आधुनिक तंत्रज्ञानाचा शब्दकोष दिवसेंदिवस मोठा होत चाललाय. या गदारोळात सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित होतात. मात्र सोप्या भाषेत त्यांचाी उत्तरं मिळत नाहीत. फुलोरा टीम आता तुमची मदत करणार आहे. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गोष्टी साध्या शब्दांत आणि तुम्हाला उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने मांडणारं हे नवं सदर. आज जाणून घेऊया थ्रीजी सुविधेविषयी...
थ्रीजी - म्हणजे थर्ड जनरेशन. अर्थात मोबाइल इंटरनेटची तिसरी पिढी, थ्रीजी हे काही रॉकेट सायन्स् नाही, पण त्याचा वेग आणि वैशिष्ट्यामुळे इंटरनेटचा नेहमी वापर करणार्यांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो.
थ्रीजी स्पीड - इंटरनेटवरून डाऊनलोड करताना तब्बल २.१ एमबीपीएस आणि अपलोड करताना ५.७ एमबीपीएस एवढा चांगला वेग मिळू शकतो.
व्हिडीओ कॉल - व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची मजा लुटायची असेल, तर थ्रीजीचा वापर करून व्हिडीओ कॉल करू शकता. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमच्याकडे फ्रन्ट कॅमेरा असणारा मोबाईल असणं गरजेचं आहे.
लाइव्ह टीव्ही - थ्रीजीमुळे तुम्ही लाइव्ह टीव्ही बघू शकता. यासाठी तुमच्या मोबाईल ऑपरेटरकडून दिलं जाणारं सॉफ्टवेअर मोबाईलवर इन्स्टॉल करावं लागेल. ठराविक ऊन्न् चॅनल्स् तुमच्या मोबाईलवर बघू शकाल.
थ्रीजी ऑन पीसी - थ्रीजी सेवा तुम्ही पीसी/लॅपटॉप/ टॅबलेट किंवा इतर कोणत्याही डिजिटल उपकरणावर वापरू शकता. फक्त त्यासाठी ते उपकरण थ्रीजी एनेबल्ड असणं गरजेचं आहे.
थ्रीजी स्टीक्स - कव्हरेज एरियामधील थ्रीजी उपलब्धतेनुसार युएसबी थ्रीजी स्टीक घेऊ शकता. यासाठी मोबाईल फोन असण्याची गरज नाही. या स्टीक्स तुम्ही युएसबीचा वापर करून कुठेही जोडू शकता
थ्रीजी वायफाय हब - हेदेखील एक चमत्कारी गॅझेट आहे. पाच जणं एकाच वेळी थ्रीजी सेवा एकाच हबचा वापर करून वापरू शकतात. वायफाय हब हे वायरलेस गॅजेट असून ते ब्लुटूथ वायफाय व इतर कोणत्याही तंत्रज्ञानावर चालतं. सध्या टाटा फोटॉनचे वायफाय हब बाजारात उपलब्ध आहे.
थ्रीजी हॅण्डसेट - जर तुम्ही ३उ सेवा वापरू इच्छित असाल तर त्यासाठी तुमच्याकडे चांगला थ्रीजी मोबाईल असणं गरजेचं आहे. अनेक मोबाईल थ्रीजी एनेबल्ड असतात. पण त्यामध्ये थ्रीजीची सर्व वैशिष्ट नसतात.
थ्रीजी ऍक्टिव्हेशन - .यासाठी तुम्हाला तुमचा नंबर किंवा सिमकार्ड बदलावं लागत नाही. जर सीडीएमए नेटवर्कवर थ्रीजी सेवा वापरायची असेल, तर मात्र सिमकार्ड बदलावं लागतं, पण मोबाईल नंबर बदलत नाही.
थ्रीजा टेरीफ - दिवसाचे/आठवड्याचे किंवा महिन्याचे असे वेगवेगळे पॅक्स सध्या उपलब्ध आहेत. जर तुम्ही थ्रीजीचा वापर व्हिडीओ कॉलिंगसाठी करणार असाल, तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. अनलिमिटेड वापरासाठी वेगळे पॅक्स मिळू शकतात.
थ्रीजी वापरण्याआधी - हा वापर तुम्ही कशासाठी करणार आहात ते ठरवा. तुम्ही साधारण किती इंटरनेट वापरणार असाल ते तुमच्या मोबाईल ऑपरेटरच्या संकेतस्थळावरील ‘‘डेटा कॅलकुलेटर’’चा वापर करून मोजा. त्यानंतर तुमच्या गरजेचा थ्रीजी प्लॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून ऍक्टिव्हेट करून घ्या.
- अमित घोेडेकर

सौजन्य:- फुलोरा,सामना ०५११२०११.
No comments:
Post a Comment