Sunday, June 12, 2011

गुगल क्रोम बुक लॅपटॉप नेक्स्ट जनरेशन

सॅमसंग व एसर या जगविख्यात कंपन्या गुगलचे नवीन क्रोम बुक आणणार आहेत. १२ इंची थ्ण् स्क्रीन व ८.५ तासांचा बॅटरी बॅकअप अशा सॉलीड वैशिष्ट्ये असणार्‍या क्रोम बुकसाठी आपणास १५ जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे व त्यानंतर इंटरनेटवरून ऑनलाईन पद्धतीने आपण तो विकत घेऊ शकतो.
‘१५ जूनला गुगल आपला महत्त्वाकांक्षी ‘लॅपटॉप गुगल क्रोम बुक’ जगासमोर आणणार आहे. गुगल क्रोम बुक गेल्या दोन दशकांच्या मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणालीला थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. गुगलच्या ‘ऍण्ड्रॉईड’ या मोबाईल प्रणालीने नोकियाच्या ‘सिंबियन’ या मोबाईल प्रणालीला अक्षरश: वर्षभरातच मागे टाकले व मोबाईल विश्‍वात स्वत:चा दबदबा निर्माण केला. असेच काहीसे गुगल त्यांच्या ‘क्रोम बुक’ या लॅपटॉपद्वारे करेल असे त्यांचे वैशिष्ट्य बघून वाटते. सध्या तरी सोशल नेटवर्किंग ब्लॉग्ज व इंटरनेटच्या जगात फक्त चर्चा आहे ती गुगल क्रोम बुकची व त्यांच्या वैशिष्ट्यांची.


- डेटा ऑन क्लाऊड, वेब ऍप्लिकेशन्स : ‘डेटा ऑन क्लाऊड’ या अनोखी सेवेमुळे तुमच्या सर्व फाईल्स, ऍप्लिकेशन्स तसेच तुमचा सर्व डेटा ‘क्लाऊड’ अर्थात गुगलच्या इंटरनेट स्टोरेजवर थेट सिंक अर्थात जमा होत राहील व हा डेटा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतरांना शेअरदेखील करू शकाल. इंटरनेट स्टोरेजमुळे तुमचा डेटा नष्ट होण्याची किंवा हरवण्याची शक्यता कमी होईल. गुगल क्रोम बुक आपणास आपल्याला हवी ती ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर थेट त्यांच्या ‘क्रोम वेब स्टोअर’च्या माध्यमातून पुरवते. म्हणजेच जगातील हवे ते सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन आपण आपल्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करू शकता.

- फ्रेन्डस् लॉगीन : क्रोम बुकमधील फ्रेन्डस् लॉगीनमुळे आपले सर्व सेटिंग्ज तसेच माहिती आपल्यापुरती मर्यादित ठेवली जाते व आपणाव्यतिरिक्त जरी तुमचा लॅपटॉप कोणीही वापरला तरी त्यात कोणालाही काहीही बदल करता येत नाही.

- ऑलवेज कनेक्टेड : पारंपरिक इंटरनेट पर्यायाबरोबरच क्रोम बुकवर तुम्ही ३उ तसेच ैग्-र्ंिग् चा वापर करून कधीही व कुठेही इंटरनेट वापरू शकता. त्यामुळे लॅपटॉप सुरू झाल्यावर लगेच तुम्ही इंटरनेटशी जोडले जाऊ शकता. ३उ ची सोय असल्यामुळे लॅपटॉपवरच तुम्ही ‘व्हीडिओ कॉलिंग’ मल्टीप्लेयर गेमिंग, लाईव्ह टी.व्ही. ही मोबाईलवर चालणारी वैशिष्ट्ये तुमच्या लॅपटॉपवरदेखील वापरू शकता.’

- इन्स्टंट वेब : तुमचा संगणक किंवा लॅपटॉप बुट अर्थात चालू होण्यासाठी कमीत कमी १ ते २ मिनिटे लावतो. पण नवीन ‘क्रोम बुक’ फक्त ८ सेकंदांत चालू होईल व क्रोम बुक सुरू झाल्यावर तुम्ही क्षणार्धात इंटरनेट किंवा कोणतीही ऍप्लिकेशन सुरू करू शकाल. इन्स्टंट वेब हे नवीन वैशिष्ट्य सध्या अस्तित्वात असणार्‍या सर्व लॅपटॉपपेक्षा अधिक वेगवान असणार आहे.

- सायबर सेफ्टी : गुगल ‘क्रोम बुक’ सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील आपणास अनेक बिल्ट इन असे पर्याय देतो. त्यामुळे इंटरनेट वापरताना होणार्‍या अनेक सायबर हल्ल्यापासून क्रोम बुक आपले संरक्षण करतो. क्रोम बुक सॅण्डबॉस्ंिकग, व्हेरीफाईड बूट, डेटा इनक्रिप्सन, रिकव्हरी तसेच डिफेन्स इन डेफ्थ अशा नव्या जगातील सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या सर्व निकषाची पूर्तता करतो. त्यामुळे ‘इंटरनेट’ वापरताना आपणास कोणतीही काळजी करायची गरज नाही.

क्रोम बुक संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण गुगलला भेट देऊ शकता. www.google.com/chromebook
Techno.savvy@live.com
सौजन्य :- इंद्रधनू, सामना

No comments: