्ड बदलावं लागत नाही. जर सीडीएमए नेटवर्कवर थ्रीजी सेवा वापरायची असेल, तर मात्र सिमकार्ड बदलावं लागतं, पण मोबाईल नंबर बदलत नाही.

थ्रीजा टेरीफ - दिवसाचे/आठवड्याचे किंवा महिन्याचे असे वेगवेगळे पॅक्स सध्या उपलब्ध आहेत. जर तुम्ही थ्रीजीचा वापर व्हिडीओ कॉलिंगसाठी करणार असाल, तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. अनलिमिटेड वापरासाठी वेगळे पॅक्स मिळू शकतात.

थ्रीजी वापरण्याआधी - हा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात ते ठरवा. तुम्ही साधारण किती इंटरनेट वापरणार असाल ते तुमच्या मोबाईल ऑपरेटरच्या संकेतस्थळावरील ‘‘डेटा कॅलकुलेटर’’चा वापर करून मोजा. त्यानंतर तुमच्या गरजेचा थ्रीजी प्लॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून ऍक्टिव्हेट करून घ्या.

- अमित घोेडेकर
 सौजन्य:- फुलोरा,सामना ०५११२०११.

Saturday, November 05, 2011

मोकाट लांडग्यांचा दिवस - २५

 गेल्या सोमवारी पुन्हा एकदा लांडगा आला रे आलाची भूमिका उठली आणि काही मिनिटातच बाजार कोसळायला सुरुवात झाली. आता नक्की ‘डेंजर लांडगा’ कोणता याबाबत मात्र संभ्रमावस्था होती.
दिवसाची सुरुवात जीटीएल कंपनीचे भाव 50 टक्क्यांनी घटल्यामुळे झाली. -Green Ridge Properties, Cosmo Advisory Services, Reckon Trading, Aerolite Advisory Services, Cross Link Trading, Plasma Advisory Services and Savyasachin Estates- एकाच वेळेस एक्कावन्न लाख समभागाची विक्री झाली. या विक्री करणार्‍या कंपन्या विक्री का करत आहेत हे न कळल्यामुळे मंदीवाल्यांनी आणखी जोरात विक्री केली. परिणामी समभागधारकांच्या गुंतवणुकीची किंमत एकाच दिवसात बासष्ठ टक्क्यांनी कमी झाली. येत्या काही दिवसात हिंदी सिनेमात जसे सगळं काही झाल्यावर पोलीस येतात तशी सेबीला जाग येईल आणि चौकशीचे सत्र होईल.
हा दिवस लांडगे मोकाट फिरण्याचा असावा. अनेक समस्यांचे लांडगे फिरताना दिसत होते. मॉरीशसमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांवर कर वाढवण्याची बातमी आली. ही आवई गेल्या वर्षी पण आली होती आणि बाजार पडला होता. या वर्षी पुन्हा एकदा तीच बातमी आणि पुन्हा एकदा विक्रीचे वादळ आले. ही बातमी गळ्याखाली उतरत नाही तोच ग्रीसच्या दिवाळखोरीचा प्रश्‍न उभा राहिला. काही जणांच्या मते सोमवारची पडझड ही ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने झाली. विदेशी वित्तसंस्थांना हे कारण विक्री करण्यासाठी पुरेसे होते. प्रत्यक्ष पाहता ग्रीसची परीस्थिती पण फारच वाईट आहे. ग्रीसच्या दरडोई उत्पन्नाच्या 153 टक्के कर्ज आहे. आकडयात सांगायचे झाले तर हे कर्ज 482 बिलीयन डॉलर्स इतके आहे. गेल्या वर्षभरात पन्नास हजार कारखाने बंद पडले आहेत. परिणामी सहापैकी एक कामगार कामावर जातो आहे. येत्या पंधरा दिवसात 85 बिलीयन डॉलर मदत आली नाही तर ग्रीस देश दिवाळखोर होईल. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत देश दिवाळखोर होणे म्हणजे त्यापाठोपाठ आणखी काही देश पण त्याच मार्गानी जाणार हे निश्चित. हा लांडगा फार धोकेबाज म्हणून विदेशी वित्त संस्थांनी तडाखेबंद विक्री केली. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी बेसीन या प्रकल्पात काहीतरी लिपापोटी झाल्याची आवई आली आणि देशी गुंतवणूकदारांनी रिलायन्सची विक्री सुरू केली. खरे सांगायचे झाले तर गेल्या दोन वर्षात या काउंटरवर काहीच हलचल नाही, पण मंदीवाल्यांनी विक्री करून भाव पाडला. त्याच वेळी अनिल अंबानींच्या ग्रुप कंपन्यांपैकी काही कंपन्या ऍक्टिव्ह ग्रुपमधून बाहेर काढून त्याऐवजी दुसर्‍या कंपन्यांची भरती केली गेली. अंबानींच्या कंपन्या इंडेक्सचा भाग असल्याने त्याही कंपन्यांचे भाव पडले. देशी वित्तसंस्थांनी पाच-सहाशे कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरून नेला खरा, पण दिवस मंदीवाल्यांचे आहेत हे खरेच आहे.

- एखादा मद्यपी मधुमेही रोगी डॉक्टरकडे आला की डॉक्टरची फार कुचंबणा होते. दारूमुळे कामातून जाणारे लिव्हर वाचवावे तर ग्लुकोज भरपूर द्यायला हवे आणि ग्लुकोज दिले की मधुमेह बळावणार. अशावेळी इन्शुलीनचे छोटे छोटे डोज देऊन रक्तातली साखर ताब्यात ठेवणे हा एकच उपाय डॉक्टरकडे असतो. आपली सध्याची आर्थिक परिस्थिती अशीच काहीशी आहे. पतपुरवठा आहे तसाच ठेवला तर महागाई वाढते आणि पतपुरवठा कमी केला तर विकासदर कोसळतो. दोन्हीचा समतोल साधण्यासाठी या वर्षी रीझर्व्ह बँकेने या एका वर्षात अनेक वेळा छोट्या छोट्या प्रमाणात रेपो आणि रिव्हर्स रेपोरेट वाढवले. गेल्या आठवडयातील शेवटची वाढ म्हणजे विकासदराचा हट्ट सोडून दिला असे गृहीत धरून बाजारात मंदीची लाट आली आहे. हा उपाय करून इनफ्लेशन ताब्यात येत नाही असा ठाम ग्रह विदेशी संस्थांचा झाल्यामुळे या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातच या संस्थांनी बाजारातून 2152 कोटी रुपयांची विक्री करून भांडवल सुरक्षित ठेवण्याचा मार्ग चोखाळला आहे. अशा वेळी छोट्या गुंतवणूकदरांनी काय करावे हा मोठा यक्ष प्रश्‍न आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली आहे त्यांनी या मंदीकडे दुर्लक्ष करावे.अशा प्रकारची मंदी बाजारात येत-जात असते. डे ट्रेडर्सनी मात्र काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे मंदी असो वा तेजी ट्रेडींग स्टॉक्स बाजारात नेहेमीच उपलब्ध असतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या आधार पातळीचा आणि ट्रेडींग रेंजचा या कालावधीत उपयोग होत नाही. यासाठी ज्या समभागाचे वळण तोंडपाठ असेल त्या समभागातच काम करावे. मंदीच्या प्रदीर्घ कालावधीत जुने संदर्भ नेहेमीच कालबाह्य होत असतात.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११.

अवस्था लावोनी गेला... - २४

 गेल्या काही महिन्यांतील बाजारातले वातावरण बघता ज्या तेजीची वाट गुंतवणूकदार बघत आहेत ती दिवसेंदिवस दूर दूर जाताना दिसते आहे. श्री संत ज्ञानेश्वरांच्या एका विरहिणीत म्हटल्याप्रमाणे ‘अवस्था लावोनी गेला, अजून का न ये’ अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. खासकरून या सदराच्या वाचकांची तर नक्कीच. कारण हे सदर वाचून प्रेरित झालेल्या गुंतवणूकदारांना अजूनही तेजीचा माहोल गेले सहा महिने बघावयास मिळाला नाही. असा बाजार सकारात्मक किंवा नकारात्मक असे काहीही संकेत देत नाही. दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक ताबडतोब करावी असे काहीही चित्र सध्या दिसत नाही. अशा वातावरणाची निर्मिती होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे विदेशी गुंतवणूक संस्थांची (जवळ जवळ) अनुपस्थिती.






विदेशी संस्थांची खरेदी विक्री आंतराष्ट्रीय संकेतांवर चालते. आंतरराष्ट्रीय चित्र काहीसे असे आहे. अमेरिकेत अजूनही आर्थिक सुस्थितीचे संकेत नाहीत. युरोपमधील काही देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळे उत्साहवर्धक वातावरण तयार होण्यासाठी बाजाराला देशी संस्थांचाच आधार आहे, परंतु राजकीय वातावरण बघता देशी संस्था आक्रमक होऊन खरेदी करतील असे वाटत नाही. चौथ्या तिमाहीचे आकडे वाचल्यावर येणार्‍या तिमाहीचे नफ्याचे आकडे कमी असतील हे स्पष्टच झाले आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या प्रकारच्या बाजारात काय करावे? असा मोठा प्रश्‍न असतो. असा प्रश्‍न ज्यांच्या मनात आला असेल त्यांनी मान्सूनच्या मोसमात कोळी काय करतात ते बघावे हे उत्तम. या मोसमात कोळी आपली जाळी दुरुस्त करतात आणि होड्यांची गळकी भोके बुजवतात आणि समुद्र शांत झाला की, परत जाळी पसरतात. थोडक्यात काय तर या मरगळीच्या वातावरणानंतर जी तेजी येणार आहे त्या तेजीत भाग घ्यायचा असेल तर गुंतवणूकदारांनी आपली जाळी म्हणजेच ट्रेडिंगची हत्यारे घासून पुसून तयार ठेवावीत. गेल्या मोसमात केलेल्या चुकांचा आढावा घेऊन त्या चुका पुन्हा न होण्यासाठी नवीन व्यूहरचना करावी. मंदीची ओहोटी कायम टिकत नाही आणि तेजीची भरती पण कायम टिकत नाही हे लक्षात असले म्हणजे झाले.

डबा आणि फाटक


फार पूर्वी म्हणजे साधारण पंधरावीस वर्षांपूर्वी शेअर बाजाराच्या बाजूला एका इमारतीच्या तळमजल्यावर मधूभाईचा डबा होता.डबा म्हणजे अनधिकृत शेअर बाजार. सगळे सौदे शाळेच्या पाटीवर लिहिले जायचे. फक्त डे ट्रेडिंगचे सौदे लिहिले जायचे. बाजार संपला की, हारजीतचे पैसे देऊन घेऊन पाट्या पुसल्या जायच्या. या डब्यात एक फाटक सौदा पण लिहिला जायचा. फाटक सौदा म्हणजे समभागाची पूर्ण किंमत न देता काही प्रमाणात अंशत: पैसे डबा चालवणार्‍याकडे द्यावे लागत.उदाहरणार्थ बॉंबे डाइंगचा भाव २७० रुपये आहे. ५०० समभागाची किंमत झाली १३५०००. सौदा लिहिणारा फक्त १३५०० रुपये देऊन एंट्री घ्यायचा. समजा पुढचे वळण म्हणजे सेटलमेंट येईपर्यंत समभागाचा भाव २९० झाला तर सौदा लिहिणार्‍याला १३५०० (५००ङ२०) म्हणजे २३५०० रुपये मिळायचे. परंतु भाव २५० झाला तर सौदा लिहिणारा नुकसानीत जाऊन त्याला फक्त ३५०० रुपये परत मिळायचे. मिळणार्‍या रकमेतून डबा चालवणारा कार्यवाहीचा खर्च म्हणून काही पैसे घ्यायचा. या फाटक सौद्याचा फायदा असा की, १३५०० भांडवलावर १०००० किंवा कमीजास्त फायदा मिळवण्याची संधी. असे अनधिकृत सौदे लिहिणे यावर कडक निर्बंध होते. प्रसंगी पोलिसांची धाड पडण्याची शक्यता असायची तरी पण असे सौदे चालत राहिले. कारण कमीतकमी भांडवलावर अनेक पट पैसे कमावण्याची संधी. यानंतर बर्‍याच वर्षांनी नॅशनल स्टॉक एक्सेंज सुरू झाल्यावर असे
फाटक सौद्यासारखे सौदे लिहिण्याची एक नवीन पद्धत -एक नवीन बाजार जन्माला आला. त्याचे नाव फ्युचर आणि ऑप्शन
. अधिकृतरीत्या छोट्या भांडवलावर जास्त पैसे कमावण्याची संधी प्रत्येकाला मिळाली. फ्युचर आणि ऑप्शन या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. गुंतवणूक कमी, पण फायदा कमावण्याची संधी अनेक पट. त्याचसोबत भांडवल एकाच सौद्यात नाहीसे होण्याची पण शक्यता. थोडक्यात काय तर ही एक तारेवरची कसरतच पण इंद्रधनुष्याच्या तळाशी असलेला खजिना कोणाला नको आहे ? 
निफ्टी निफ्टी

फ्युचरच्या सौद्यात सगळ्यात लोकप्रिय म्हणजे निफ्टीचा सौदा. निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा तापमापक. निफ्टीचा पारा वर म्हणजे बाजार तेजीचा. निफ्टीचा पारा घसरला तर बाजार नरम म्हणजे मंदी. असे गृहीत धरा की, निफ्टी हा एक समभागच आहे. सकाळी पन्नास निफ्टी खरेदी करा. ही खरेदी करण्यासाठी साधारण १५ ते २० टक्के मार्जिन दलालाला द्यावे लागते. आजची तारीख समजा जून पंधरा आहे. तर मग जून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत निफ्टीचा पारा वर गेला तर पन्नासच्या पटीत फायदा आणि जर निफ्टीचा भाव घसरला तर पन्नासच्या पटीत नुकसान. आता यातले फायदे बघा. फायदा क्रमांक एक :थोड्याशा मार्जिनवर महिनाभरात जास्त पैसे कमावण्याची संधी. फायदा क्रमांक दोन : गुंतवणूक कमी असूनही हातात महिन्याचा कालावधी निर्णय घेण्यासाठी हातात शिल्लक असतो. ज्यांची जोखीम घेण्याची इच्छा किंवा कुवत नसेल त्यांच्या साठी मिनी निफ्टी म्हणजे वीस निफ्टीचा लॉट आहेच. अंदाज फक्त बरोबर ठरला पाहिजे. अंदाज अचूक मिळण्यासाठी तावीच्या अभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. पुढच्या भागापासून तावी आणि निफ्टीचा अभ्यास एकाच वेळेस करू या.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)

हमखास नफा आणि कॅमेरिला - २३

हमखास नफा देणारे तंत्र मिळावे आणि ते आत्मसात करावे असे प्रत्येक डे ट्रेडरचे स्वप्न असते. संगणकाच्या मदतीने ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल असेही सगळ्यांनाच वाटत असते. बाजारात बर्‍याच संगणक प्रणाली (प्रोग्राम) मिळतात ज्यांच्या मदतीने खरेदी -विक्री करून नफा कमावल्याचा दावा पण बरेच जण करतात. प्रत्यक्षात या प्रणाली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पिव्होट पॉइंट्सच्या तर्कशास्त्रावर बांधलेले इमले असतात. वापरणार्‍याला त्याचे गणित अवगत करण्याची आवश्यकता नसते.

एखाद्या समभागाच्या (कालच्या बाजारातील) खुलता भाव -बंद भाव जास्तीत जास्त आणि कमीतकमी भावाच्या किमती या प्रणालीत टाकणे हे एकच काम असते. या किमती टाकल्या की, आजच्या बाजाराचे तयार अंदाज मिळतात. याखेरीज बरेच ट्रेडर रोबोटिक सिस्टीमचाही वापर करताना दिसतात (खासकरून फॉरेक्स ट्रेडिंगसाठी) या यांत्रिक पद्धती वापराव्या अथवा नाही हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, परंतु आज कॅमेरिला लेव्हलची ओळख झाल्यावर यांत्रिक पद्धतीची आवश्यकता भासणार नाही. कॅमेरिला लेव्हल्स किंवा कॅमेरिला पिव्होटचे गणित आदल्या दिवशीच्या बाजारभावावर अवलंबून असते खुलता-बंद-जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव. या किमतींवरून एकूण आठ लेव्हल्स (पातळ्या)तयार करता येतात. प१/प२/प३/प४ या तेजीचा बाजार दर्शवतात तर थ्१/थ्२/थ्३/थ्४ या मंदीच्या पातळ्या आहेत. आता प्रत्यक्षात त्यांचा वापर कसा करायचा हे शिकणे महत्त्वाचे आहे.जर समभागाचा खुलता भाव थ्३ आणि प३ यामध्ये असेल तर दोन्ही पातळीपैकी एका पातळीपर्यंत भाव जाईपर्यंत धीर धरणे आवश्यक आहे. जर भाव प३ पर्यंत गेला तर मंदी करा म्हणजेच विक्री करा किंवा भाव थ्३पर्यंत खाली गेला तर तेजी करा म्हणजे खरेदी करा. यापैकी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य असा स्टॉपलॉस वापरण्यास विसरू नका. प४ /थ्४ या पातळ्यांना ब्रेकआऊट लेव्हल्स म्हणतात. समजा समभागाने प४ पातळी पार केली तर मंदी करू नये. बाजाराचा कल तेजीचाच आहे असे समजून तेजी करावी. याचप्रमाणे थ्४पार केल्यावर मंदी आहे. तेव्हा मंदी हाच बाजाराचा कल समजावा. आता काही महत्त्वाच्या सूचना क्रमांक एक : या सर्व पातळ्या अत्यंत तरल स्वरूपाच्या असतात. त्यामुळे एका पातळीपासून दुसर्‍या किंवा तिसर्‍या किंवा उलट्या क्रमानेदेखील पातळ्या काही मिनिटांत बदलतात. त्यामुळे दक्ष राहून ताबडतोब पुढची पायरी घेण्याची तयारी असणार्‍यांनीच या पद्धतीचा वापर करावा. क्रमांक दोन या पद्धतीचा मूळ वापर फॉरेक्स मार्केटपासून आहे. त्यामुळे ट्रेडिंग प्लॅनमध्ये आपल्या अनुभवानुसार बदल करून घेणे ही ज्याची त्याची
जबाबदारी आहे. त्यासाठी कच्चा सराव करणे फार महत्त्वाचे आहे. आता या कॅमेरीला लेव्हलच्या गणिताकडे वळूया. बर्‍याच तावी तंत्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने गणित मांडले आहे. माझ्या अनुभवातील काही सूत्रांचा उल्लेख येथे करतो आहे.
H4 = [1.1*(H-L)/2]+C,,H3 = [1.1*(H-L)/4]+C,,H2 = [1.1*(H-L)/6]+C,,H1 = [1.1*(H-L)/12]+C,,,L1 = C-[1.1*(H-L)/12],,,L2 = C-[1.1*(H-L)/6],,,,L3 = C-[1.1*(H-L)/4],,,,,,,L4 = C-[1.1*(H-L)/2],,


‎(येथे H = जास्तीत जास्त भाव L = कमीत कमी भाव C = बंद भाव. हे सगळे भाव आदल्या
दिवशीचे घ्यावेत). काही तावी तज्ज्ञ या पातळ्या पाचव्या पातळीपर्यंत देतात, परंतु सुरुवातीला तरी या आठच पातळ्यांचा वापर करावा. कच्चा सराव ही सूत्रे वापरून करावा. त...ंत्र अवगत होण्यासाठी काही कालावधी लागतो.
काही वेळा असाही कालखंड येतो की, जेव्हा यापैकी ही सूत्रे लागू पडत नाहीत. असा बाजाराचा कल लक्षात येण्यासाठी सराव हा एकच मार्ग आहे. हे वाचल्यावर कदाचित असे मनात येईल की, यापेक्षा तयार गणित मिळाले तर बरे. अशा वाचकांनी आंतरजालावर फेरफटका मारून रेडी डेटा घ्यावा. या रेडी डेटातही भरवशाची
संस्थळे कोणती असाही प्रश्‍न पडेल. म्हणून मी फक्त एकच संस्थळाची शिफारस करीत आहे. http://www.icharts.in/ या संस्थळावर आपल्या देशी बाजारास योग्य अशा कॅमेरिला लेव्हल्सची माहिती दिलेली असते. या संस्थळाचा उपयोग डे ट्रेडिंगसाठी अनिवार्य आहे. वर उल्लेख केलेली सूत्रे या संस्थळावरून घेतलेली नाहीत, परंतु या संस्थळाचा संपूर्ण उपयोग समजून घेण्यासाठी तावीचे आणखी काही धडे गिरवायला लागतील. डे ट्रेडिंग या विषयावर आजचा लेख शेवटचा आहे. याचा अर्थ असा नव्हे की, तांत्रिक विश्‍लेषणाचा हा शेवटचा लेख आहे. तावीचा अभ्यास पुढच्या भागात करावाच लागेल. कारण ऑप्शन आणि फ्युचर्सच्या बाजारात त्याखेरीज गती नाही.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)

गुंंतवणूकदार आणि माकड - २२

पॅरॅबोलीक सार हा एक बाजाराचा कल दर्शवणारा इंडिकेटर आहे. सार म्हणजे एस. ऍण्ड आर. स्टॉप ऍण्ड रीव्हर्स. हा इंडिकेटर कलदर्शक (ट्रेंड इंडिकेटर) म्हणून वापरता येतोच आणि त्याच सोबत स्टॉप लॉस (तोट्याला अडसर) निश्‍चित करण्यासाठी याचा वापर करता येतो.



आज टे्रडिंगच्या दोन महत्त्वाच्या पध्दतीविषयी माहिती देणार आहे, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा डे टे्रडिंगविषयी महत्त्वाचा सल्ला. डे टे्रडिंग पध्दतीत शंभर टक्के बरोबर अंदाज किंवा शंभर टक्के चुकीचा अंदाज असे काहीही नसते. ट्रेडरनी आपला व्यवहार (ट्रेड) ७० टक्के यशस्वी करायचा असतो. म्हणजे जर दहापैकी सात वेळा नफा केला आणि तो नफा तीन ट्रेडमध्ये झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त असेल तर डे टे्रडिंग यशस्वी झाले असे म्हणावे. डे टे्रडिंंगचे नियम आणि व्यूहरचना फक्त डे ट्रेे्रडिंगसाठीच उपयुक्त असते. डे ट्रेे्रडिंग करताना १० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान ही धोक्याची पातळी असते. असे नुकसान झाले तर कामाची पद्धत बदलायची नितांत गरज आहे असे समजावे. नुकसानीचा अडसर आणि नफा वसुली हे दोन्ही आधीच ठरवून काम करावे. नाहीतर काय होते ते समजण्यासाठी एक छोटी गोष्ट सांगतो. आफ्रिकेतले आदिवासी माकड पकडण्यासाठी माकडाच्या मानसिकतेचा फायदा उठवतात. एका अरुंद गळ्याच्या मातीच्या बुधल्यात भाजलेले दाणे ठेवून बुधला झाडाच्या फांदीला बांधला जातो. सुरुवातीला माकड भीत भीत हात आत घालून मिळतील तेवढे दाणे खाते. दोन घासानंतर माकडाची हाव वाढते आणि माकड मुठीत जास्तीत जास्त दाणे भरून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. बुधल्याची रचनाच अशी असते की मूठ वळल्यावर हाताचा पंजा बाहेर येत नाही. पण माकडाची हाव माकडाला काही मूठ सोडू देत नाही. या प्रयत्नात माकड इतके रंगून जाते की त्याच्या मागून हळूच जाऊन शिकारी माकडाला पकडतो. बघा तुमच्या काम करण्याच्या पध्दतीत आणि माकडाच्या गोष्टीत काही साम्य आहे का? असेल तर मूठ सोडून द्या. एकाच वेळी मूठभर दाणे खाण्यापेक्षा हातात येतील इतकेच दाणे एका वेळी खा.

तर सर्वप्रथम बघू या पॅराबोलिक सार.पॅरॅबोलीक सार हा एक बाजाराचा कल दर्शवणारा इंडिकेटर आहे. सार म्हणजे एस. अँड आर. स्टॉप अँड रीव्हर्स. हा इंडिकेटर कलदर्शक (ट्रेंड इंडिकेटर) म्हणून वापरता येतोच आणि त्याच सोबत स्टॉप लॉस (तोट्याला अडसर) निश्‍चित करण्यासाठी याचा वापर करता येतो. आता पॅरॅबोलिक सारचे गणित कसे करायचे हे शिकण्यापेक्षा त्याचा उपयोग करून नफा कसा कमावता येईल त्याचा विचार करू या. सोबत जोडलेला आलेख बघा. या आलेख रेषेच्या वर आणि खाली जे ठिपके दिसत आहेत ते आहेत पॅरॅबोलिक सारचे. जर ठिपके रेषेच्या वर दिसायाला सुरुवात झाली तर समभागाचे भाव कमी होणार हे गृहीत धरून चला. रेषेच्या खाली उमटणारे ठिपके म्हणजे समभागाचा भाव वर जाण्याची चिन्हे. आता या समभागात रेषेच्या खाली दुसरा ठिपका उमटल्यावर खरेदी करायची. ज्या दिवशी कल बदलून ठिपका रेषेवरच्या बाजूस उमटेल तेव्हा सौदा बरखास्त करायचा. विक्रीसाठी अगदी उलट तंत्र वापरायचे. आता असे बघा की आज खरेदी केली तर कालचा पॅरॅबोलिक सार हा स्टोपलॉस म्हणून वापरता येतो. उद्या खरेदी केली की आजचा पॅरॅबोलिक सार स्टोप लॉस वापरता येतो. म्हणजेच खरेदी किंवा विक्रीच्या संकेतासोबत सरकता स्टॉप लॉस म्हणूनही या इंडिकेटरचा वापर करता येतो. एक काळजी मात्र जरूर घ्यावी. १४ किंवा २१ दिवसांची सरासरीसुध्दा सोबत वापरावी. दोन्ही इंडिकेटर एकच दिशा दर्शवत असतील तर निर्णय घेणे सोपे जाते. डे ट्रेे्रडिंगसाठी पॅरॅबोलिक सारचा वापर करू नये. कारण हा इंडिकेटर थोडा हळूहळू संकेत देतो. परंतु पाच किंवा दहा दिवसांसाठी प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी हा उत्तम आधार आहे.

सोबत जोडलेला निफ्टीचा आलेख बघा. पॅराबोलीक सार बघून सहज बाजाराच्या कलाचा अंदाज करता येतो. नुकसानीचा अडसर म्हणूनही त्याचा वापर करता येतो. हे आलेख त्याच स्वरूपात रोजच्या रोज ताजे मिळतात.

ज्यांना डे ट्रेे्रडिंगसाठीच बाजारात यायचे आहे त्यांना पिव्हॉट पॉइंट्स ख्रीज दुसरा सोपा पर्याय नाही. पिव्होट म्हणजे समभागाच्या बाजारभावाची अशी पातळी की जेथून बाजाराची दिशा बदलते. या पातळीवर प्रवेश करून नफा कमावणारे अनेक ट्रेडर बाजारात आहेत. पिव्होट पॉइंट जरी एकच असला तरी त्यासोबत त्या बाजारभावाशी निगडित अशा सहा पातळ्या असतात. त्यापैकी तीन होकाराच्या पातळ्या तर तीन नकाराच्या पातळ्या. म्हणजे प्रवेशाच्या सोबत नफा वसुलीच्या तीन पातळ्या किंवा तोटयाला अडसर घालणार्‍या तीन पातळ्या. सोबत उदाहरण म्हणून हीरो होंडाच्या २६/५/२०११ साठी उपयुक्त पिव्होट लेव्हल दाखवल्या आहेत. या पातळ्यांचे अंकगणित आदल्या दिवसाचा हाय-लो-क्लोज यावरून केले जाते. या पातळ्यांचा फॉर्म्युला शिकण्यात वेळ घालवू नये कारण इंटरनेटवर अनेक संस्थळावर या किमती तयार मिळतात.

८९९.४० नकाराची तिसरी पातळी
१८५०.९५ नकाराची दुसरी पातळी
१८२८.५० नकाराची पहिली पातळी
१८०२.५० पिव्होट
१७८०.०५ होकाराची पहिली पातळी
१७५४.०५ होकाराची दुसरी पातळी
१७०५.६० होकाराची तिसरी पातळी

आता या पातळ्या वापरायच्या कशा ते बघा. पिव्होट १८०२ प्रवेशासाठी वापरायची. नकाराची पहिली पातळी १८२८म्हणजे नफा वसुलीची पहिली संधी. होकाराची पहिली पातळी १७८० म्हणजे बाजाराने अचानक घुमजाव केले तर माघारी फिरण्याची पहिली संधी. काही वेळा असे होईल की प्रवेशासाठी संधी मिळणार नाही. खुलता भावच समजा १७८० पेक्षा कमी आला तर किंवा खुलता भाव १८२८च्या वर आला तर काय करायचे? काही नाही करायचे. आज व्यापाराची संधी नाही असे समजून कार्टून नेटवर्क बघत दिवस आनंदात घालवायचा.
या पिव्होट पॉइंटसीचा उपयोग ताबडतोब करण्यापेक्षा आधी पाटी-पेन्सील घेऊन चार ते पाच कंपन्यांच्या पिव्होट पॉइंटसोबत लुटुपुटीचे सौदे करून बघा. (मॉक ड्रिल) साधारण आठवड्याभरात हे पॉइंटस् कसे वापरायचा याचा अंदाज येईल.

हा झाला पिव्होट पॉइंटचा प्राथमिक अवतार. या प्राथमिक अवतारावर हात बसला की फेबोनासी पिव्होट आणि मेकॅरीला लेव्हलस वापरा. विशेषत: केमेरीला लेव्हल वापरल्यास यशाची खात्री ७० टक्क्यांपेक्षा जास्त मिळू शकते.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०६२०११.

काही क्प्त्या नफ्यासाठी - २१

कधीकधी एकाच दिवसात भाव वरखाली होऊन चुकीचे संकेत मिळतात. अशावेळी गुंतवणूकदार कात्रीत सापडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बरेच तावीतज्ज्ञ वेगवेगळे उपाय करतात. आज त्यापैकी प्रकार आज बघूया.





दिनांक १७/०३/२०११ नंतर एडीएक्स ४०च्या वर. बाजारभाव २१ दिवसांच्या सरासरीला टेकून वर गेला. या पध्दतीत प्रवेशाचा बिंदू सहज मोजता येतो, पण बाहेर पडण्याचा निर्णय सहजगत्या समजत नाही. यावर एकच उपाय आहे तो असा की विक्रीचे लक्ष्य आधीच ठरवून घ्यावे?

किंवा ऋण (-) अशा किमती नसतात. एडीएक्स तीसच्या (३०)वर असेल तर बाजाराला निश्‍चित दिशा मिळाली आहे असे समजावे. परंतु हा इंडिकेटर २१ दिवसांच्या सरासरीसोबत काळजीपूर्वक वापरला तर निश्‍चित नफा मिळतो. समजा एखाद्या समभागाचा भाव २१ दिवसांच्या सरासरीपेक्षा जास्त होऊन वाढत जात आहे. अशा वेळी जर एडीएक्स चाळीसपेक्षा कमी असेल तर खरेदी न करता एडीएक्स वाढण्याची वाट बघावी. वाढत जाणारा भाव घटून २१ दिवसांच्या सरासरीला येऊन टेकेल आणि एडीएक्स ३५-४०च्या दरम्यान असेल तर खरेदी करावी. येथून पुढे भाव वाढत जातात. आपल्या नफ्याचे लक्ष पूर्ण झाले की नफा घेऊन सौदा खालसा करावा. शक्यतो मंदीसाठी ही पद्धत वापरू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु जिज्ञासूंनी आपला अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा. या पद्धतीचा तोटा असा की भाव वर जाताना दिसत असतानाही सबुरीचा वापर करावा लागतो. फायदा असा की भांडवल सुरक्षित ठेवून नफ्याचे लक्ष पूर्ण करता येते. आणि अशा बर्‍याच पद्धती बाजाराचा कल -समभागात खरेदी (किंवा विक्री)-सौदा खालसा करणे यासाठी वापरल्या जातात. या लेखाची शब्द मर्यादा लक्षात घेऊन इच्छुकांनी स्वत: अभ्यास करून निर्णय घ्यावा. हे तावीवरचे अंतिम भाष्य आहे असे समजून बाजारात खरीदे-विक्री करू नये. बर्‍याचशा वाचकांना डे ट्रेडिंग करणे शक्य नसेल. त्या वाचकांनी एखाद्या समभागात पाच ते दहा दिवस गुंतवणूक करून नफा कमावण्यास हरकत नाही. अशी पोझिशन घेऊन नफा करण्यासाठी पॅरॅबोलिक सार या इंडिकेटरचा वापर करावा. हमखास नफा आणि कमीतकमी टेन्शन. पुढच्या भागात पॅरॅबोलिक सार आणि आणखी काही इंडिकेटर बघूया.
shreemant2011@gmail.com 
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य :- फुलोरा, सामना, २८०५२०११.

सरासरी फायदा - २०

सरासरीचा अभ्यास करून नफा कसा कमवायचा ते आज बघू या. त्यासाठी व्यापार करण्यायोग्य अशी परीस्थिती बाजारात कशी तयार होते ते बघू या. 
कुठल्याही एका विशिष्ट प्रकारचे म्हणजे तेजी किंवा मंदीचे संकेत मिळत नाहीत त्यावेळी कंटाळलेले जुने गुंतवणूकदार हळूहळू विकत घेतलेल्या समभागातून बाहेर पडतात आणि जाणते निवेशक खरेदीला सुरुवात करतात. ही झाली संकलनाची सुरुवात. कदाचित या सुमारास बाजारात फारसे उत्साहवर्धक वातावरण नसेल. ही पातळी म्हणजे भविष्यातील तेजीची एक पायरी समजा. हा कालावधी बर्‍याच वेळा मोठ्या अवधीचा असतो. भावफरक नजरेला येईल असे नसतात. मोठ्या अवधीचे गुंतवणूकदार येथे खरेदी करतात.या कालावधीचा आलेख पसरता असतो. यानंतर हळूहळू भाव वाढत जातात आणि प्रत्येक वेळी त्या आठवड्याचा किंवा एखाद्या पंधरवड्याचा जास्तीतजास्त भाव त्याअगोदरच्या आठवड्याच्या किंवा पंधरवड्याच्या भावापेक्षा जास्त असतो. या पातळीचा आलेख थोडा वरच्या दिशेने, पण लांबीने अजूनही जास्तच असतो. मध्यम पल्ल्याचे गुंतवणूकदार येथे बाजारात प्रवेश करतात. यानंतर सगळ्या जनतेला हालचालीची खबर लागते आणि समभागाची मागणी वाढत जाऊन रोज नव्या जास्तीतजास्त भावाचे उच्चांक तयार होताना दिसतात. डे ट्रेडर्सना यावेळी पैसे कमवायची संधी मिळते. या कालाचा आलेख एकदम चढ्या स्वरूपाचा दिसतो. बरेच डे ट्रेडर्स आलेखांचे निरीक्षण करून या फेजची वाट बघत असतात. यावेळी बाजारभावाचे रेखांकन सर्व मूव्हिंग ऍव्हरेजेसच्या (किंवा सरासरी भावाचे) रेखांकनाला पार करून जाताना दिसतात. अशावेळी डे ट्रेडर्सना व्यापाराची संधी मिळते. येथे लक्षात घेण्याची बाब अशी हा कालावधी अत्यंत अल्प स्वरूपाचा असतो. भाववाढीचे लक्ष्य नक्की करूनच हालचाल करावी नाहीतर डे ट्रेडिंगच्या उद्देशाने केलेली खरेदी गळ्यात येते किंवा सौद्यात नुकसानी येते. खरेदी विक्रीची काही पथ्ये अशी आहेत.

१. भाववाढीच्या सोबत उलाढालीचे आकडे वर जाताना दिसले तरच सौद्यात हात घालावा.

२. शक्यतो डे ट्रेडिंग अशाच समभागात करावे ज्या समभागात फ्युचर-ऑप्शनचेही सौदे केले जातात. एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या समभागात सौदे करू नयेत.

३. स्टॉप लॉस ठरवल्याशिवाय सौद्यात हात घालू नये.

४. शुक्रवारची खरेदी बर्‍याच वेळी फायद्याची असते आणि सोमवार सकाळची खरेदी बर्‍याच वेळा महागडी ठरते.

५. टार्गेट मिळाल्यावर सौदा विसर्जित करावा.

वेगवेगळ्या सरकत्या सरासरीचा उपयोग कसा करावयाचा ते आता बघू या.

बाजाराचा कल जोखण्यासाठी ट्रेंड लाइनचा उपयोग केला जातो. एखाद्या समभागाच्या शिखरांना जोडणारी एक रेषा काढली आणि त्याच आलेखाच्या तळांना जोडणारी रेषा काढली तर बाजाराची ट्रेंड लाईन काढता येते. जर ही रेषा वरच्या बाजूने प्रवास करताना दिसली तर बाजाराचा कल तेजीकडे आणि तसे नसल्यास मंदीकडे आहे असे समजले जाते. पण फक्त कल समजून उपयोग नाही. कदाचित निश्चित कल लक्षात येईपर्यंत खरेदी किंवा विक्रीची संधी हातातून निघून गेली असेल म्हणून ट्रेंड लाईनच्या सोबत सरकत्या सरासरीचा किंवा मूव्हिंग ऍव्हरेजचा वापर करण्याची पध्दत आहे. जेव्हा समभागाचा बाजारभाव या सरासरीच्या वरती जातो तेव्हा तेजीकडे वाटचाल आहे असे समजायला हरकत नाही. ही सरासरी शक्यतो अल्प कालावधीची म्हणजे पाच किंवा आठ दिवसांच्या सरासरीची असावी. हे शस्त्र आणखी धारदार बनवण्यासाठी आणखी एक सरासरी वापरायला हरकत नाही. ही सरासरी दीर्घ मुदतीची असावी. याचे कारण असे की अल्पमुदतीची सरासरी रेषा बर्‍याच वेळा बाजारच्या फसव्या हालचालीमुळे चुकीचे संकेत देऊ शकते.

उदाहरणार्थ बाजारभाव अल्पमुदतीच्या सरासरीच्या खाली आला तर ताबडतोब विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी दीर्घ मुदतीच्या रेषेकडे एक नजर टाकावी. जर ही रेषा अजूनही तेजीचा संकेत देत असेल तर विक्रीची घाई करू नये. अशा प्रकारची सरासरी वापरूनही संकेत वेळच्या वेळी मिळत नाहीत म्हणून मध्यम काळची एक सरासरी वापरण्याची पध्दत आहे. ही सरकत्या सरासरीची जुडी वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. काही गुंतवणूकदार ५-८-१३ अशी सरासरी वापरतात. काही ८-२०-३५ आणि काही १३-२१-५५ अशीही सरकत्या सरासरीची जुडी वापरतात. दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार २०-५०-२०० असे कॉम्बिनेशन वापरतात. जोपर्यंत बाजारभाव २०० दिवसाच्या सरासरीखाली जात नाहीत तोपर्यंत काही निर्णय घेण्याची घाई करत नाहीत. अल्प मुदतीचे खेळाडू ५-८-१३ चे कॉम्बिनेशन वापरताना दिसतात. तीन सरासरी वापरण्याचा सगळ्यात जास्त फायदा असा की या सरासरींच्या रेषा एकमेकांना छेद देऊन पुढचा प्रवास करतात तेव्हा बाजाराचा कल बदलल्याचा निश्चित संकेत मिळतो. उदाहरणार्थ जेव्हा अल्पमुदतीची रेषा मध्यम रेषेला छेदते आणि त्याचवेळी मध्यम रेषा दीर्घ मुदतीला छेदून तिन्ही रेषा खालच्या बाजूने वळतात तेव्हा गुंतवणूकदारांनी आपली बाजारातील पोझिशन खालसा करावी हे उत्तम. अशीच परीस्थिती वरच्या अंगाने तयार झाली तर खरेदी वाढवून पुढच्या कलाची वाट बघावी. लेखातील शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे कदाचित चित्र स्पष्ट होणार नाही. जिज्ञासूंनी डोळ्यांसमोर आलेख ठेवून अभ्यास करावा.


मागील अंकात आपण स्टॉप लॉसचा (तोट्याचा अडसर) ओझरता विचार केला. तोट्याचा विचार किंवा तोट्याला वेळीच अडसर घालणे म्हणजे भांडवलाचे संरक्षण करणे. घरातल्या एका छोट्या कुंडीत लावलेल्या गुलाबाच्या काही पानांवर कीड पडलेली दिसली की आपण ती पाने खुडून टाकतो आणि त्यामुळे इतर पानांवर कीड पसरण्याचा धोका कमी होतो. तसेच काहीसे या तोट्याच्या अडसराचे असते. एक उदाहरण बघून हे अधिक स्पष्ट करता येईल. समजा तुम्ही शंभर रुपयांना काही समभाग खरेदी केले. अडसर लावलेला नसल्याने भाव नव्वद झाल्यावरही समभाग तुमच्या हातात राहिले. समजा हाच भाव नंतर साठ झाला. अजूनही समभाग आपल्याच खिशात राहिले. भाव अधिक घटून दहा रुपयापर्यंत आले. म्हणजे एका समभागमागे ९० टक्के नुकसान झाले. आता भाव नव्वद टक्क्यांनी जरी वाढले तरी भाव १९ रुपये होईल. पुन्हा १००चा भाव गाठण्यासाठी रुपये दहा ते शंभर हा प्रवास म्हणजे भाव ९०० टक्क्यांनी वाढायला हवा. ९०० टक्क्यांची वाढ ताबडतोब होणे शक्य नसते. कारण प्रत्येक टप्प्यावर अडकलेले तुमच्यासारखेच इतर खेळाडू विक्रीसाठी तयार असतील. आता असे बघा की तोट्याचा अडसर नव्वदच्या भावाला लावला असता तर नुकसान दहाच टक्के झाले असते. ९० ते १०० हा प्रवास अकरा टक्क्याच्या वाढीने साध्य आहे. किंवा या टप्प्याला पोहचणे बाजारात कधीही शक्य आहे. आणखी एका परिस्थितीचा विचार करा. तुम्ही १०० रुपयात समभाग घेतले आणि तोट्याचा अडसर ९० ला लावला. भाव १२० रुपये झाला तरी हा अडसर ९०चा राहील. भाव वाढून १४५ झाला आणि जर अडसर ९० रुपयांचाच राहिला तर १४५या भावापासून ९० रुपयापर्यंत येईस्तो नुकसान होतच राहील. सांगायचा मुद्दा असा आहे की जर भाव वाढत गेले तर तोट्याचा अडसरसुध्दा तसाच वर जायला हवा. याला ट्रेलिंग स्टॉप लॉस असे म्हणतात. डे ट्रेडिंग करताना प्रत्येक सौद्यासोबत त्या सौद्याचा स्टॉप लॉस पण निश्चित करून ठेवायला हवा. थोडक्यात काय? जर सर सलामत तो पगडी पचास.
shreemant2011@gmail.com

तांत्रिक विश्‍लेषण - १९

 तांत्रिक विश्‍लेषण करणार्‍या अभ्यासकाला व्याजाचे दर,पेट्रोलचे भाव, युद्ध, युद्धविराम, निवडणुका, हवामान अशा कोणत्याही घटकांचा विचार करण्याची आवश्यकता नसते कारण बाजारभावाच्या पोटात ही सगळे माहिती आपोआप साठवलेली दिसते. या बाजारभावाचा आलेख मांडून त्याचा अभ्यास करणे म्हणजे तावि.

तांत्रिक विश्‍लेषण (तावि)म्हणजे एखाद्या समभागाचा बाजारभाव आणि उलाढाल या दोन घटकांवरून त्या समभागाचा येणार्‍या भविष्यकाळात काय बाजारभाव असू शकेल याचा अंदाज बांधणे. या विश्‍लेषणात बाजारभावाला फार महत्त्व आहे कारण ज्या घटकांमुळे बाजार वरखाली होऊ शकतो अशा सर्व घटकांचे प्रतिबिंब बाजारभावात दिसते. तांत्रिक विश्‍लेषण करणार्‍या अभ्यासकाला व्याजाचे दर,पेट्रोलचे भाव, युद्ध,युद्धविराम,निवडणुका,हवामान अशा कोणत्याही घटकाचा विचार करण्याची आवश्यकता नसते कारण बाजारभावाच्या पोटात ही सगळे माहिती आपोआप साठवलेली दिसते. या बाजारभावाचा आलेख मांडून त्याचा अभ्यास करणे म्हणजे तावि. डे ट्रेडिंग करणार्‍या खेळाडूंना ताविखेरीज पर्याय नाही. तावितज्ज्ञ व्हायला शैक्षणिक पात्रतेची अट नसल्यामुळे बाजारात या तज्ज्ञांचा सुळसुळाट झालेला नेहेमी बघण्यात येतो.
तबल्यावर जोरात थाप पडली म्हणजे गायक समेवर आला इतकेच संगीताचे ज्ञान असलेला हौशी रसिक जसे दर्दी आणि ग्यानी असल्याचा आव सहज आणू शकतो तसा बाजारात कुणीही तावितज्ज्ञ असल्याचा दावा करू शकतो. आता विचार करू या ताविच्या महत्त्वाचा. ताविच्या अभ्यासामुळे बाजारात प्रवेश कधी करायचा -बाजारातून बाहेर कधी पडायचे -बाजारातील आपली गुंतवणूक वाढवावी किंवा कमी करावी याचे संकेत मिळतात. हे संकेत अनेक प्रकारचे असतात. या संकेतांचा उपयोग कसा करायचा याचा अभ्यास म्हणजे ताविचा अभ्यास. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ताविचे ज्ञान फक्त शेअर बाजारात वापरता येते असे नाही. कुठल्याही बाजारात जेथे चढ उतार आहेत अशा बाजारात हे शास्त्र वापरता येते. कमोडीटीमधील सट्टा आपल्या बाजारात फारच नवीन आहे परंतु माझ्या ओळखीतील एक युरोपीयन तावितज्ज्ञ मला फेब्रुवारी 2002 पासून चांदीची खरेदी करण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी चांदीचा भाव 16900च्या आसपास होता. आता एनएसीवर डॉलर-पाऊंड -युरो-येनची खरेदी विक्री करता येते. जर ताविचे विशुद्ध रूप तपासायचे असेल तर फॉरेक्स बाजारातील आलेखांचा अभ्यास करावा. याचे कारण असे की ताविची सत्यासत्यता बाजारभाव आणि उलाढाल यावर अवलंबून असते. शेअरबाजारात हे दोन्ही कृत्रिमरीत्या ताब्यात ठेवता येण्याची शक्यता असते पण फॉरेक्समध्ये आंतरराष्ट्रीय चलनाचा भाव कुणाच्याच ताब्यात राहू शकत नाही. म्हणूनच ज्यांना ताविचा अभ्यास करायचा असेल त्यांनी शेअरबाजाराचे आलेख अभ्यासण्यापूर्वी फॉरेक्स मार्केटचे आलेख अभ्यासावे.
ताविच्या अभ्यासात बाजाराचा कल समजण्यासाठी आलेखात बाजारभाव रेखांकित केला असतो. यासोबत आणखी काही संख्यांचे रेखांकन केले असते त्याची आज ओळख करून घेऊया. आलेख हे उभ्या अक्षावर भाव आणि आडव्या अक्षावर कालखंड अशा पध्दतीने केले जातात. काही आलेख फक्त बंद बाजारभाव दाखवतात. काही आलेख खुलता -बंद -जास्तीत जास्त -कमीतकमी असे सगळे भाव दाखवतात. या खेरीज जपानी कॅण्डलस्टीक हादेखील लोकप्रिय आलेख आहे. यासोबत आणखी काही संख्यांचे रेखांकन केले असते त्याची आज ओळख करून घेऊ या.

1 सरकती सरासरी किंवा हलती सरासरी (मूव्हिंग ऍव्हरेज) ही आपल्या सोयीप्रमाणे घ्यावी. सर्वसाधारणपणे पाच दिवसांची /दहा दिवसांची /वीस दिवसांची /पन्नास दिवसांची अशी सरासरी वापरली जाते. या सरासरीचा उपयोग छोट्या म्हणजे पाच दिवसांच्या काळात किंवा मोठ्या म्हणजे पन्नास दिवसांच्या काळातील बाजाराच कल कळून घेण्यासाठी येतो. शंभर किंवा दोनशे दिवसांच्या सरासर्‍यांचाही उपयोग करता येतो. बाजाराच्या संकेतासाठी सोप्यात सोपी वापरले पद्धत हीच आहे. सरासरीला आणखी धार येण्यासाठी एक्स्पोनेंशिअल मूव्हिंग ऍव्हरेज (5/10/20/50/100) वापरण्याची पध्दत आहे.

2 आधार किंवा नकार पातळी. (सपोर्ट लेव्हल /रेझिस्टन्स लेव्हल) या पातळ्या ऐतिहासिक असतात. आधार पातळीवर समभागाची खरेदी होत असते आणि नकाराच्या पातळीवर विक्री होत असते या जर लक्षात आल्या तर दोन्हीमधील पोकळीत चांगला नफा कमावता येतो.

3 शिखर आणि तळ . (टॉप्स /बॉटम्स) एखाद्या कालखंडात आलेखावर भाव वर गेलेला दिसतो आणि तेथून मागे फिरलेला दिसतो. हा उच्च भाव म्हणजे त्या वेळेचे शिखर आणि त्याच काळाचा कमीतकमी भाव म्हणजे तळ. या शिखर /तळाचा उपयोग तेजी किंवा मंदी समजण्यासाठी करता येतो. याखेरीज अनेक ताविच्या विशिष्ट संज्ञा आहेत त्याचा वापर आणि अर्थ जसे आपण पुढे जाऊ तसे समजून घेऊ.

ताविमध्ये एक वेगळा पंथ आहे इलियटवेव्ह थीअरीवाल्यांचा. इलियटवेव्हच्या सिध्दांताप्रमाणे बाजार,मग तो कुठलाही असा,आठ लाटांमध्ये फिरत असतो. पहिलीलाट वर जाणारी. दुसरी खाली येणारी तिसरीवर जाणारी तर चौथीखाली येणारी. चौथ्या लाटेचा तळ हा दुसर्‍या लाटेच्या तळापेक्षा वर असतो. पाचवी लाट ही तेजीची शेवटची लाट. त्यानंतरच्या तीन लाटांमध्ये बाजार एकदाच वर जातो. आठवी लाट संपली की पुन्हा नवा संच सुरू होतो. राल्फ नेल्सन इलियट हे या सिध्दांताचे जनक. त्यांनी या लाटांचा फेबोनासी सीरिजशी संबंध जोडून हा सिध्दांत जगासमोर मांडला. फेबोनासी सीरिज म्हणजे 1,1,2.3,5,8,13,21,34,55... .पुढचा आकडा हा आधीच्या आकड्याच्या बेरजेने तयार होतो. आजच्या तारखेस हा सिध्दांत वापरून बाजाराची निश्चित दिशा काय असेल हे वर्तवणार्‍यांंची संख्या कमी आहे. या शास्त्राचा अभ्यास करून नियमीत योग्य अंदाज वर्तवणार्‍यांंमध्ये विवेक पाटील, दीपक मोहोनी,सदानंद राजे, बिरेंद्रकुमार जिलेदार यांची नावे अग्रगण्य आहेत.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना १४०५२०११ 

Friday, October 21, 2011

डे ट्रेडिंग - १८

 डे ट्रेडिंग म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मागणी जास्त म्हणजे बाजार तेज आणि पुरवठा जास्त म्हणजे बाजार मंद. डे ट्रेडिंग करून सतत नफा कमवत राहावा हे बाजारात येणार्‍या प्रत्येकाचे ध्येय असते.

डे ट्रेडिंग म्हणजे बाजारात दिवसभरात होणार्‍या चढउताराचा फायदा घेऊन पैसे कमावणे. या सौद्यांना कालमर्यादा असते सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीनची. एकूण पाच तासांच्या मर्यादेत सौदा हुकमी आपल्या बाजूने पडणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आवश्यकता असते योग्य निर्णयाची. हे निर्णय घेण्यासाठी बाजाराचा कल जोखणे -विचारात चपळता असणे आणि भावनिक गुंतवणुकीचा पूर्ण अभाव असणे जरुरीचे आहे. जर बाजाराचा कल तेजीकडे असेल तर सकाळी खरेदी करून बाजार बंद होण्याआधी विक्री करणे आणि जर कल मंदीचा दिसला तर आधी विक्री करून मग खरेदी करायची. आधी खरेदी म्हणजे लॉंग पोझिशन आणि आधी विक्री करणे म्हणजे शॉर्ट पोझिशन. पोझिशन कशीही असली तरी दुपारी बाजार बंद होण्याआधी खातेपोते एकसारखे झाले पाहिजे. डे ट्रेडिंग म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मागणी जास्त बाजार तेज आणि पुरवठा जास्त म्हणजे बाजार मंद. डे ट्रेडिंग करून सतत नफा कमवत राहावा हे बाजारात येणार्‍या प्रत्येकाचे ध्येय असते. जशी कॉलेजात जावे आणि प्रेमात पडावे -कविता लिहाव्या -विरह व्हावा -मग सुस्कारे सोडावे ही जशी रोमँटिक कल्पना आहे तशीच बाजारात जावे, चार सौदे करावे -सकाळी करावे आणि दुपारी ते परतावे-संध्याकाळी कूल नफा घेऊन घरी जावे ही पण रोमँटिक कल्पना आहे. परंतु हे साम्य इथेच थांबते. बाजारात खरेदी-विक्री करून जर नफा करायचा असेल तर छातीच्या डाव्या बाजूची धडकन आहे तेथे ग्रॅनाइटचा तुकडा असावा लागतो.

सर्दी-बध्दकोष्ठ -दाढदुखीसारख्या आजारांनी यांची तब्येत नाजूक मिजाज होत असेल त्यांच्यासाठी डे ट्रेडिंग नाही. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे तटस्थ राहून इतरांच्या भावनाकल्लोळाच्या खेळाचा फायदा घेणे हे डे ट्रेडरचे काम आहे. डे ट्रेडिंग करून नफा कसा कमावतात ते बघूया. या प्रकारच्या व्यवहारात दोन ते अडीच टक्क्यांचा फरक म्हणजे मोठा फरक. उदाहरणार्थ ऍक्सीस बँकेचा खुलता भाव 1320 आहे. यावर 0.10 टक्के दलाली. भाव समजा दोन टक्क्यानी वाढला तर प्रत्येक समभागापाठी 1.90 टक्के फायदा. दिवसभरात 500 समभागाचा व्यवहार पार पाडला तरी 12000चा फायदा. मग हे जर असे सोपे असेल तर....... असा मनात विचार येतो. पण प्रत्यक्षात असे होईल असे नाही. भाव 2.0 टक्के खाली पण जाऊ शकतो किंवा एक टक्का कमी झाल्यावर घाबरलेला खेळाडू विक्री करू शकतो आणि थोड्या वेळाने भाव पुन्हा एक टक्का वाढू शकतो. एकाच दिवसात दोन टक्क्यांची वाढ प्रत्येक दिवशी होते असे नाही. साधारण एक टक्क्याची वाढ झाली तरी नफा मिळतो. म्हणून डे ट्रेडिंगमध्ये व्हॉल्यूम महत्त्वाचा. दलाली जितकी कमी तितका फायदा जास्त. आता बघू या डे

ट्रेडिंगसाठी काही महत्त्वाचे नियम.

1) वर्तमानपत्रातील मथळे वाचून सौदे करू नयेत. आजचा मथळा हा बाजारात कालचा झालेला असतो.
2) जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा दुसरे कोणीतरी विक्री करत असणार. याचा अर्थ असा की खरेदी करण्याचा निर्णय ज्या तर्काच्या आधारे घेतला आहे तो तर्क विक्रीच्या तर्कापेक्षा बळकट असायला पाहिजे.
3) जर खरेदी केली तर आपण गृहीत धरलेला भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे बाजाराचा कल बदलताना दिसला तर हट्ट न धरता सौदा पूर्ण करून वायद्याच्या बाहेर पडावे.
4) बर्‍याच वेळा नफ्याऐवजी नुकसान होते अशावेळी किती नुकसानीत सौद्याच्या बाहेर पडायचे हे आधीच ठरवलेले फायद्याचे असते. नुकसान नंतर कधीतरी भरून काढता येते, पण भांडवल जर नाहीसे झाले तर नफा कमावण्याचा रस्ताच बंद पडतो. किती नुकसानीची तयारी ठेवायची याची जी मर्यादा आहे त्याला स्टॉपलॉस असे म्हणतात. सुरुवातीला कॉंप्युटराइज्ड स्टॉपलॉसचा वापर करावा. पण हळूहळू या यांत्रिक अवलंबितेच्या बाहेर पडून मानसिक स्टॉपलॉस ठेवण्याची सवय करावी.
5) नफ्याचे प्रमाण मनाशी निश्चित ठरवूनच सौदा करावा. जर जास्त नफा दिसायला लागला तर वाट बघण्यापेक्षा आहे तो नफा पदरात घेण्याची सवय लावून घ्यावी.

प्रत्येकाला आपापल्या पायरीवरती नफा कमावण्याची संधी मिळते. असा विचार करत सौदा केला तर नफा छोट्या छोट्या प्रमाणात गोळा होतो. ही सवय लागली की अनेक छोट्या नफ्याचे रूपांतर छोटा नफा आणि मोठा सौदा असे होते. हे संक्रमण पार पाडणे ज्याला जमते तो यशस्वी. या आणि अशा अनेक नियमांचे सार असे की प्रत्येकाने आपल्या सौद्याची एक व्यवस्था बनवून घ्यावी. त्या व्यवस्थेप्रमाणे जेवढा नफा करता येईल तेवढेच सौदे करावेत. एक सोपे उदाहरण बघा. ऍक्सीस बँकेचा 1247 ते 1327 हा टप्पा माझ्या ओळखीचा आहे. व्यवस्थेप्रमाणे यादरम्यान भाव असेल तरच मी खरेदी-विक्री करतो. या टप्प्याच्या बाहेर भाव गेला तर मी बाजूला राहतो. ही शिस्त लागली की यशाचे प्रमाण वाढते. डे ट्रेडिंग कोणत्या समभागात करावे याचे नियम असे नाहीत, परंतु ज्या समभागात जास्तीत जास्त खरेदी-विक्री होत असेल त्या समभागातच खेळावे. नियम असे अनेक आहेत, परंतु या नियमासोबत जोपर्यंत टेक्निकल ऍनालिसिस येत नाही तोपर्यंत सगळे काही जुगार खेळण्यासारखे आहे. टेक्निकल ऍनालिसिस आणि डे ट्रेडिंग दोन्हीचा अभ्यास एकसोबत होईल अशा पध्दतीने पुढचे लेख लिहिता येतील.

पसंती-नापसंती

मुळात प्रश्‍न आहे तो भाव खालीवर होण्याचा. भाव वधारणे म्हणजे दिसेल त्या किमतीत एक विशिष्ट समभाग हवाहवासा वाटणे आणि मंदी म्हणजे काय तर मिळेल त्या भावात एखादा किंवा कुठलाही समभाग नकोनकोसा वाटणे. पण हे भाव खाली-वर कसे जातात हे कळले की बाजार आपलाच. चला तर बघू या हा भाव वर-खाली जाण्याचा गेम.

यासाठी एक कल्पना करा की, एका हॉलमध्ये पन्नास विवाहोत्सुक तरुणींचा मेळावा बसला आहे. प्रत्येक तरुणीला विवाहास योग्य अशा तरुणाची माहिती संचालकांमार्फत दिली जाते आहे. पसंती-नापसंती दर्शवण्यासाठी तरुणींच्या हातात एक फ्लॅग दिला आहे. आता ज्या युवकाची माहिती सांगणार आहेत त्याचा नंबर 911 पुकारला गेला. जन्म एशियात आणि निवास अमेरिकेत. पन्नासपैकी पंचवीस फ्लॅग हलवले जातात. उंची 6फूट 2 इंच. अर्धे फ्लॅग खाली जातात. रंग काळा आणखी काही फ्लॅग खाली जातात. डावखुरा -चेनस्मोकर. सगळे फ्लॅग खाली. उत्पन्न दहा लाख डॉलर ‘अय्या म्हणजे आपले पाच कोटी.जाऊ दे बाई रंगाचे काय ते आपल्या हातात थोडेच असते’ या विचारांनी पुन्हा एकदा वीस फ्लॅग वर येतात. एकेकाळी गव्हर्नर -आणखी पाच फ्लॅग वर. वय बावन्न -उंचावलेले अर्धे फ्लॅग खाली. कदाचित या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार. सगळे फ्लॅग वरती. बघा प्रत्येक विधानासोबत या घटनेत भाग घेणार्‍यांचे विचार कसे हेलकावे घेत होते. हे अगदी असेच डे ट्रेडिंगमध्ये होत असते आणि म्हणून सव्वा नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत भाव वरखाली होत असतात. या नाट्यात तुम्ही भाग घेतला तर तुमचे नुकसान नक्की. पण विंगेत उभे राहून या नाट्याचा फायदा करून घेतला तर तुम्ही नफ्यात. परंतु मानवी मनाच्या लीला कधी विंगेतल्या माणसाला मंचावर आणतील, तर मंचावरील माणसाला विंगेत नेतील हे सांगता येत नाही .म्हणून डे ट्रेडिंग करणार्‍यासाठी योजना ठरलेली असली पाहिजे.

shreemant2011@gmail.com
लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत
सौजन्य :- फुलोरा, सामना ०८०५२०११

पुढचे काही महिने - १७

गुप्तधनाचे योग आणि स्वस्त किमतीचे समभाग या विषयाची चर्चा करताना आणखी काही माहिती या अंकात देण्याचे गेल्या शनिवारी ठरले होते. त्यानुसार आज अशा एका कंपनीची माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे. या कंपनीने गेली कित्येक वर्षे सतत नफा कमावला आहे. लाभांश वर्षानुवर्षे भागधारकांना देण्याचे औदार्यही या कंपनीत आहे. पुस्तकी किंमत रुपये ७७.११-एका समभागामागे कमावलेला नफा रुपये ६.५२. या वर्षीचा लाभांश २०ज्ञ् आहे. तरीही या समभागाचा भाव केवळ रुपये ४८.०० आहे. जेव्हा पुस्तकी मूल्यापेक्षा बाजारभाव बराच कमी असतो तेव्हा व्यवस्थापनाविषयी मनात संशय येतो. पण या कंपनीचे व्यवस्थापन संशयातीत आहे. एकूण समभागांपैकी ६० टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत आणि त्यांना बाजारभावात रस नाही. त्यामुळे हा समभाग स्वस्तात उपलब्ध आहे. याच प्रवर्तकांच्या इतर कंपन्याही अशीच चांगली कामगिरी करीत आहेत. स्पेशालिटी केमिकल बनवणार्‍या या कंपनीचे नाव आहे दाई-इची-कर्कारीया. उत्सुक गुंतवणूकदारांनी अधिक माहिती जमा करावी.

फ्रीकॉनॉमिक्स

* मान्सून मनासारखा चांगला झाला तर बाजारात एक मोठी तेजीची लाट येईल.
* जर मान्सून वेळेवर आणि हवा तितका पुरेसा झाला नाही तर हिंदुस्थानचा जीडीपी कमी होईल. व्याजाचे दर वाढतील. विकासाचे दर कमी होतील. बँकाचे समभाग स्वस्त होतील. अशावेळी मायक्रो फायनान्स कंपन्या भरपूर नफा करतील. त्यातल्या त्यात सोने तारण ठेवून पैसे देतात त्यांना सोन्याचे दिवस येतील. नाव घेण्यासारख्या दोनच कंपन्या या क्षेत्रात आहेत एक मन्नपूरम आणि दुसरी मुथूत फायनान्स. या क्षेत्रातील इतर कंपन्यांकडे लक्ष देऊ नये.

एप्रिल महिन्याच्या या शेवटच्या शनिवारी ‘पैसा कसा कमवाल’? या मालिकेचा एक टप्पा संपत आला आहे. पुढच्या टप्प्यात टेक्निकल ऍनॅलिसिसचे आणि डे ट्रेडिंगचे सोपे धडे आपण गिरवणार आहोत.

 या वर्षीचा मान्सून व्यवस्थित पार पडला तर अन्नधान्याच्या तुटीमुळे वाढणारी भाववाढ कमी होईल. परंतु वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुका संपल्यावर कदाचित डिझेलवरील सरकारी नियंत्रण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढीची एक नवी लाट येण्याची शक्यता आहे. 

saujanya :- fulora, samana.

जरा जपून... १६

गेल्या पंधरवड्यातल्या बाजाराच्या हालचालीवरून काही निश्‍चित असा तर्क बांधणे कठीण आहे. लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे असा माझा सल्ला राहील. इन्फोसीसचा बाजारभाव घसरून पुन्हा स्थिरावेल आणि त्यासोबत याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचेही भाव खाली येऊन स्थिरावतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने दोन मुद्दे समोर आले ते असे की सॉफ्टवेअर कंपन्यांतील पगार की आता काळजी करण्याची बाब होणार आहे. इन्फोसीसच्या प्रत्येक तासासाठी मिळणारे मूल्य प्रत्येक कंपनीला मिळत नाही. त्यामुळे इतर कंपन्यांना आपल्या कामाचे दर कमी जास्त करावे लागतील. दुसरा मुद्दा कंत्राटी कामाची मुदत आतापर्यंत लांबलचक असायची परंतु यानंतर ही मुदत कमी होत जाणार आहे .याचा परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांना पण भासणार आहे. पुढच्या वर्षी एका शेअर पाठीमागचा नफा (ईपीएस) यामुळे कमी राहील, अशी शक्यता आहे. सौ बात की एक बात अशी की सॉफ्टवेअर कंपन्यांचे भाव स्थिरावेपर्यंत गुंतवणूक करू नये.
लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे

इतर आर्थिक ढोबळ कारणांमुळे बाजार तेजी पकडेल असे आता वाटत नाही. मंदीचे वातावरण तयार होण्यासाठी एक दोन दिवस परदेशी वित्तसंस्थांनी विक्री केली तर बाजाराचा मूड बदलतो. उदाहरणार्थ १५एप्रिल रोजी या संस्थांनी विक्री केली आणि बाजार घसरला. याच महिन्यात सतत सात दिवस याच संस्था खरेदी करीत असताना बाजार तेजीचे संकेत देत होता. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे भाव वाढताना दिसले की या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. गुंतवणुकीसाठी गॅमन इंडिया हा समभाग लक्ष देण्यासारखा वाटतो.

शेअर बाजारात गुप्तधन शोधणार्‍यांची एक जातकुळी असते. गुप्तधन म्हटल्यावर डोळ्यांसमोर लिंबू-गुलाल-कोहळा- उलट्या पिसाची कोंबडी असे काही नाही. गुप्तधन म्हणजे बाजाराच्या रोजच्या धबडग्यामुळे बर्‍याच गुंतवणूकदारांच्या नजरेआड झालेले समभाग . या अंकात आपण अशा प्रकारच्या समभागाची दोन उदाहरणे बघू या.

गुप्तधनाचे योग

पहिल्या समभागाचे नाव आहे नॅशनल पॅरॅक्सॉईड. सायन उद्योगात असलेली ही कंपनी बॉंबे डाइंग या सुप्रसिध्द उद्योगसमूहाच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीचे प्रत्येक समभागापाठीमागचे उत्पन्न ८३ रुपये आहे. समभागाचे पुस्तकी मूल्य १३६ रुपये तर पीई रेशिओ ७.१५ आहे. याच क्षेत्रात काम करणार्‍या इतर कंपन्यांचे पीई रेशिओ १३.१५ आहे. कंपनी अत्यंत आकर्षक असा लाभांशपण वर्षानुवर्षे देत आहे. म्हणजे या कंपनीच्या भाववाढीला अजूनही जागा आहे. तर अशा सर्वगुणसंपन्न समभागाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष का नाही? कारण एकच की हा समभाग लोकप्रिय समभागाच्या यादीत नाही. कंपनीचे भागभांडवल फार छोटे असल्यामुळे बाजारात मागणी केली तरी समभाग मिळतील याची खात्री नाही. समभाग न मिळण्याचे महत्त्वाचे कारण असे की कंपनीच्या प्रवर्तकांकडे ५५ टक्के भाग भांडवल आहे. म्हणजे ते बाजारात विक्रीस उपलब्ध नाही. २५ टक्के भागभांडवल सॉल्व्हे या अग्रगण्य विदेशी रसायन कंपनीकडे आहे. (अभ्यासू वाचकांनी सॉल्व्हेच्या संस्थळाला जरूर भेट द्यावी.) सॉल्व्हेच्या मालकीचे समभागही बाजारात विक्रीस येण्याची शक्यता नाही. उरलेले ३० टक्के समभाग विखुरले असल्यामुळे तरंगते समभाग बाजारात कमी आहेत. जर हे समभाग गेल्या वर्षी तुम्ही घेतले असते तर या वर्षी दामदुप्पट झाली असती. ५६० ते ६०० रुपयांच्या दरम्यान हे समभाग मिळाले तर घ्यायला हरकत नाही. दुसरे उदाहरण रेवथी सीपी या कंपनीचे घ्या. कॉम्प्रेसर बनवणारी कॉन्सोलिडेटेड न्युमॅटिक या कंपनीचे प्रवर्तक होती. ती कंपनीनंतर ऍटलास कॉपको या कंपनीत विलीन झाली आणि रेवथीचे भाग भांडवल ऍटलास कॉपकोनी डालमिया उद्योगसमूहाला विकले. आजच्या तारखेस ५० टक्के समभाग त्यांच्या कडेच आहेत. उरलेले समभाग विखुरलेले असल्याने समभागाची खरेदी एका ऑर्डरमध्ये होत नाही. ट्रक माउंटॅड बोरिंंग कॉंप्रेसर हे या कंपनीचे उत्पादन आहे. या क्षेत्रात स्पर्धेत फारसे कोणीही नाही. हे समभाग ४४५-४५५ यादरम्यान मिळाल्यास सहा महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी घ्यावयास हरकत नाही. ही फक्त दोन उदाहरणे झाली .या व्यतिरिक्त अनेक अशा कंपन्या आहेत.गुंतवणूकदारांना या आठवड्याचा गृहपाठ हाच की अशा आणखी दोन कंपन्या गुंतवणुकीसाठी शोधाव्या. या कोड्याचे उत्तर अर्थात नंतरच्या एखाद्या भागात दिले जाईल.

दीडदमडीचे समभाग अर्थात पेनी स्टॉक

शांती नावाच्या एका सीरिअलमध्ये काम करणारी मंदिरा बेदी आठवा किंवा उत्सव मधला शाहीद कपूर आठवा.एकेकाळी क्षुल्लक भूमिका करणारे हे कलाकार हळूहळू स्टार कधी बनले हे कोणालाच कळले नाही. फिल्मी दुनियेत असे स्टार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे तयार होतात परंतु आपल्या शेअर बाजारात असे अनेक स्टार दरवर्षी येत असतात. एखादा समभाग स्टार बनण्याच्या आधीच जे गुंतवणूकदार खरेदी करतात त्यांना तो समभाग स्टार झाल्यावर एखादा हिंदी नाही पण मराठी चित्रपट काढण्याइतकी रक्कम मिळवून देऊ शकतो. हा श्रीमंतीचा मार्ग दिसतो तसा सोपा नाही. स्टार म्हणून कच्ची धूपमधली भाग्यश्री निवडावी - ‘मैने प्यार किया’ सारखा चित्रपट आल्यानंतर स्टार म्हणून अपेक्षा ठेवाव्या आणि तिने संन्यास घ्यावा .असेही प्रकार या उगवत्या स्टारमध्ये (उगवत्या समभागात)होऊ शकतात. इरा इन्फ्रा इंजीनिअरिंंग-अबान ऑफशोअर-श्रीराम ट्रान्सपोर्ट-प्राज इंडस्ट्रीज-पँटालून रीटेल-कल्पतरू पॉवर-हॅवेल इंडिया मदरसुन सुमी- ऍमटेक ऑटो या एकेकाळच्या लुकलुकणार्‍या चांदण्या आता तळपणारे तारे झाले आहेत. सोबत अशाही चांदण्या दिसतात की ज्या अपेक्षेपेक्षा लवकर ’तारे जमींपर’ झाल्या आहेत. एखादा कमी किमतीचा -ज्याला बाजारात पेनी स्टॉक -समभाग घेऊन पाच ते दहा वर्षे वाट बघितल्यावर स्टार समभाग जन्माला येतो. संयम आणि सतत निरीक्षण -अभ्यास -चिकाटी असणार्‍यांसाठी हे क्षेत्र उपलब्ध आहे .या क्षेत्राची गुण विशेषता पुढच्या अंकात बघू या? परंतु तोपर्यंत गुंतवणूकदारांनी स्वत:च्या तार्‍यांची यादी बनवायला हरकत नाही.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

Sunday, October 16, 2011

भारनियमन शुल्क बीलातून वगळणार

लोडशेडिंगने नागरिक हैराण झाले असताना भारनियमन शुल्कही बिलातून माथी मारणार्‍या वीज मंडळ अधिकार्‍यांना आज शिवसेनेने जोरदार झटका दिला. वीजपुरवठा खंडित करता मग शुल्क कसले आकारता, असा जाब शिवसैनिकांनी विचारताच ताळ्यावर आलेल्या अधिकार्‍यांनी बिलातून भारनियमन शुल्क वगळण्याचे लेखी आश्‍वासन दिले.
नवी मुुंबईला भारनियमनमुक्त करण्यासाठी शहरातील वीजग्राहकांकडून ३७.४० पैसे भारनियमन शुल्क म्हणून जास्त घेतले जातात. असे असूनही सध्या नवी मुंबईत विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, विजय माने, विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, भाविसेचे जिल्हासंघटक सोमनाथ वास्कर, नगरसेवक विजयानंद माने, दिलीप घोडेकर, सतीश रामाणे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, परशुराम ठाकूर, विभागप्रमुख श्रीकांत हिंदळकर, ज्योतिराम भालेकर, दर्शन भणगे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज वाशी येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर धास्तावलेल्या वीज मंडळ प्रशासनाने जुलै २०११ पासून ग्राहकांच्या बिलात भारनियमन शुल्क बंद केले जाईल असे लेखी आश्वासन दिले.
... तर तीव्र आंदोलन छेडू
सध्या ऑक्टोबर महिना असल्याने तापमान वाढले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील लोडशेडिंग लवकरात लवकर बंद करण्यात यावे, अन्यथा जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरप्रमुख विजय माने यांनी यावेळी दिला.
 सौजन्य :- सामना १३१०२०११.

ही घ्या जमीन, द्या गिरणी कामगारांना घरे - शिवसेनेने दाखविला मुख्यमंत्र्यांना मार्ग



गिरणी कामगारांना मोफत घरे देण्यासाठी मुंबईत जमीन आणि पुरेसा पैसा नसल्याची बतावणी करणार्‍या आघाडी सरकारच्या सर्व पळवाटा शिवसेनेने बंद करून टाकल्या आहेत. १ लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०० एकर जमीन आणि त्यासाठी १० हजार कोटी कसे उभारता येतील याची माहिती देणारी ‘चातकांचे वारसदार’ ही मार्गदर्शक पुस्तिका शिवसेनेने तयार केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई व विधान परिषद गटनेते दिवाकर रावते यांनी आज ही पुस्तिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देत ‘ही घ्या जमीन आणि द्या घरे’ असे आव्हानच सरकारला दिले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे मिळवून देणारच अशी ग्वाही दिली. त्याच वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील याबाबतची ‘चातकांचे वारसदार’ ही पुस्तिका शिवसेनाप्रमुखांना दिला होती. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी आज सायंकाळी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना ही पुस्तिका देताना गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील हे समजावून सांगितले. कामगारांच्या घरांसाठी १९८ एकर जमीन कशी उपलब्ध करता येईल, किंबहुना ही जमीन उपलब्ध आहे याची आकडेवारी देसाई-रावते यांनी दाखवून दिली.
- चार्ल्स कोरिया कमिटाच्यो अहवालानुसार एनटीसीची १३३ एकर जमीन मिळू शकते
- १०८५ हेक्टर जमीन यूएलसी कायद्यांतर्गत विविध कारखानदारांकडे पडून आहे.
- यूएलसीची २००० हेक्टर जमीन शासनाच्या हातात होती त्यापैकी ५० हेक्टर जमीन वेगवेगळ्या सोसायट्यांना दिली होती. ५० हेक्टर जमिनीवर आरक्षण होते. ८५ हेक्टर जमीन अतिक्रमित आहे ती म्हाडाकडे पडून आहे. त्यावर २५ हजार गिरणी कामगारांना घरे देऊ शकतात.
- बोरिवलीच्या खटाव मिलची ३४ एकर जागा
- सिम्प्लेक्सची भाडेपट्टी संपलेली अर्धा एकर जागा, मफतलालची ७ एकर जागा, बॉम्बे डाइंगची प्रभादेवीतील २० एकर जागा तर मालवणी-मालाड येथील २२ एकर जमीन
- गिरणीमालकांना टीडीआर दिला. त्यातून सुमारे ४ हजार कोटी उभे राहू शकतात.
- गिरणी कामगार घरांची चातकासारखी वाट पाहत असल्याने ‘चातकांचे वारसदार’ हे नाव पुस्तिकेला दिले आहे.


सौजन्य:- सामना १३१०२०११.