माहिती तंत्रज्ञानामुळे शिकण्याच्या व्याख्याच बदलल्यात. तुम्हाला काही शिकायचं असेल तर कोणती पुस्तकं खरेदी करण्याची किंवा कुठे कोचिंग क्लासला जाण्याची किंवा कोणी व्यक्तिश: मार्गदर्शन करण्याची गरज नाही. हे शक्य झालंय ई-लर्निंगमुळे. शब्दातच याचा अर्थ आहे. ई-लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक अर्थात ऑनलाइन लर्निंग.
ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रदान करण्यात येणार्या शिक्षण वर्गाचा समावेश करता येईल. डीटीएच टीव्ही असो वा सीडी-डीव्हीडीज किंवा इंटरनेट, क्लासरूम्स आता तुमच्या घरी आहेत. टाटा स्काय किंवा रिलायन्ससारख्या डीटीएच सुविधा पुरवणार्या कंपन्या तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी किंवा १०वी-१२वीचे क्लासेस अगदी टीव्हीवर उपलब्ध करून देतात. बहुतेक कंपन्यासुद्धा आपल्या इंटर्न्ससाठी ई-लर्निंगचा वापर करतात. यामुळे बराच वेळ वाचतो. जर आपला एखादा भाग शिकायचा राहिला किंवा आपल्याला समजलं नाही तर आपण पुन: पुन्हा तो भाग बघू शकतो.
ई-लर्निंगचे फायदेच फायदे आहेत. उदाहरणंच द्यायचं झालं तर गृहिणींना शक्यतो बाहेर क्लास लावणे शक्य होत नाही. लावला तरी संकोच वाटतो. कोणतीही भाषा शिकायची असो वा कोणतीही कला, ई-लर्निंग अगदी स्वत:च्या घरात असल्यामुळे वेळेचं बंधन नाही, ना बाहेर जाण्याचं. शिवाय आपल्याला शिकायला अधिक वेळ लागतो म्हणून संकोचून जाण्याचाही प्रश्न नाही.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात ई-लर्निंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत ई-लर्निंग अधिकाधिक प्रगत, इंटरॅक्टिव्ह होत गेलंय. कारण ई-लर्निंगचा लाभ घेणार्यांची संख्या खूप आहे. अमेरिकेत ‘के-१२’ वर्ग आहेत. ई-लर्निंगमध्ये ‘के-१२’ म्हणजे शाळा-कॉलेजांत नेहमीप्रमाणे वर्ग भरतात, पण त्या वर्गांत तुम्ही शारीरिकदृष्ट्या हजर रहाणे जरूरी नसते. या वर्गांना तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून लॉगिंन होऊन हजेरी लावू शकता. याला ‘पब्लिक सायबर स्कूल’ असंही म्हणतात. विद्यार्थी आठवड्यातून एकदा असाईनमेंट्स असतील तर कॉलेजांत जातात. शिकवणारे शिक्षकही या व्हर्च्युअल ट्रेनिंंगसाठी प्रमाणित असतात.
सीबीएल किंवा कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग
यात शिकताना विद्यार्थी कॉम्प्युटरचा वापर करतात. लॅपटॉप्सच्या आगमनानंतर कॉम्प्युटर छोटे आणि पोर्टेबल झाल्यामुळे हे शक्य झाले. उच्च शिक्षणात कॉम्प्युटर ट्रेनिंगसाठी वापरले जातात.
सीबीटी किंवा कॉम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग
यात कॉम्प्युटरवर विद्यार्थी स्वत: कॉंम्प्युटरचा वापर करून शिक्षण घेतो. जसे एखादे ई-बुक किंवा म्यॅन्युअल वाचणे. इंटरनेट कनेक्शन असल्यावर ऑनलाइन ट्रेनिंग साईट्सला लॉगिंन होऊन शिक्षण घेता येते. त्याला वेब बेस्ड ट्रेनिंग असं म्हणतात. कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल किंवा कोणती तांत्रिक माहिती किंवा सर्टिफिकेशन करायचे असेल तर वेब बेस्ड ट्रेनिंगचा खूप उपयोग होतो. वेब बेस्ड ट्रेनिंगमध्ये तत्काळ फिडबॅक देऊन कोर्स कम्प्लिट केल्याचं स्टेटसही पाहू शकतो. ऑनलाइन एक्झाम्स देऊन त्याचे निकालही तत्काळ पाहता येतात. सीबीटी हे युजर इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे नेहेमीच्या क्लासरूम्सपेक्षा खूप युजर फ्रेंडली असतात. ज्यामुळे विद्यार्थ्याला त्यात रसही येतो. मल्टिपल चॉइस प्रश्न, ड्रॅग-ड्रॉप बटनं, रेडिओ बटन्स इत्यादींमुळे शिकणं अधिक सुलभ होतं. रटाळवाणी पुस्तकं वाचण्यापेक्षा, व्हिडिओ आणि ऍनिमेशनमधून गोष्टी पटकन आणि अधिक चांगल्या रीतीने समजतात. याचा अजून एक फायदा म्हणजे कमी खर्चात सीबीटी मटेरियल अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतं. पुस्तकांचा किंवा प्रिंटेड नोट्सचा खर्च विद्यार्थी वाढतील तसा वाढत जातो. अनेक दृष्टींनी ई-लर्निंग हे फायद्याचं तर आहेच, पण किफायतशीर आणि प्रभावीसुद्धा आहे.
हिंदुस्थानात इंटरनेटचा वापर वाढतोच आहे. घरी कॉम्प्युटर असणे ही विषेश बाब राहिली नाही. इंटरनेट कनेक्शन्ससुद्धा सहज उपलब्ध आहेत. तेव्हा येत्या काळात कंटाळवाण्या क्लासेसला जाण्यापेक्षा इंटरनेटवर शिक्षण घेण्याचा ट्रेंड येईल यात दुमत नाही. सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरूम्स म्हणजेच ई-लर्निंग खूप फायदेशीर ठरणार आहे.
- prashants.space@gmail.काम
सौजन्य:- फुलोरा, सामना, २८०५२०११

No comments:
Post a Comment