- सूर्यमालेमध्ये फक्त शनीलाच नाही तर गुरू, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांनादेखील स्वत:भोवती कडी आहे.- सात बहिणी नावाने ओळखल्या जाणार्या कृत्तिका तारकागुच्छामध्ये प्रत्यक्षात 130 तारे आहेत. त्यातील 7 प्रखर तार्यांमुळे त्याला सात बहिणी असे म्हणतात.

- प्लॅनेट (Planets) म्हणजेच ग्रह या शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये ‘भटक्या’ असा होतो.
- जेव्हा आपण देवयानी आकाशगंगेकडे (Andromeda Galaxy) पाहत असतो (जी आपल्यापासून 22 लाख प्रकाशवर्षे दूर आहे) तेव्हा आपण 22 लाख वर्षांपूर्वीची देवयानी आकाशगंगा पाहत असतो कारण तिच्यापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 22 लाख वर्षे लागतात.

- बुध ग्रह जरी सूर्याच्या जवळ असला तरी प्रत्यक्षात शुक्र ग्रहाचे तापमान बुधापेक्षा अधिक आहे. शुक्रावरील दाट वातावरणामुळे सूर्याची उष्णता त्याच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात जमा होते.
- मृग तारकासमूहातील ‘काक्षी’ (Betelgeuse) हा तारा आकाराने इतका मोठा आहे की त्याला जर आपल्या सूर्याच्या जागी ठेवलं तर तो गुरू ग्रहाएवढी जागा व्यापेल.
- बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. ताशी 1,07,000 वेगाने तो पुढे सरकतो. (म्हणजेच प्रति सेकंद 29.75 मैल किंवा प्रती सेकंद 47.87 कि.मी.)
सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११
No comments:
Post a Comment