संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन एखाद्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कशी असेल याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो.
रत्येक व्यक्ती संवेदनशील असते, पण मन आनंदी, उदास किंवा दु:खी होणे ही सर्वस्वी संवेदनशीलतेची लक्षणे आहेत. अतिसंवेदनशील असणे हा काही आजार नाही, पण त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. कारण संवेदनशीलतेच्या आहारी जाऊन एखाद्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कशी असेल याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो.
उदाहरणार्थ छोट्या छोट्या गोष्टींवरून डोळ्यांत पाणी आणणार्या व्यक्तीची इमेज रडूबाई किंवा रडव्या अशी होते तर आरडाओरड, भांडण करणारे भांडखोर म्हणून ओळखले जातात. काही व्यक्ती बोलायचेच सोडतात. अशा व्यक्तींशी कसे वागायचे? असा प्रश्न समोरच्या व्यक्तीला पडतो. त्याला पर्याय म्हणून लोक अशा संवेदनशील व्यक्तींना टाळणे पसंत करतात. म्हणूनच जर तुम्ही अतिसंवेदनशील असाल तर पुढील काही गोष्टी अमलात आणून तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारू शकता.
उदास होऊ नका
एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी उदास, दु:खी होऊ नका. तुम्ही दु:खी आहात हे दुसर्यांना भासवू नका. अतिसंवेदनशील व्यक्ती नकारात्मक गोष्टींना घेऊन खूपच चिंताग्रस्त असतात.
मनाला पीडा देणार्या या गोष्टी मेंदूच्या अशा कप्प्यात पोहोचतात ज्यामुळे मानसिक ताण, डोके दुखणे वाढते. शारीरिक व्याधीही वाढते. अशावेळी दु:ख देणार्या गोष्टी, घटनांकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार केला पाहिजे.
संयम बाळगाकुठल्याही घटनांवर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम बाळगायला शिका. कुणी चिडवले, आपली मस्करी केली की, त्याला लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी योग्य संधीची वाट पहा. खरे तर सूड घेण्यापेक्षा मस्करीचे उत्तर मस्करीतूनच दिलेले केव्हाही चांगले.
आत्मविश्वास वाढवाअतिसंवेदनशील होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तुमचे वागणे आत्मविश्वासपूर्ण व सकारात्मक असले पाहिजे. स्वत:च स्वत:चे आत्मपरीक्षण करा. कुणालाही याचा अधिकार देऊ नका. असे केल्याने दुसर्याचा तुमच्याविषयीचा दृष्टिकोन बदलेल व तुम्हालाही सकारात्मक फीडबॅक मिळायला सुरुवात होईल.
वर सुचवलेले उपाय एका दिवसात अमलात आणून त्याचा लगेच परिणाम मिळेल असे नाही. यासाठी आवश्यक आहे छोट्या छोट्या गोष्टी ‘डोण्ट टेक मनावर’ अशी स्वत:चीच समजूत काढायला जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुमच्या आयुष्यात ऑल इज वेल असेल.

सौजन्य:- फुलोरा, सामना ०२०७२०११.
No comments:
Post a Comment