हमखास नफा देणारे तंत्र मिळावे आणि ते आत्मसात करावे असे प्रत्येक डे ट्रेडरचे स्वप्न असते. संगणकाच्या मदतीने ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल असेही सगळ्यांनाच वाटत असते. बाजारात बर्याच संगणक प्रणाली (प्रोग्राम) मिळतात ज्यांच्या मदतीने खरेदी -विक्री करून नफा कमावल्याचा दावा पण बरेच जण करतात. प्रत्यक्षात या प्रणाली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पिव्होट पॉइंट्सच्या तर्कशास्त्रावर बांधलेले इमले असतात. वापरणार्याला त्याचे गणित अवगत करण्याची आवश्यकता नसते.
एखाद्या समभागाच्या (कालच्या बाजारातील) खुलता भाव -बंद भाव जास्तीत जास्त आणि कमीतकमी भावाच्या किमती या प्रणालीत टाकणे हे एकच काम असते. या किमती टाकल्या की, आजच्या बाजाराचे तयार अंदाज मिळतात. याखेरीज बरेच ट्रेडर रोबोटिक सिस्टीमचाही वापर करताना दिसतात (खासकरून फॉरेक्स ट्रेडिंगसाठी) या यांत्रिक पद्धती वापराव्या अथवा नाही हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, परंतु आज कॅमेरिला लेव्हलची ओळख झाल्यावर यांत्रिक पद्धतीची आवश्यकता भासणार नाही. कॅमेरिला लेव्हल्स किंवा कॅमेरिला पिव्होटचे गणित आदल्या दिवशीच्या बाजारभावावर अवलंबून असते खुलता-बंद-जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव. या किमतींवरून एकूण आठ लेव्हल्स (पातळ्या)तयार करता येतात. प१/प२/प३/प४ या तेजीचा बाजार दर्शवतात तर थ्१/थ्२/थ्३/थ्४ या मंदीच्या पातळ्या आहेत. आता प्रत्यक्षात त्यांचा वापर कसा करायचा हे शिकणे महत्त्वाचे आहे.जर समभागाचा खुलता भाव थ्३ आणि प३ यामध्ये असेल तर दोन्ही पातळीपैकी एका पातळीपर्यंत भाव जाईपर्यंत धीर धरणे आवश्यक आहे. जर भाव प३ पर्यंत गेला तर मंदी करा म्हणजेच विक्री करा किंवा भाव थ्३पर्यंत खाली गेला तर तेजी करा म्हणजे खरेदी करा. यापैकी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य असा स्टॉपलॉस वापरण्यास विसरू नका. प४ /थ्४ या पातळ्यांना ब्रेकआऊट लेव्हल्स म्हणतात. समजा समभागाने प४ पातळी पार केली तर मंदी करू नये. बाजाराचा कल तेजीचाच आहे असे समजून तेजी करावी. याचप्रमाणे थ्४पार केल्यावर मंदी आहे. तेव्हा मंदी हाच बाजाराचा कल समजावा. आता काही महत्त्वाच्या सूचना क्रमांक एक : या सर्व पातळ्या अत्यंत तरल स्वरूपाच्या असतात. त्यामुळे एका पातळीपासून दुसर्या किंवा तिसर्या किंवा उलट्या क्रमानेदेखील पातळ्या काही मिनिटांत बदलतात. त्यामुळे दक्ष राहून ताबडतोब पुढची पायरी घेण्याची तयारी असणार्यांनीच या पद्धतीचा वापर करावा. क्रमांक दोन या पद्धतीचा मूळ वापर फॉरेक्स मार्केटपासून आहे. त्यामुळे ट्रेडिंग प्लॅनमध्ये आपल्या अनुभवानुसार बदल करून घेणे ही ज्याची त्याची
जबाबदारी आहे. त्यासाठी कच्चा सराव करणे फार महत्त्वाचे आहे. आता या कॅमेरीला लेव्हलच्या गणिताकडे वळूया. बर्याच तावी तंत्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने गणित मांडले आहे. माझ्या अनुभवातील काही सूत्रांचा उल्लेख येथे करतो आहे.
H4 = [1.1*(H-L)/2]+C,,H3 = [1.1*(H-L)/4]+C,,H2 = [1.1*(H-L)/6]+C,,H1 = [1.1*(H-L)/12]+C,,,L1 = C-[1.1*(H-L)/12],,,L2 = C-[1.1*(H-L)/6],,,,L3 = C-[1.1*(H-L)/4],,,,,,,L4 = C-[1.1*(H-L)/2],,

(येथे H = जास्तीत जास्त भाव L = कमीत कमी भाव C = बंद भाव. हे सगळे भाव आदल्या
दिवशीचे घ्यावेत). काही तावी तज्ज्ञ या पातळ्या पाचव्या पातळीपर्यंत देतात, परंतु सुरुवातीला तरी या आठच पातळ्यांचा वापर करावा. कच्चा सराव ही सूत्रे वापरून करावा. त...ंत्र अवगत होण्यासाठी काही कालावधी लागतो.
काही वेळा असाही कालखंड येतो की, जेव्हा यापैकी ही सूत्रे लागू पडत नाहीत. असा बाजाराचा कल लक्षात येण्यासाठी सराव हा एकच मार्ग आहे. हे वाचल्यावर कदाचित असे मनात येईल की, यापेक्षा तयार गणित मिळाले तर बरे. अशा वाचकांनी आंतरजालावर फेरफटका मारून रेडी डेटा घ्यावा. या रेडी डेटातही भरवशाची
संस्थळे कोणती असाही प्रश्न पडेल. म्हणून मी फक्त एकच संस्थळाची शिफारस करीत आहे. http://www.icharts.in/ या संस्थळावर आपल्या देशी बाजारास योग्य अशा कॅमेरिला लेव्हल्सची माहिती दिलेली असते. या संस्थळाचा उपयोग डे ट्रेडिंगसाठी अनिवार्य आहे. वर उल्लेख केलेली सूत्रे या संस्थळावरून घेतलेली नाहीत, परंतु या संस्थळाचा संपूर्ण उपयोग समजून घेण्यासाठी तावीचे आणखी काही धडे गिरवायला लागतील. डे ट्रेडिंग या विषयावर आजचा लेख शेवटचा आहे. याचा अर्थ असा नव्हे की, तांत्रिक विश्लेषणाचा हा शेवटचा लेख आहे. तावीचा अभ्यास पुढच्या भागात करावाच लागेल. कारण ऑप्शन आणि फ्युचर्सच्या बाजारात त्याखेरीज गती नाही.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)

No comments:
Post a Comment