- जांभळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे.
- जांभळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.
- जांभळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निघून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.
- पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोनतीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.
- पिकलेली जांभळे खाल्याने पित्तामुळे होणारे जुलाब बंद होतात.
- हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा. आराम मिळतो.
- शरीराला जखम झाल्यास वा खरचटल्यास जांभळााची पाने लावावीत. त्यामुळे रक्त थांबते.
- जांभळाची बी पाण्यात उगाळून घामोळ्यावर लावले असता घामोळे कमी होते.
- जांभळ्याच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.
- जांभळ्याच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते. दात बळकट होतात. तसेच घशाची सूज कमी होते.
- दातांतून रक्त येत असल्यास जांभळाची सालं बारीक करून त्याचे मंजन करावे. त्यामुळे दातदुखीला आराम मिळतो.
- मधुमेही रुग्णांना जांभूळ हे अमृतफळ समान आहे. जांभळाच्या नियमित सेवनाने मधुमेह आटोक्यात येण्यास मदत होते. जांभळातल्या तुरटपणाचा गुण मधुमेहामध्ये फायदेशीर ठरतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण रोज खावे. तसेच पिकलेली जांभळे वाळवून त्याची पूड करावी. ही पूड एक ते दीड चमचा रोज पाण्यासोबत घ्यावी. असे रोज केल्याने काही दिवसांतच लघवीतून साखर जाणे बंद होते.

सौजन्य :- मानिनी, सामना, ०२०६२०११.
No comments:
Post a Comment