लग्नाचे लाडू खाऊन वर्ष होत आलं. आता पेढे कधी देताय...? प्रत्येक नवीन जोडप्याला आत्या, मावश्या, काक्या, माम्या अशा नातेवाईकांकडून प्रत्येक भेटीत हा प्रश्न विचारला जातो. पण, गेल्या काही वर्षांत हा प्रश्न विचारण्याची वेळ त्यांच्यावर बर्याचदा यायला लागलीय. कारण लग्नानंतर किमान काही वर्षं तरी मूल नको, असा हल्ली अनेक जोडप्यांचा निर्णय असतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पहिल्या बाळाचं बारसं झालेलं असायचं. जणू काही याचसाठी लग्न केलं होतं, असं ठरवून जराही वेळ न दवडता घरात पाळणा हालायचा. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. हल्ली अनेक जोडपी ठरवून पाच किंवा अधिक वर्षं मूल नको असा निर्णय घेतात.
खरं तर स्त्रियांच्या नोकरी करण्याचा याच्याशी फारसा संबंध नाही, असं बायकांशी बोलताना लक्षात येतं. याआधीही बायका नोकरी करतच होत्या. मात्र बहुसंख्य लग्नं अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच मुलाला मुलगी पसंत आहे पद्धतीने होत होती. यात, लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देणं वगैरे गोष्टींना थारा नव्हता. त्यामुळे नोकरी करणार्या बायकाही लग्नानंतर वर्षाच्या आत मॅटर्निटी लिव्हवर जात होत्या.
साधारणपणे गेल्या दशकभरात अरेंज्ड मॅरेजमध्येसुद्धा मुलामुलींनी लग्नाआधी भेटणं, फिरायला जाणं रूढ झालं. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला, आपल्या दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती येण्याअगोदर आपण एकमेकांना पुरेसा वेळ द्यायला हवा, ही जाणीव निर्माण झाली. शिवाय, बायका फक्त नोकरीऐवजी करिअरचा विचार करू लागल्या. मध्यमवर्ग झपाट्याने बदलत उच्च मध्यमवर्गात सामील झाला.
या सगळ्याचे अनेक परिणाम दिसू लागले. त्यातीलच एक म्हणजे अनेक घरांमध्ये पहिला पाळणाच पाचेक वर्षांनंतर हलू लागला.
ओळखीतल्या एका जोडप्याने नीट वेळापत्रकच आखून ठेवलंय. लग्नानंतर पाच वर्षं कर्ज संपवून टाकायचं. मधल्या काळात स्वतःचं घर, एक गाडी आणि पाच वर्षांनंतर मूल! दोघंही नोकरी करणारे. शिवाय, कामात सतत पुढे जाण्याची आस बाळगणारे. त्यामुळे सध्या त्यांना एकमेकांसाठीच वेळ नाही. त्यात मूल जन्माला घालून त्याच्यावर कशाला अन्याय करायचा?
आसपासच्या तरुण जोडप्यांना पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांच्यातलं शेअरिंग वाढलंय. एकमेकांना वेळ देणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नोकरी करणार्या जोडप्यांमध्ये तर वीकेण्ड म्हटलं की शॉपिंग, मुव्ही, डिनर हे समीकरणच रूढ झालंय. त्यामुळे घरात बाळ येण्याआधी ही सगळी मजा मनसोक्त करून घ्यायची, असाही एक विचार यामागे असतो.
कुटुंबनियोजनाची साधनं, वाढतं वय, दगदगीचं जीवनमान यामुळे दोघांच्याही शरीरावर परिणाम होऊन गुंता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच, अनेक जोडपी सुरुवातीलाच योग्य वैद्यकीय सल्ला घेतात. पाच वर्षांनी चान्स घ्यायचा, यासाठी आम्ही स्वतःला मेंटलीही तयार केलंय. पण सगळी काळजी घेऊनही मूल होण्यात अडचण आलीच तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं एका मैत्रिणीने अगदी ठामपणे सांगितलं.
विचारांमध्ये स्पष्टता आणि ठामपणा असल्यामुळे हल्लीची ही तरुण जोडपी नातेवाईकांच्या प्रश्नांनाही बधत नाहीत. लग्नाला काही वर्षं उलटल्यानंतरही मूल नसेल तर अशा जोडप्यांकडे बर्याचदा संशयाच्या, दयेच्या नजरेने पाहिलं जायचं. स्त्रियांना तर टोमणेही ऐकावे लागायचे. पण आता, ‘आमचं प्लॅनिंग आहे,’ असं एखादी नववधूही कॅज्युअली सांगून जाते.
मात्र, कुटुंबनियोजनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आर्थिक आहे. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाची जीवनपद्धतीच बदलली. अडीच वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठीही हल्ली तीस ते चाळीस हजार रुपये एकरकमी लागतात. शिवाय, प्रत्येक वाढदिवसाला मॅकडोनाल्ड किंवा तत्सम रेस्तरॉंमध्ये पार्ट्या, महागडी गिफ्ट्स, वीकेण्डला मॉल्सच्या फेर्या, मुलांची स्वतंत्र रूम, त्यात थीमप्रमाणे सजावट ही सगळी सुखं आपल्याही मुलांना मिळावी, ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. पण, इतक्या सुखांसाठी खूप पैसे लागतात. खूप पैसे कमावण्यासाठी खूप काम करावं लागतं... आणि खूप काम करावं लागतं म्हणून ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, त्याचं आगमनच लांबतं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पहिल्या बाळाचं बारसं झालेलं असायचं. जणू काही याचसाठी लग्न केलं होतं, असं ठरवून जराही वेळ न दवडता घरात पाळणा हालायचा. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. हल्ली अनेक जोडपी ठरवून पाच किंवा अधिक वर्षं मूल नको असा निर्णय घेतात. खरं तर स्त्रियांच्या नोकरी करण्याचा याच्याशी फारसा संबंध नाही, असं बायकांशी बोलताना लक्षात येतं. याआधीही बायका नोकरी करतच होत्या. मात्र बहुसंख्य लग्नं अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच मुलाला मुलगी पसंत आहे पद्धतीने होत होती. यात, लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देणं वगैरे गोष्टींना थारा नव्हता. त्यामुळे नोकरी करणार्या बायकाही लग्नानंतर वर्षाच्या आत मॅटर्निटी लिव्हवर जात होत्या.
साधारणपणे गेल्या दशकभरात अरेंज्ड मॅरेजमध्येसुद्धा मुलामुलींनी लग्नाआधी भेटणं, फिरायला जाणं रूढ झालं. त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला, आपल्या दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती येण्याअगोदर आपण एकमेकांना पुरेसा वेळ द्यायला हवा, ही जाणीव निर्माण झाली. शिवाय, बायका फक्त नोकरीऐवजी करिअरचा विचार करू लागल्या. मध्यमवर्ग झपाट्याने बदलत उच्च मध्यमवर्गात सामील झाला.
या सगळ्याचे अनेक परिणाम दिसू लागले. त्यातीलच एक म्हणजे अनेक घरांमध्ये पहिला पाळणाच पाचेक वर्षांनंतर हलू लागला.
ओळखीतल्या एका जोडप्याने नीट वेळापत्रकच आखून ठेवलंय. लग्नानंतर पाच वर्षं कर्ज संपवून टाकायचं. मधल्या काळात स्वतःचं घर, एक गाडी आणि पाच वर्षांनंतर मूल! दोघंही नोकरी करणारे. शिवाय, कामात सतत पुढे जाण्याची आस बाळगणारे. त्यामुळे सध्या त्यांना एकमेकांसाठीच वेळ नाही. त्यात मूल जन्माला घालून त्याच्यावर कशाला अन्याय करायचा?
आसपासच्या तरुण जोडप्यांना पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांच्यातलं शेअरिंग वाढलंय. एकमेकांना वेळ देणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. नोकरी करणार्या जोडप्यांमध्ये तर वीकेण्ड म्हटलं की शॉपिंग, मुव्ही, डिनर हे समीकरणच रूढ झालंय. त्यामुळे घरात बाळ येण्याआधी ही सगळी मजा मनसोक्त करून घ्यायची, असाही एक विचार यामागे असतो.
कुटुंबनियोजनाची साधनं, वाढतं वय, दगदगीचं जीवनमान यामुळे दोघांच्याही शरीरावर परिणाम होऊन गुंता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच, अनेक जोडपी सुरुवातीलाच योग्य वैद्यकीय सल्ला घेतात. पाच वर्षांनी चान्स घ्यायचा, यासाठी आम्ही स्वतःला मेंटलीही तयार केलंय. पण सगळी काळजी घेऊनही मूल होण्यात अडचण आलीच तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं एका मैत्रिणीने अगदी ठामपणे सांगितलं.
विचारांमध्ये स्पष्टता आणि ठामपणा असल्यामुळे हल्लीची ही तरुण जोडपी नातेवाईकांच्या प्रश्नांनाही बधत नाहीत. लग्नाला काही वर्षं उलटल्यानंतरही मूल नसेल तर अशा जोडप्यांकडे बर्याचदा संशयाच्या, दयेच्या नजरेने पाहिलं जायचं. स्त्रियांना तर टोमणेही ऐकावे लागायचे. पण आता, ‘आमचं प्लॅनिंग आहे,’ असं एखादी नववधूही कॅज्युअली सांगून जाते.
मात्र, कुटुंबनियोजनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आर्थिक आहे. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गाची जीवनपद्धतीच बदलली. अडीच वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठीही हल्ली तीस ते चाळीस हजार रुपये एकरकमी लागतात. शिवाय, प्रत्येक वाढदिवसाला मॅकडोनाल्ड किंवा तत्सम रेस्तरॉंमध्ये पार्ट्या, महागडी गिफ्ट्स, वीकेण्डला मॉल्सच्या फेर्या, मुलांची स्वतंत्र रूम, त्यात थीमप्रमाणे सजावट ही सगळी सुखं आपल्याही मुलांना मिळावी, ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. पण, इतक्या सुखांसाठी खूप पैसे लागतात. खूप पैसे कमावण्यासाठी खूप काम करावं लागतं... आणि खूप काम करावं लागतं म्हणून ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, त्याचं आगमनच लांबतं.
चांगल्या-वाईटाच्या शर्यतीत आपण दररोज स्वत:ला कोर्टात गुन्हेगाराला उभे करतात तसे उभे करून असतो. आपण चांगले आहोत हेच ऐकण्याची इच्छा असते. सर्वांना आयुष्याच्या कोर्टात निकाल आपल्याच बाजूने लागावा असे वाटत जरी असले तरी तसे होईलच असे नाही. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात यावर आपण आपली प्रतिमा बांधत असतो. राहून जाते ते स्वत:ला विचारणे की ‘मी कोण?’
आज आपण संगणकावर मराठीत टंकनासाठी उपलब्ध असणारी काही सॉफ्टवेअर्स बघणार आहोत. ही सॉफ्टवेअर्समुक्त अर्थात फ्री असल्याने तुम्ही ती फुकटात आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घेऊ शकता.
जीवनसत्त्व ‘ई’ हे एक ऍण्टी ऑक्सिडण्ट आहे. शरीरात तयार होणार्या हानीकारक पेशींची संख्या रोखते.
नवजात शिशुला सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्यप्रकाशात ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण यावेळी सूर्याच्या कोवळ्या किरणांमधील ‘ड’ जीवनसत्त्व त्या बालकाला मुबलक प्रमाणात मिळते. जे त्याच्या हाडांच्या बळकटीसाठी खूप गरजेचे असते. केवळ बालकांनाच नव्हे तर सर्वांनाच निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्हिटॅमिन ‘ड’ ची गरज भासते. व्हिटॅमिन ‘ड’ चे दोन प्रकार आहेत. ‘ड २’ (अर्गोकेलसीफेरोल) व ‘ड ३’ (कोलेफेलसीफेरोल)
मागील लेखात आपण विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रत्येकाला जाणवणार्या ताणतणावाच्या कारणांचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचा तपशिलात विचार करताना असे आढळले की क्षुल्लक वाटणार्या छोट्या छोट्या गोष्टी पण गंभीर स्वरूप धारण करू शकतात. सततच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे कायमस्वरूपी मानसिक किंवा शारीरिक समस्या उद्भवू शकतात. उदा. -
सध्या सर्वांनाच वेळ कमी पडतो. सकाळ होते. कामांना सुरुवात होते. गर्दी, दगदग, धावपळ, शोधाशोध, प्रवास, आदेश, कर्तव्य, प्रगती, ओढाताण, चढ-उतार सगळं काही दिनचर्येप्रमाणे घडत-उलगडत राहते. तेवढ्यात रात्र होते. दिवस संपतो. तो संपला पण आपल्यालाच संपल्यासारखे वाटते. दुसरा दिवस येणार हे माहीत असते, पण तो असाच जाणार हेही माहीत असते. ही जाणीव घेऊन येते चीडचीड, ऑफिसचे काम संपत नाही, घरातली कर्तव्य संपत नाहीत. आपल्याकडे काय नाही याचा हिशेब सुरू होतो. काय आहे यावर लक्ष द्यायची आपली सवय नसतेच म्हणून अर्धवट हिशेब लावून डोक्याला हात लावतो, पापण्या भिजवतो. बॉस, नवरा, बायको, नातेवाईक, सहकारी कसे आपल्याला समजत नाहीत याचा जाप करतो. उरला सुरलेला वेळही राग, रुसवे, द्वेष आणि वैताग करण्यात घालवतो. जे नाही त्यासाठी सगळेच रडतात पण जे आहे त्यात सुखी राहणारे कमी असतात. पिंपळाचा आदर्श ठेवा. त्याला कुठेही टाकले तरी तो रूजून येतो आणि मिळेल त्या हवा-पाण्याचा आधार घेत फोफावतो. याचा अर्थ पिंपळ फक्त ‘ऍडजेस्टमेंट’ करतो असे नाही. त्याला कळते फक्त फोफावणे, तेच त्याचे ध्येय असते. जे हवा पाणी असेल त्याच्याशी दोस्ती करून मोठे व्हायचे, फोफवायचे एवढेच त्याच्या मनात असते. बघता बघता पिंपळ सारा आकाश व्यापून टाकतो. मोठा होतो. भरपूर सावली देतो. कधी काळी त्याला उपटून टाकायचा विचार करणार्यांनाही तितकीच सावली देतो. पिंपळाचे आयुष्य फोफावणे आणि सावली देणे हेच आहे. तसे पाहिले तर मनुष्याचे आयुष्यही तसेच हवे. मोठे होऊन इतरांना मोठे करणार्या पिंपळासारखे जगा. येणार्या प्रत्येक परिस्थितीशी मैत्री करा. त्यातूनच मोठे व्हाल यावर विश्वास ठेवा. सर्वांना आपल्या समजूतदारपणाची व मायेची सावली द्या. पिंपळ होऊन पाहा. कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करीत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवून टाकणारा, आवाज करीत आपल्या बाहूंनी सर्व जगाला कवेत घेणारा तो कधी स्वत:शीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा. कधी एखाद्या सर्वसंग परित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्चल होऊन स्वत:ची सर्व जाणीव हरपून बसलेला. पिंपळाची पानं पुस्तकात ठेवली जातात. पिंपळाचा आदर्श ठेवलात तर तुमची आठवण ही जपली जाईल. मोठे व्हा, मोठे करा, पिंपळ व्हा. 
शरीरातल्या टिश्यूंच्या वाढीसाठी आणि पुनर्निर्मितीसाठी जीवनसत्त्व ‘क’ची आवश्यकता असते. आपले शरीर क जीवनसत्त्वाची निर्मिती करीत नाही. म्हणून ते बाहेरून अन्न किंवा फळ-भाज्यांच्या रूपात मिळवावे लागते. आहारात जर क जीवनसत्त्व नसेल तर केस, त्वचा रूक्ष होणे, अंग सुजणे, हातपाय दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. याशिवाय कॅन्सरला प्रतिबंध करणारे ऍण्टिऑक्सिडन्ट जीवनसत्त्व ‘क’मध्ये असल्यामुळे आहारात त्याची आवश्यक मात्रा जरूर असावी.
आज मानसिक ताणतणाव आबालवृद्ध, स्त्री-पुरुष प्रत्येकालाच भेडसावत आहे. स्थळ-काळ, जात-धर्म यापैकी कशाचेच बंधन त्याबाबत नसते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला जाणवणार्या तणावाचे कारण आणि स्वरूप वेगवेगळे असते.
Savitribai Phule
हा घास चिऊचा...हा घास काऊचा...असं करत जेवणाचे चारदोन घास मुलांच्या पोटात ढकलताना समस्त आईंच्या नाकी नऊ येतात. एकतर स्वत:च्या जेवण्याच्या आधी मुलांना भरवायचे असल्यामुळे आईच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळेला असतो आणि मुलांना मात्र जेवणापेक्षा खेळण्यात रस असतो. आपल्या बाळाने काहीतरी खावं असं तिला सतत वाटत असतं. पण काय भरवायचं असा प्रश्न पडत असतो. काही मुलं सतत काहीतरी खातच असतात. अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी सकस आहाराची सवय कशी लावायची असे प्रश्न आईला नेहमी पडत असतात.
आपण कुठेही उभे राहिलो की टेकतो. गरज नसतानाही नकळत आधाराची ओढ मनाला असतेच. आपण श्वास घेताना विचार करत नाही. आपण श्वास घेत आहोत ही क्रिया आपल्या विचारांवर अवलंबून नसते. तसेच स्वत:ला न सांगता आपण आधार शोधत असतो. घरात, कार्यालयात, गर्दीत, एकटेपणात, सगळ्यात. बाजूला बसून अश्रू पुसणे हाच फक्त ‘आधार’ आहे हे समजणार्यांनी जरा आपल्याच मनाशी संवाद साधावा. आधाराची व्याख्या काय? आधार म्हणजे दगड होणे. देवळातली देवाची मूर्ती होता आले तर तुम्ही आधाराचा खरा अर्थ समजाल. प्रत्येक देवळात येणारा भक्त आपल्या सुख-दु:खाचा हिशोब मांडत असतो. कधी हात जोडून रडतो तर कधी हसतमुखाने सुखाचे क्षण वाटतो. कधी जड मनाने माफीही मागतो, तर कधी रागरागाने आपले हक्क मागतो. आधार त्या भक्ताची गरज व अट्टहास दोन्ही असते. खरं तर आधार द्यायचा की नाही हा पर्याय त्या देवाकडे नसतोच कारण आधार देण्याची गोष्ट नाही, ती घेण्याची गोष्ट आहे. ज्याला गरज भासते तो ‘आधार’ घेतोच. कुटुंबात, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये अनेकदा लोक तेच तेच विषय आणि तीच तीच रडगाणी घेऊन येतात. ते काय सांगणार ते आपण आधीच हजार वेळा ऐकलेले असते. त्यांचा त्रास फार असला तरी त्या त्रासाचे मोल आपल्या मनात उतरत जाते. पण तसा विचार का करावा? जर तुम्ही त्या देवळातला दगड वाटत असाल तर ते तुमच्याकडून आधार घेणारच. अगदी तुमच्या समंतीशिवाय अशावेळी न वैतागता व न त्रागा करता थोड्या वेळासाठी देवळातला दगड व्हा. ऐकून घ्या. तुम्ही काही बोलला नाहीत तरी चालेल. देवळातील दगडाची मूर्तीही काहीच बोलत नाही. ती फक्त असते. तुम्हीही असा. कुणी आपला आधार घेत असेल तर घेऊ द्या. काही क्षणांसाठी दगडी का होईना पण देव होण्याची संधी सोडू नका. फक्त मोठेच छोट्यांना आधार देतात असे नाही. जगात कुणीही कुणाचाही आधार होऊ शकते. मिर्जा गालीबने त्यांच्या एका शायरीत म्हटले आहे.
‘ब’ जीवनसत्त्वाचे १,२,३,५,६,१२ हे सहा प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकाराचे उपयोग, त्यांची कार्यपद्धती व त्याच्या अभावाने उद्भवणारे आजार वेगवेगळे आहेत.