फळ/भाजीचा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सरमधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्त्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो.
माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस. ‘दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला, तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटरचा फ्रेश ज्यूस पिते.’ ‘रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड िर्ंिमत्रांसोबत जॉगर्स पार्कला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!’ आहेत न या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. यापैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे. पण फ्रूट ज्यूस पिणे म्हणजे सर्व विकारांवरचा रामबाण उपाय किंवा आहारात आवश्यक असलेल्या फळांना पर्याय- हे कधीच होऊ शकत नाही. फळं घन पदार्थ असतात. त्याच्यातील पोषण जपण्यासाठी त्यावर एक किंवा अधिक जाड/पातळ साल असते. जेव्हा फळांचे ज्यूस काढले जाते तेव्हा ते एक किंवा अधिक प्रोसेसिंगमधून तयार होते. जरी तुम्ही ज्यूस सेंटरवरचे ज्यूस प्यायलात, तरी तिथे पण त्या फळाला क्रश करून त्यातून त्याचा रस काढला जातो आणि चोथा गाळून टाकला जातो. तुम्ही म्हणाल की मी टरबूजचा ज्यूस न गाळता पितो - तरी त्या टरबुजाचे फळ, ज्यूस बनण्यासाठी प्रोसेस तर होतेच. फळ/भाजीचा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सरमधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्त्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो. विकत मिळणार्या टेट्रापॅकची तर बातच सोडा. एवढया मोठ्या प्रमाणातल्या औद्योगिक उत्पादनात, त्या फळ/भाजीच्या रसात प्राकृतिक रंगदेखील रहात नाही, पौष्टिक तत्त्व राहणे तर जणू अशक्यच असते. म्हणूनच अशा ज्यूसना ‘फोर्टीफाय’ म्हणजे वरून रासायनिक जीवनसत्त्व व खनिज तत्त्व घालावे लागतात (जे आपल्या शरीरात बहुतांश शोषले जात नाहीत). याव्यतिरिक्त त्या ज्यूसमधे रंग, इतर रसायन, कॉर्न सिरप वगैरे तर असतातच.
माझं असं ठाम मत आहे की फ्रूट/व्हेजिटेबल ज्यूस पिणे हे पण एक पाश्चात्य फॅड आहे. फळ हे फळ रूपातच खावे, तरच त्यातून तुम्हाला जीवनसत्त्व, खनिज तत्त्व, फायबर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मिळतात. उगीच त्या फळाचे ज्यूसरूपी सरबत करून असा समज करून घेऊ नये की तुम्हाला फळाचे पोषण मिळत आहे. आणि, कॅलरी बघाल तर, फ्रूट ज्यूस आणि कार्बोनेटेड कोला यात तुलनात्मक कॅलरी असतात. आणि साखरेव्यतिरिक्त, प्राकृतिक पोषण काहीच नाही! तरी का असावा एवढ्या लोकांचा फ्रूट ज्यूस पिण्याचा अट्टहास? यावर मला अशी काही कारणं दिली गेली-
- फळं आणायला वेळ नसतो- फ्रूट ज्यूस आणायला वेळ काढता ना?
- फळं खायला वेळ नसतो- मला सांगा, एक केळं सोलून खायला किती तास लागतात हो?
- फ्रेश ज्यूस तयार मिळतो, नुसतं पिऊन टाकायचा- फ्रेश फळ देखील रेडी-टू-ईट मिळतात, छान पैकी खाऊन टाकायची. ग्लास धुवत बसायला नको आणि बाहेरचे ज्यूस प्यायल्याने रोगराईची भीती पण नको!
- ऑफिसमधे फळं खायला लाज वाटते- जेवण जेवता ना तिथेच तेव्हाच खायचं मग एक फळ. तुम्ही सुरुवात करा मग बघा कसं सगळेच आणायला लागतात एक फळ ते!
- फळं महाग असतात- रोज एक ग्लास फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा, एक फळ खाणं कधीही स्वस्त असतं. करा हिशेब!
एवढं सगळं समजावून देखील जर तुम्हाला फळाचा रस प्यायचाच असेल तर- नारळ पाणी प्या. आंबा मऊ करून तसाच त्यातला रस खा/प्या. द्राक्ष, टरबूज, खरबूज खा- केवढी छान रसदार फळं असतात ती. काय तर मग, आता नाही न पिणार? फळ हो!

amitagadre@gmail.com
(लेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
No comments:
Post a Comment