आयुष्यात विविध प्रकारचे प्रसंग आणि विविध प्रकारची माणसं भेटतात. चांगले बूट नाही म्हणून रडणारेही भेटतात, तसेच कुबड्यांवर चालत हसणारेही भेटतात. शिक्षणाचा कंटाळा करून थकलेलेही सापडतील आणि शाळेच्या वर्गाबाहेर लपून शिकणारेही दिसतील. ‘प्रॉब्लेम’ या शब्दाने सर्वांचा ताबाच घेतला आहे. संकट म्हणजे खूप मोठे तुफान आणि प्रॉब्लेम म्हणजे छोटे-मोठे वादळ असा समज करून जगणारे नियमितपणे आपल्या बिचारेपणाचे पालन-पोषण करीत असतात. अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाणे प्रत्येकाला फार छान जमते. काहीजण तर घाबरण्याकरिता असली नसलेली सगळी ताकत लावतात. प्रॉब्लेम काय, तो कसा सोडवावा याकडे दुर्लक्ष होते. राहते काय तर घाबरणे. बुडणार्याचा मृत्यू होतो ५०ज्ञ् पाण्याच्या प्रभावाने आणि ५०ज्ञ् भीतीने. भीतीने शस्त्र टाकले तर ‘विजय’ शत्रूला भेट म्हणून दिल्यासारखेच नाही का? बर्याचदा आपणच आपले शत्रू बनतो. नकारार्थी गणिते मांडून आपणच आपल्या जीवनाची उत्तरे चुकवितो. भय सर्वात मोठा राक्षस आहे. या राक्षसाला मारायला देवाने पाठवलेले दूत म्हणजे संयम आणि युक्ती. भय आपल्या मेंदूला व्यापून काही सुचू देत नाही. या भयाला मनात शिरू देऊ नका. भय आणि भैया एकदा का शिरले की, निघता निघत नाहीत. लॅन्स आर्मस्ट्रँग नावाचा एक खेळाडू होता. सायकल रेसिंगचा बादशहा. सायकलिंगच्या सर्व रेस जिंकण्याची सवय असलेला लॅन्स कधीच घाबरला नाही. ‘हरण्याला’ही नाही आणि ‘कॅन्सर’लाही नाही. तो लढत राहिला, कॅन्सरशी नाही तर त्याच्या मनातील ‘भयाशी.’ तो सांगतो, ‘‘मी रोज सकाळी उठून एक युक्ती करायचो. आरशात पाहून स्वत:ला सांगायचो की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम दिवस आहे. मला हवे ते आणि हवे तसे मिळणार. मी आजारी नाही. आजाराला मी झालोय. त्यामुळे आजाराची मला दया येते.’’ जगण्याची तीव्र इच्छा, जगण्याची ४०ज्ञ् संभावना आणि लढण्याची १००ज्ञ् तयारी असल्यामुळे अशा परिस्थितीतही लॅन्स जिंकतच राहिला. कॅन्सरनी त्रासलेल्यांना आत्मविश्वास कसा मिळवावा व उपाय करण्यासाठी एक संस्थादेखील काढली. कधी कधी शक्ती संपली वाटले की, युक्तीचा वापर करा. संकट म्हणजे शेवट नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग ‘भय पळवणे, युक्ती लढवणे.’
अनेकदा आनंदाचे, भाग्याचे, प्रगतीचे नेटवर्क गेल्यासारखे वाटते. अस्वस्थपणा वाढतो. मोबाईलचे नेटवर्क गेल्यावर आयुष्य थांबल्यासारखे वाटते. तसेच भयाने कोलमडून पडणारे नेटवर्क सोडा. नवे नेटवर्क घ्या, जे कुठेही तुटणार नाही. घाबरू नका, युक्ती शोधा.
‘‘गेट आयडिया!’’
dr.swapnapatkar@gmail.com
अनेकदा आनंदाचे, भाग्याचे, प्रगतीचे नेटवर्क गेल्यासारखे वाटते. अस्वस्थपणा वाढतो. मोबाईलचे नेटवर्क गेल्यावर आयुष्य थांबल्यासारखे वाटते. तसेच भयाने कोलमडून पडणारे नेटवर्क सोडा. नवे नेटवर्क घ्या, जे कुठेही तुटणार नाही. घाबरू नका, युक्ती शोधा.
‘‘गेट आयडिया!’’
dr.swapnapatkar@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ११०६२०११.
No comments:
Post a Comment