संगणक व लॅपटॉप बिघाडाच्या सर्वात जास्त तक्रारी पावसाळ्यात उद्भवतात व फक्त पावसाचे पाणी जाऊन नव्हे तर इतर अनेक गोष्टींमुळे संगणक व लॅपटॉप बिघाडाचे प्रमाण पावसाळ्यात खूपच वाढते. तुमच्या संगणक व लॅपटॉपला पावसाळ्यातील विविध बिघाडांपासून दूर ठेवण्यासाठी खालील काही टीप्स-
- घरात व्यवस्थित इलेक्ट्रिकल आथिर्ंंग नसेल तर तुमच्या संगणकाचा व लॅपटॉपचा एश्झ्ए (स्वीच मोड पॉवर सप्लाय) खराब होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. बहुतांशी वेळेस पावसाळ्यात एश्झ्ए जळण्याच्या सर्वात जास्त घटना घडतात. त्यामुळे तुम्ही तुमचा संगणक/ लॅपटॉप ज्या इलेक्ट्रिकल पॉइंटला लावत असाल त्याला व्यवस्थित आर्थिंग असल्याची खात्री करून घ्या.
- आजकाल बर्याच ठिकाणी केबल इंटरनेटचा वापर केला जातो. केबल इंटरनेट म्हणजेच ज्या केबल टीव्हीवरून आपण टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्याच केबलवरून संगणकावरील इंटरनेटदेखील चालते. बर्याचदा केबल्समधून विशेषत: पावसाळ्यात मोठ्या स्पाइकच्या विद्युतलहरी इतर ठिकाणांवरून येतात. त्यामुळे तुमचा संगणक जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषत: विजा कडकडत असताना संगणक सुरू करू नका.
- पावसाळ्यातली सर्वात जास्त आढळणारी आणखी एक तक्रार म्हणजे संगणकाच्या आतील मेमरी कार्ड खराब होणे. बर्याचदा आपला संगणक/ लॅपटॉप सुरुवातीला ३बीपची वॉर्निंग देऊन चालू होत नाही. संगणकातील मेमरी (RAM) दमटपणामुळे मॉइचराईज्ड झालेली असल्यामुळे हा त्रास उद्भवतो. अशावेळेस संगणकातील श् काढून तिला खोडरबर अथवा इतर कोणत्याही रबरी पदार्थाचा वापर करून पुसल्यास तुमचा संगणक लगेच चालू होऊ शकतो.
- पावसाळ्यात दमट हवामानामुळे आपल्या संगणकाचा CD ROM जाम होण्याचीदेखील शक्यता असते व जर तुम्ही संगणकाचा CD ROM अनेक दिवस वापरत नसाल तर हा बिघाड नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात आपल्या संगणकाच्या ण् CD ROM चा वरचेवर वापर करीत रहा किंवा त्यात कोणतीही CD टाकून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस संगणक सुरू होताना CD ROM देखील चालू राहील.
- संगणकाबरोबरच पावसाळ्यामध्ये दमटपणामुळे प्रिंटर जॅम होण्याचीदेखील शक्यता वाढते. बर्याचदा प्रिंटर जॅम झाल्यानंतरही आपणास माहीत नसल्यामुळे आपण तो वापरत राहतो. त्यामुळे त्यातील मेकॅनिकल पार्ट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपला प्रिंटर एकदा सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते.
- पावसाळ्यामध्ये पॉवर फ्लक्चुएशनमुळे संगणकाचा मदरबोर्ड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संगणकाला स्पाइक गार्ड लावावा. त्यामुळे जरी पावसाळ्यात पॉवर फ्लक्चुएशन झाले तरी तुमच्या संगणकाचा मदरबोर्ड सुरक्षित राहू शकतो.
- लॅपटॉपमध्ये पाणी गेले असल्याची शक्यता वाटली तर त्वरित लॅपटॉपची बॅटरी काढून टाका व लॅपटॉप स्वीच ऑफ करा. जर तुमच्याकडे लॅपटॉपचे मॅन्युअल बुक असेल तर त्याचा वापर करून लॅपटॉपची केस (बाहेरील आवरण) काढण्याचा प्रयत्न करा व घरातील हेअर ड्रायरचा वापर करून लॅपटॉप ड्राय करायचा प्रयत्न करा व पुढील २४ ते ४८ तास लॅपटॉप ऑन करू नये. हवेतील दमटपणामुळे तुमचा लॅपटॉप हँग होत असेल तर लॅपटॉप बॅगमधील इन्सुलेशन तपासून घ्यावे. ते खराब झाले असल्यास नवीन इन्सुलेशन टाकून घ्यावे.
- त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्या संगणक तसेच लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा बॅकअप घेऊन ठेवा. त्यामुळे जरी तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागली तरी तुमचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहू शकेल.
Techno.savvy@live.com

सौजन्य:- इंद्रधनू, सामना २८०६२०११.