Thursday, June 09, 2011

नेत्रदान समज-गैरसमज

कायमचे डोळे मिटून हे जग सोडून जाताना दोन अंध व्यक्तिंना हे जग पाहण्याची संधी तुम्ही केलेल्या नेत्रदानामुळे मिळते. म्हणूनच नेत्रदान हे श्रेष्ठदानापैकी एक मानले जाते. पण आजही नेत्रदानाविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजचा अंधार दूर करण्यासाठी आणि नेत्रदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० जूनला जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...


- एक वर्षापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करू शकते.

- मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.

- अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाही तसेच रॅबिज, सिफिल्स, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्स अशासारख्या रोगाने बाधित असणार्‍यांना आपले डोळे दान करता येत नाहीत.

- हिंदुस्थानात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टिहीन आहेत.

- अंध लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण ६ ते १२ वर्षांखालील मुलांचे आहे.

- दरवर्षी नेत्रहीनांच्या संख्येत तीस हजारांची भर पडते.

- श्रीलंकेत नेत्रदान झाल्याशिवाय अंत्यसंस्कारच होत नाहीत. म्हणूनच कॉर्नियल अंधत्वाची एकही व्यक्ती तेथे नाही व हा देश शेजारच्या ६० लहान- मोठ्या देशांत कॉर्निया नियात करतो.

- कॉर्निया म्हणजे केवळ बुब्बुळावरील जो काळा भाग त्यावरील टिकलीच्या आकाराचा पारदर्शक पडदा.

- आपण मृत झाल्यावर इतर सर्वच अवयव मृत होतात. फक्त डोळा (कॉर्निया) हा एकच भाग ६ ते ८ तास खराब होत नाही.

- कुठल्याही वयाची, चष्मा लावणारी, मधुमेहाने पीडित अथवा मानसिक तणावाने ग्रस्त व्यक्तीही नेत्रदान करू शकते.

- नेत्रदानानंतर चेहरा विदुप होत नाही.

- एका व्यक्तीच्या नेत्रदानातून दोन व्यक्तींना दृष्टीलाभ होतो.

सौजन्य:- चिरायू, सामना ०९०६२०११.

No comments: