इंटरनेट हा आजच्या ई-युगातील परवलीचा शब्द झाला आहे व नेटीझन्सला इंटरनेट वापरताना जरा काही अडचण आली तर मात्र आयुष्य क्षणभर थांबल्यासारखे होते. इंटरनेट वापरताना येणार्या काही छोट्या छोट्या अडचणींवरचे काही रामबाण इलाज जे आपले इंटरनेटचे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतात. स्लो इंटरनेट : इंटरनेट जर स्लो चालत असेल किंवा अधूनमधून डिस्कनेक्ट होत असेल तर खालील गोष्टींची खातरजमा करून घ्या.
ब्रॉडबॅण्ड राऊटर सेटिंग्ज - जर तुम्ही ब्रॉडबॅण्ड राऊटरचा वापर करून इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या ब्रॉडबॅण्ड राऊटरमधील MTU सेटिंग्ज बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्या. MTU सेटिंग्जमध्ये जर कमी किंवा जास्त MTU सेट झाला असेल तर तुमच्या इंटरनेटच्या वेगावर परिणाम होतो व बर्याचदा इंटरनेट कनेक्शन घेतल्यावर हे सेटिंग ‘जैसे थे’ अशाच स्थितीत असतात त्यामुळे इंटरनेट कनेक्शन घेतल्यावर तुमच्या इंटरनेट सेवा पुरवणार्या कंपनीकडून राऊटरचे MTU सेटिंग करून घ्यायचे विसरू नका.
वायफाय स्लो इंटरनेट : जर तुमचे वायफाय इंटरनेट स्लो चालत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तपासावी ती म्हणजे तुमचे ‘वायफाय’ इंटरनेट तुमच्याव्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूचे किंवा शेजारी तर वापरत नाहीत ना? ‘वायफाय’ इंटरनेट अनेक व्यक्ती एकाच कनेक्शनवरून जर वापरत असतील तर ते स्लो चालते. त्यामुळे तुमच्या वायफाय इंटरनेटला तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही ‘नो ऍक्सेस’ स्थितीत सेट करा.
बॅकग्राऊंड ऍप्लिकेशन्स : जर तुमच्या संगणकातील संगणक प्रणाली किंवा इतर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स जसे ऍक्रोबॅट रिडर किंवा फ्लॅश प्लेयर इ. त्यांचे वेळोवेळी येणारे नवनवीन अपडेटस् तुमच्या माहितीव्यतिरिक्त तुमच्या संगणकावर थेट ‘बॅकग्राऊंड’ डाऊनलोड करीत असतील तरीदेखील तुमच्या ‘इंटरनेट’चा वेग कमालीचा मंदावतो. त्यामुळे ऍटोमेटिक डाऊनलोड या पर्यायाऐवजी ‘नोटीफाय मी’ हा पर्याय सिलेक्ट करावा. त्यामुळे वेळोवेळी येणारे अपडेटस् तुम्ही तुमचे इंटरनेटवरील काम संपल्यावर डाऊनलोड करू शकता व त्यामुळे इंटरनेटचा वेगदेखील वाढतो.
इंटरनेट केबल्स : तुम्ही टेलिफोनद्वारे इंटरनेट वापरत असाल व तुमच्या टेलिफोनमध्ये जर काही डिस्टर्बन्स असेल तरीदेखील तुमचे इंटरनेट स्लो चालू शकते. त्वरित अशा केबल्स बदलून टाकणे गरजेचे असते. त्याचबरोबर जर तुम्ही USB केबलचा वापर करून इंटरनेटचा वापर करीत असाल तर USB3.0 या नवीन तंत्रज्ञानावर चालणार्या केबलचा वापर करा. त्यामुळे इंटरनेटच्या स्पीडमध्ये कमालीची सुधारणा झाल्याचे तुम्हाला आढळेल.
इतर कारणे : जर तुम्ही एकाच वेळेस इंटरनेटवर चालणार्या अनेक ऍप्लिकेशन्स वापरत’ असाल तरीदेखील तुमच्या इंटरनेटचा वेग मंदावतो. त्यामुळे शक्यतो दोनपेक्षा अधिक इंटरनेट ऍप्लिकेशन्स चालू ठेवू नयेत. अनेकदा अनेक ऍप्लिकेशन्स इंटरनेटवर चालू असल्यास तुमच्या संगणकाचा वेगदेखील मंदावतो. त्यामुळे ज्या ऍप्लिकेशनचा तुम्ही ऍक्टिव्हली वापर करीत असाल त्याच ऍप्लिकेशन्स चालू ठेवा. जर तुम्ही ‘नेट बंँकिंग’ किंवा कोणतीही ऑनलाईन सेवा जिथे तुमच्या बंँक किंवा क्रेडिट कार्डचा वापर होणार असेल तेव्हा शक्यतो इंटरनेटवरील इतर सर्व संकेतस्थळे बंद करावीत. कारण अशा सेवा अनेकदा ‘मल्टीपल गेटवेजचा’ वापर करतात व त्यावेळी इंटरनेटचा वेग खूप महत्त्वाचा ठरतो.
फास्ट डाऊनलोडसाठी - जर तुम्ही इंटरनेटचा वापर गाणे, चित्रपट किंवा इतर कोणत्याही गोष्टी डाऊनलोड करण्यासाठी करीत असाल तर ‘डाऊनलोड ऍक्सलेटर प्लस (DAP) हे मॅजिक सॉफ्टवेयर तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करून घ्या. त्यामुळे इंटरनेटवरून डाऊनलोडिंगचा वेग कमालीचा वाढतो. DAP मल्टी चॅनल तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवरील व्यस्त ट्रॅफिक असणार्या रस्त्यापेक्षा ज्या चॅनलवरून तुमचा डेटा लवकरात लवकर व जवळच्या चॅनलवरून डाऊनलोड करून देतो. झ् फ्री सर्व्हिस व पेड सर्व्हिस अशा दोन्ही प्रकारांत मिळू शकतो. अधिक माहितीसाठी http://www.speedbit.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
इंटरनेटचा वेग कसा तपासाल? - तुम्ही वापरत असणार्या इंटरनेटचा वेग किती आहे हे तपासणे खूप सोपे आहे. त्यासाठी http://www.speedtest.net/ या संकेतस्थळावर भेट द्यावी व त्यानंतर या संकेतस्थळावरील ‘बिगीन टेस्ट’वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा वेग, डाऊनलोडचा वेग व अपलोडचा वेग काही क्षणातच तुमच्यासमोर हजर होतो. हा रिझल्ट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन शेयरदेखील करू शकता. जर तुम्हाला वारंवार ‘स्लो इंटरनेट’चा अनुभव येत असेल तर तुमच्या इंटरनेट सर्व्हिस देणार्या कंपनीला http://www.speedtest.net/ वरील रिझल्टस् जरूर दाखवावा.
मॅजिक फास्ट - http://www.irctc.co.in/ ही रेल्वे रिझर्व्हेशनसाठी वापरले जाणारे संकेतस्थळ आहे व या संकेतस्थळावर अक्षरश: लाखो लोक रेल्वे तिकीट बुक करीत असतात. अशा अनेक संकेतस्थळावर कित्येकदा आपणास वारंवार डिस्कनेक्शनचा अनुभव येतो, जर तुम्ही कधी अशा अडचणीत सापडला तर फक्त एकच गोष्ट करा. तुमच्या संगणकाच्या कमांड प्रॉम्प्टवर जाऊन tracertirctc.co.in असे किंवा इतर संकेतस्थळाचे नाव टाइप करा. क्षणार्धात तुमच्या संगणकावरील स्लो चालणारी संकेतस्थळे ‘मॅजिक फास्ट’ चालू लागतील.
Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना

No comments:
Post a Comment