Thursday, June 16, 2011

मोबाईल

मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूला रेडिएशनचा धोका असतो. पण त्यामुळे मोबाईल वापरणे बंद करता येणार नाही. म्हणूनच मोबाईल वापरणार्‍यांनी ही काळजी जरूर घ्यावी. मोबाईलमधील कमीत कमी रेडिएशन मेंदूपर्यंत पोहोचावे यासाठी या काही साध्या साध्या गोष्टी जरूर करा.


- हॅण्ड्स फ्री वापरा :


मोबाईल हॅण्डसेट तुमच्या शरीरापासून जितका लांब असेल तितकाच रेडिएशनचा धोका कमी असतो. त्यामुळे फोन आला तरी हॅण्ड्स फ्री (हेडफोन) लावून त्याद्वारेच बोलावे.

- थेट मोबाईल कानाला लावत असाल तर मोबाईल हॅण्डसेटला कमीतकमी भाग हाताने व्यापला जाईल याची काळजी घ्या. संपूर्ण हाताने मोबाईल झाकला की मोबाईलमधून सिग्नल पाठवण्याची आणि स्वीकाराण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे फोन आपली क्षमता एकवटून जास्तीचे रेडिएशन निर्माण करतो. म्हणून फोन धरताना हाताने नुसता आधार द्या.

- फुल नेटवर्कमध्ये बोला :


जिथे नेटवर्क कमी आहे अशा ठिकाणी फोनवर बोलत राहण्याचा अट्टहास नको. नेटवर्क पूर्ण असेल तर फोनचे रेडिएशन कमी असते आणि नेटवर्क कमी असेल तर हेच रेडिएशन जास्त असते.

- कमी बोला :

मोबाईलवर शक्यतो खूप वेळ बोलणे टाळा. जितके जास्त वेळ तुम्ही फोनवर बोलाल तितकाच जास्त तुमचा रेडिएशनशी संबंध येतो.

- लॅण्डलाइन वापरा.

मोबाईलच्या स्वस्त सर्व्हिसमुळे आजकाल अनेकांनी आपल्या लॅण्डलाईन काढून टाकलेल्या आहेत. परंतु रेडिएशनच्या वाढत्या धोक्यामुळे आता मोबाईलचा अतिवापर टाळणे आवश्यक बनले आहे. कार्यालयात किंवा घरी असताना शक्यतो लॅण्डलाईनचा वापर करणे सुरक्षित आहे.

- ज्या वास्तूमध्ये खूप इलेक्ट्रिकल साधने आहेत अशा ठिकाणी मोबाईल वापरू नका. हॉस्पिटल किंवा एअरक्राफ्ट अशा ठिकाणी मोबाईल वापरणे टाळावे.

सौजन्य:- इंद्रधनू, सामना १४०६२०११

No comments: