इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवसेंदिवस क्रांती होत आहे, बरेच बदल झालेत आणि होतीलही.२डी गॅजेट्सनंतर आता येत आहेत ३डी गॅजेट्स. बरेच ब्रॅण्डस् ३डी डिस्प्लेवर काम करत आहेत आणि आगामी काळात हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेलं असेल. मोबाईल, टीव्ही, मॉनिटर्स, कॅमेरे, गेम स्टेशन्स या सर्व प्रकारांत आता आपल्याला ३डीचा अनुभव घेता येणार आहे आणि यासाठी आता आपल्याला जास्त वाट पहावी लागणार नाही.
- ३ डी टीव्ही
त्रिमितीतले चित्रपट आपल्याला आता नवीन नाहीत. पण त्यासाठी खास ३डी चित्रपट पहायला तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागते. पण या क्षेत्रात एल्जी, सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक सारख्या वर्ल्डवाईड ब्रँण्डसमध्ये खूप चढाओढ आहे. जुन्या सीआरटी टीव्हीनंतर जेंव्हा प्लास्मा मग एलसीडी आणि अलीकडे एलईडी डिस्प्लेवाले टीव्ही आले तेंव्हा त्यांची मागणी जबरदस्त वाढली. कॉंपिटिशनमुळे कमीत कमी किमतीत एलसीडी/एलईडी टीव्ही उपलब्ध आहेत. पण आगामी आकर्षण असेल ते ३डी टीव्हींचे. पण जरा थांबा. आताच्या ३डी टीव्हींसाठी तुम्हाला महागडे चष्मे घ्यावे लागतात. तसेच यांचा ३डी इफेक्टसुद्धा एवढा प्रभावी नाही. पण थोड्या दिवसांत ३डी सर्वसामान्य होऊन जाईल. सो जस्ट वेट ऍण्ड वॉच .
- ३ डी गेमस्टेशन्स
एक्सबॉक्स ३६० आणि प्लेस्टेशन या सर्वाधिक लोकप्रिय गेमस्टेशन्समध्ये तुम्हाला ३डी डिस्प्ले मिळाला तर? मोशन सेंसर टेक्निकचा वापर केल्यामुळे आता जॉयस्टिक ऐवजी तुमच्या हालचालींना एक मोशन सेन्सर कॅमेरा ट्रॅक करतो आणि त्यानुसार गेमला इनपूट दिले जाते. हा एक निराळा आणि गेम अगदी खरा अनुभव भेटतो. एखादी बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन किंवा कसलाही गेम खेळण्यासाठी तुम्हाला बाहेरही जायला नकोत , आणि त्याचे कीटही आणायला नको. फक्त एक्सबॉक्स किंवा प्लेस्टेशन घ्या आणि हवा ती गेम हवा तेंव्हा खेळा. त्यातही ३डीचा अनुभव म्हणजे अजून काही विचारायला नकोच.
- ३ डी कॅमेरे
३डी कॅमेर्यात दोन लेन्स असतात. ३डीच्या मूळ तत्त्वानुसार कोणत्याही इमेजला दोन कोनांत चित्रित करून त्या इमेजेस एकावर एक ठेवून डेव्हलप केल्या जातात. जेंव्हा ३डी चष्म्यातून बघतो तेंव्हा आपल्याला त्या ३डी दिसतात. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास त्या इमेजेस काही पुसटशा दिसतात. ३डी कॅमेर्याने तुम्ही ३डी फोटो तसेच ३डी क्लिप्स शूट करू शकता.
- ३ डी लॅपटॉप्स
कॉम्प्युटर / लॅपटॉप प्रेमींसाठी ही एक खुशखबरी आहे. दाक्षिणात्य देशांत ३डी डिस्प्लेचे लॅपटॉप्स लॉंच पण झालेत. गेमर्ससाठी ही सर्वांत खुशीची मेजवानी आहे. हिंदुस्थानातही लवकरच ३डी लॅपटॉप येत आहेत. आगामी काळात ऑपरेटिंग सिस्टिम्स सुद्धा ३डी येतील आणि संगणकाचा एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळणार आहे. गेम्स किंवा चित्रपट पहाताना ३डीचा अनुभव रोमांच आणि अधिक आनंद देणारा असेल. ३डी लॅपटॉप्स, एक हॉट गॅजेट लवकरच येतंय.
३डी गॅजेट्समध्ये अजून काय काय बघायला भेटेल याची कल्पनाच करावी. या ३डी जगतात अशक्य असं काहीच नाही.

सौजन्य:- फुलोरा, सामना 21052011
prashants.space@gmail.com
No comments:
Post a Comment