दहावी- बारावीचे निकाल लागले की यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक, सत्कार वगैरे होतातच. पण यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यशस्वी असतातच असे नाही. खर्या अर्थाने यशस्वी पालक बनायचं असेल तर पालकांना आजचं मूल बनून आपल्या पाल्याशी संवाद साधावा लागेल.
आपसातील नातेसंबंधांनी त्रस्त झालेले पालक आणि मी यांची बैठक बर्याच वेळा एकाच कारणासाठी होत असते. ती किंवा तो हाताबाहेर चालला आहे. अशा वेळी मी पालकांना विचारतो तुम्ही किती स्वत:च्या हातात आहात?
पालक झालात म्हणजे सर्वस्व झालात असेही नाही. मुलाकडून शिस्तीची अपेक्षा आहे. म्हणजे काय लहान मुलांनी प्रौढासारखं वागावं काय? तुमचं मन प्रौढ झालं असेल पण प्रगल्भ झालं असं नाही. म्हणून न चुकता पहिला प्रश्न मी पालकांना विचारतो? तुम्ही स्वत:चं तुमच्या स्वत:शी नातं किती चांगलं आहे? जर तुमचं तुमच्याशी जमत नसेल तर तुमच्या सहचराशी कितपत जमेल हे नातं? या जैविक मीलनातून जन्माला आलेल्या अपत्याबरोबर हे सहजीवनाचं नातं कसं जमणार आहे याचा विचार तुम्ही केला आहे का?
तुमच्या अपूर्ण स्वत:ला पूर्ण करण्यासाठीचा अट्टहास आणि त्यातून निर्माण झालेला ताणतणाव ही तुमची खरी समस्या आहे असं तुम्हाला वाटत नाही का? पालक बुचकळ्यात पडतात. कारण सोपं आहे. लहानपणापासून त्यांचा लॉजिकशी संबंध येऊ दिला जात नाही किंवा फक्त मान्यताप्राप्त सोल्युशनशी जमवून घेणं किंबहुना हे असंच असतं याबरोबर राहण्याची तुमच्या मनाची घडी घालून दिली जाते. आता तुम्हीसुद्धा परंपरेने मुलाला हेच देणार असाल तर संघर्ष अटळ आहे.
विचारा स्वत:ला काही प्रश्न
- तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या कौटुंबिक कायदा आणि सुव्यवस्था धोरणात उमलू देण्याची संधी दिली होती का?
- लहानपणी किती हास्यास्पद नियमांचा आणि कायद्याचा राग आला होता आणि मन किती रडलं होतं ते आता आठवतं का?
- खासकरून मुलींनी ‘मुलीच्या जातीला इतका तोरा चांगला नाही’ असं किती वेळा ऐकलं होतं किंवा मुलांनी ‘फार शेफारला आहे आजकाल’ हे किती वेळा ऐकलं होतं?
- आज्ञाधारक मूल म्हणजेच आदर्श मूल हे किती वेळा बिंबवलं गेलं होतं?
- घरात झांथस किंवा झांटीपी यांच्या कातरीत तुम्ही सापडला होतात का? हे दोघं भांडायचे आणि उपाशी राहायचा इसाप.
हे असं थोड्याफार फरकाने घराघरात होतं आणि प्रत्येकाच्या वाट्याला येतं. तो विशुद्ध आणि सात्त्विक जीव या गदारोळात जे शिकला तेच आता पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो आहे. यात गंमत अशी आहे की हे सगळे नकळत मनात घर करून बसलं होतं आणि ते आता सत्ता गाजवतं आहे. याची कल्पना कुणालाही नसते.
मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलांबरोबर आजचं मूल होऊन यशस्वी पालक होणं.
मुलांना आपल्या अंगातल्या दैवी अवतारापासून (अभ्यास नाही केला तर हिरण्यकश्यपू) वाचवणं. त्यांच्या मनाला होणार्या इजांपासून त्यांना जपणं आणि बाहेरच्या जगातल्या हिंसाचारापासून (शारीरिक वा मानसिक) स्वत:चा बचाव करायला शिकवणं.
रोज नव्या लढ्याला सामोरे जाणारे,स्वत:ला निराशेच्या गर्तेपासून कसोशीनी दूर ठेवणारे किंवा त्याला बळी पडणारे पालक हे शिवधनुष्य उचलू शकतील का?
आतापर्यंतचं हे निरुपण कदाचित अविश्वसनीय किंवा अमान्य आणि तर्कविसंगत समजण्याचे सगळ्यांना पूर्ण अधिकार आहेत. पण आहे त्या परिस्थितीबद्दल दुमत असण्याची शक्यता त्या मानानी कमी आहे. फारच क्वचित एखादा जागरूक पालक हे नाकारू शकेल पण ते सगळं व्यक्तीसापेक्ष असेल. चला आपण घटकाभर समजू या की पूर्वायुष्याचा आणि आताच्या पालकत्वाचा काहीच संबंध नाही. आणि विचार करू या पालकत्वाच जसे आहे जेथे आहे या धर्तीवर.
उद्याचा सक्षम माणूस तयार करण्याची जबाबदारी पालकांवर आहे. पाल्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची जबाबदारी पण पालकांची आहे. ही दोन गृहीतके येथे सगळ्यांना मान्य आहेत असे धरून पुढे चालू या.
आव्हानांची यादी अनलिमेटेड आहे. थोडी यादी बनवू या.
- धावपळीच्या आयुष्यात मुलांना देण्याचा वेळ आणि बाहेरच्या आकर्षणापासून वाचवण्याकरिता पालकांच्या प्रेमाचा चुंबक ताकदीचा असावा.
- एका पालकाची जबाबदारी घेण्याचा नकार किंवा फक्त विशिष्ट जबाबदारी घेण्याचाच हट्ट. आई तर हवीच आहे, पण बाबा पण हवे आहेत. थोडक्यात आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसिपेशनचा हा मनोव्यापार आहे.
- पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवनशैलीमधला फरक. वारंवार हा फरक जाणवून देण्याचा हट्ट. उदा : आमच्या वेळेस... आम्ही लहान असताना... वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने. जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवून मनाला आवश्यक तेवढे लवचिक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सफल होईल.
- बाहेरच्या निर्दय आणि रुक्ष व्यवहाराला पाल्याला फार कोवळ्या वयात सामोरे जावे लागते. तुमच्या पाल्याचा दिनक्रम पाहिला तरच हे लक्षात येईल की तुम्हा आम्हाला ऑफिस किंवा इतरत्र ज्या ताणतणावाला सामोरे जावे लागते त्याच ताणतणावाला ही मुलं कोवळ्या वयात सामोरी जातात. त्यांचा सामोरे जाण्याचा रिफ्लेक्स वेगळा असेल त्यामुळे त्याला तुमच्या पारड्यात तोलू नका.
मला म्हणायचे आहे ते एवढेच की पालक पोटेंशिअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटिक एनर्जीचे बाण होतात. आयुष्याचे युद्ध जिंकायला एवढी तयारी पुरेशी आहे.
- विनायक प्रभू,

सौजन्य:- फुलोरा, सामना, २८०५२०११.
No comments:
Post a Comment